शेतकरी आंदोलन : दिल्लीतील हिंसाचारात 83 पोलीस जखमी; दोषींवर कारवाई करणार-दिल्ली पोलीस

ट्रॅक्टर रॅली

फोटो स्रोत, Getty Images

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारात 83 पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

आंदोलनकर्त्यांनी या पोलिसांवर हल्ला केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलीस जखमी होण्याच्या बरोबरीने सार्वजनिक मालमत्तेचंही नुकसान झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान समाजकंटकांनी आंदोलना घुसखोरी केल्याचं संयुक्त किसान मोर्चाचं म्हणणं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ट्रॅक्टर आंदोलन थांबलं असलं तरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरूच राहील असं संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं आहे.

'शेतकऱ्यांनो दिल्लीच्या सीमेवर परत या'

"दिल्लीतलं दृश्यं अविश्सनीय. हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही. शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जी शिकवण दिली त्याचं नुकसान करणारं वर्तन. शेतकरी नेत्यांनी या हिंसक लोकांना बाहेरचं असल्याचं म्हटलं आहे. ट्रॅक्टर रॅलीला थांबवण्यात आलं आहे. मी सर्व शेतकऱ्यांना दिल्ली शहर सोडून सीमेनजीक येण्याचं आवाहन करतो", असं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे.

दिल्लीच्या आयटीओ भागात शेतकरी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या संघर्षादरम्यान एकाचा मृत्यू झाला होता. आंदोलनकर्ते या व्यक्तीच्या मृतदेहाभोवती बसले होते. आम्ही इथेच बसून राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र आंदोलक गाझीपूर सीमेच्या दिशेने निघालं असल्याचं बीबीसी प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांनी कळवलं आहे. आयटीओ परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनही कार्यान्वित करण्यात आले आहेत.

लाल किल्ला रोषणाईविना

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानीचा मानबिंदू असणाऱ्या लाल किल्ल्याला रोषणाई केली जाते. मात्र मंगळवारी दिवसभर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ला रोषणाईविना असल्याचं बीबीसी प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी कळवलं आहे.

शेतकरी आंदोलन
फोटो कॅप्शन, लाल किल्ला

लाल किल्ल्याच्या आतील भागातून शेतकरी आंदोलक बाहेर पडले असले तरी लाल किल्ल्याच्या बाहेरच्या परिसरात अनेक आंदोलक ट्रॅक्टरसह अजूनही आहेत.

दिल्लीतील हिंसाचाराचा आपकडून निषेध

ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचाराच आम आदमी पक्षाने निषेध केला आहे. केंद्र सरकारने परिस्थिती एवढी चिघळू दिली हे दुर्देवी आहे असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

दोन महिन्यांपासून आंदोलन शांततामय मार्गाने सुरू आहे. शेतकरी नेत्यांनी म्हटलं आहे की आज ज्यांनी हिंसाचार केला ते आंदोलनाचा भाग नाहीत. ही बाहेरची माणसं आहेत. ते कुणीही असोत, हिंसेने आंदोलनाला कमकुवत केलं आहे. इतके दिवस आंदोलन शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं असं आपने पत्रकाद्वारे म्हटलं आहे.

पंजाबला अस्वस्थ करण्याचं पातक मोदी सरकारने घेऊ नये-पवार

पंजाब एकेकाळी अस्वस्थ होता. तो पूर्णपणाने सावरला आहे. पंजाबला अस्वस्थ करण्याचं पातक मोदी सरकारने करू नये असं खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पवार म्हणाले, "सविस्तर चर्चा करायला हवी होती. ही विधेयकं सिलेक्ट समितीकडे पाठवावी. सिलेक्ट समितीत सखोल चर्चा होते. माझा अनुभव असा की, त्या विषयाच्या दृष्टीने बघितलं जातं. सिलेक्ट समितीकडे जाऊन ही विधेयकं आली असती तर सभागृहात फारसा कुणाचा विरोध झाला नसता. विधेयकं आजच्या आज पास करण्याचा सरकारचा उद्देश. गोंधळातच विधेयकं मंजूर झाली.

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Screen grab

फोटो कॅप्शन, खासदार शरद पवार

हे बिघडलेलं आहे. याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून उमटू शकते असं वाटतं. गेले ५०-६० दिवसात या भागातील शेतकऱ्यांनी कायद्यासंदर्भात भूमिका घेतली. शांततामय आंदोलन केलं. कडाक्याच्या थंडीत आंदोलन आहे. आपलं म्हणणं मांडण्यासाठी संयम दाखवतात. अभूतपूर्व आहे".

पवार पुढे म्हणाले, संयमी भूमिका घेणारे शेतकरी असताना केंद्र सरकारची जबाबदारी ही शेतकरी वाटाघाटींमध्ये प्रो अक्टिव्ह भूमिका घ्यायला हवी. केंद्र सरकारने आडमुठी भूमिका घेतली. संयमाचं काम संपलं. यानिमित्ताने वेगळं आंदोलन करावं यातून ट्रॅक्टर परेड आयोजित केली. इतके दिवस ज्यांनी संयमाने आंदोलन केलं ते केंद्र सरकारने कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांनी समंजस पद्धतीने बघायला हवं होतं. पंजाब हा अन्नदाता प्रदेश आहे. अन्नाची गरज भागवण्यात पंजाबची भूमिका मोलाची. त्यांना न दुखावता मार्ग काढायला हवा होता.

"त्या आंदोलनाच्या बाबतीत मी फिल्डवर नाही. पण जे ऐकतोय त्यानुसार ज्या पद्धतीने येणं आणि जाणं यासाठी परवानगी देण्याची आवश्यकता होती, तिथे जाचक अटी टाकण्यात आल्या. प्रतिकार झाला. प्रतिकार झाला तरी ५५-६० दिवसांचा संयम हा नजरेसमोर ठेऊन हाताळायला हवी होती. म्हणून वातावरण चिघळलं आहे.

"जे घडतं आहे त्याचं समर्थन कुणीच करणार नाही. मात्र ते का घडतंय याचा विचार व्हायला हवा. जो शेतकरी बांधव दोन महिने शांततामय आंदोलन करत होता तो हिंसक का झाला आहे? अजूनही केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. चर्चेत टोकाची भूमिका सोडावी, रास्त मागण्यांचा गांभीर्याने विचार व्हावा. हे केलं नाही आणि बळाचा वापर करून काही करता येईल अशी भूमिका घेऊ नये".

'आंदोलनात घुसखोरी दुर्देवी'

"आमच्या खूप साऱ्या प्रयत्नांनंतरही काही संघटना आणि समाजकंटक लोकांनी शांततापूर्ण आंदोलनात घुसखोरी केली हे दुर्देव आहे. सरकार आणि आमच्यादरम्यान ट्रॅक्टर परेडचा मार्ग ठरला होता. तो भेदून शिस्तभंग करण्यात आला. हे निषेधार्ह आहे. शांतता ही आमची सगळ्यात मोठी ताकद आहे. अशा घटनांमुळे आंदोलनाला फटका बसतो", असं संयुक्त किसान मोर्चातर्फे सांगण्यात आलं.

आज दिवसभरात जे घडलं त्याप्रती संयुक्त किसान मोर्चातर्फे खेद व्यक्त करण्यात आला आहे. ज्या लोकांनी ठरलेल्या मार्गापेक्षा भलत्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना संघटनेने वेगळं केलं आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला ठिकठिकाणी हिंसक वळण लागलं असून पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळत आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. बीबीसी प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांनी ही माहिती दिली आहे.

आयटीओ परिसरात ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा ट्रॅक्टरचा कोलमडला. आयटीओ परिसरात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात येत होता. या शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

लोक शांततापूर्ण पद्धतीने आंदोलनात बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कोण आहेत हे समजलं आहे. ही राजकीय पक्षांची माणसं आहेत. आंदोलनाची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आंदोलन शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेलं का या प्रश्नावर भारतीय किसाय युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी हे वक्तव्य केलं.

दिल्लीच्या काही भागात इंटरनेट सेवा खंडित

शेतकरी आंदोलन आणि ट्रॅक्टर परेडमुळे उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दिल्लीतल्या काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सिंघू, गाझीपूर, टिकरी, मुकरबा चौक, नांगलोई आणि नजीकच्या भागांमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, जनहितार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.

'हिंसा कोणत्याही प्रश्नावरचं उत्तर नाही'

हिंसा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकावं आणि देशहितासाठी शेतकऱ्यांविरोधातील कायदे मागे घ्यावेत. जखमी कोणीही झालं तरी नुकसान आपलंच आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

'शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये'

शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये असं गुजरात काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून शांततामय पद्धतीने आंदोलन करत आहेत. त्यामुळे आजच्या प्रकाराने त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये. सध्याचं मोदी सरकार शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. एकही प्रसारमाध्यम सत्य काय ते दाखवण्याची हिंमत करू शकलेलं नाही असा आरोपही पटेल यांनी केला.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

आयटीओ परिसरात अजूनही तणावपूर्ण वातावरण असल्याचं बीबीसी प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांनी सांगितलं. शेतकरी आंदोलकांनी पोलिसांविरुद्ध नाराजी जाहीर केली आहे.

आयटीओ परिसरातच शेतकरी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या संघर्षादरम्यान एकाचा मृत्यू झाला. यामुळे आंदोलक नाराज आहेत.

आंदोलकांनी या व्यक्तीचा मृतदेह आयटीओच्या मुख्य चौकात ठेवला आहे. इथून आम्ही हटणार नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे. या चौकाच्या जवळच दिल्ली पोलिसांचं मुख्यालय आहे. दुसऱ्या बाजूला प्रगती मैदानाच्या दिशेने जाणारा रस्ता आहे.

नांगलोई या भागात तणावपूर्ण स्थिती असल्याचं बीबीसी प्रतिनिधी दिलनवाझ पाझा यांनी कळवलं आहे. नांगलोईत हजारो शेतकरी उपस्थित आहेत आणि ते दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. याठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराचा मारा केला आहे.

ट्रॅक्टर परेडदरम्यान अक्षरधाम फ्लायओव्हर परिसरात शेतकरी आंदोलक आणि पोलीस यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला.

दरम्यान ट्रॅक्टर परेड शांततामय पद्धतीने करायची होती हा आमचा सहमतीने घेतलेला निर्णय होता. मात्र ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या आहेत ते योग्य नाही असं शेतकरी नेत्याने सांगितलं.

ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेड्स तोडले आहेत, तर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

"सरकारला वाटलं असतं तर त्यांनी प्रजासत्ताक दिनी झालेला संघर्ष टाळला असता. दिल्लीत जे सुरू आहे त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान कोणीही सहन करणार नाही. पण वातावरण का बिघडलं? सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील कृषी कायदे का रद्द करत नाहीये? अदृश्य हात राजकारण करत आहेत का? जय हिंद", असं ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

'शेतकऱ्यांनी निर्धारित मार्गाचं पालन करावं'

दिल्ली पोलीस आणि शेतकरी आंदोलक यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत ट्रॅक्टर परेडचा जो मार्ग ठरला होता त्याचं पालन करावं असं दिल्ली पोलीस जॉइंट कमिशनर शालिनी सिंह यांनी सांगितलं.

"बहुतांश शेतकऱ्यांनी निर्धारित मार्गाचं पालन केलं आहे, मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर शेतकरी शहराच्या दिशेने कूच करत आहेत. अनेकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचे प्रकारही पाहायला मिळाले", असं शालिनी सिंह यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

शेतकरी आंदोलक पोहोचले लाल किल्ल्यावर

दरम्यान एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले आहेत. आंदोलकांनी शीखधर्मीयांचा केसरिया झेंडा लाल किल्ल्याच्या तटबंदीवर फडकावला. काही मिनिटांनंतर शेतकरी आंदोलनाचा पिवळा झेंडाही फडकावण्यात आला. अनेक शेतकरी लाल किल्ल्याच्या दिशेने जात आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

शेकडो निदर्शक शेतकरी लाल किल्ल्याच्या बाहेर पोहोचले. आम्ही इथेच निदर्शनं करणार, असं निदर्शक म्हणत आहेत.

शेतकरी आंदोलन
फोटो कॅप्शन, लाल किल्ल्या येथील परिस्थिती

दिल्लीतील मध्य आयटीओ भागात शेतकरी आंदोलक पोहोचले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हीडिओमध्ये काही आंदोलकांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला गर्दीतून वाचवत बाहेर काढलं.

काही शेतकऱयांनी पोलिसांवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. पण या वृत्ताला अजून कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

गेले साधारण दोन महिने पंजाब, हरियाणा, राजस्थानचे काही भाग तसंच उत्तर प्रदेश पश्चिमेकडील शेतकरी दिल्लीच्या सीमेनजीक आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत अशी त्यांची मागणी आहे. हे शेतकरी आंदोलन नेमकं कशासाठी होतं आहे? हे या लिंकवर समजून घेऊ शकता.

दोन महिन्यांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलनचा तिढा सुटावा यासाठी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचे नेते यांच्यात चर्चेच्या फेऱ्या नियमितपणे सुरू आहेत. विज्ञान भवनात चर्चा होते मात्र या चर्चा सातत्याने निष्फळ का ठरत आहेत?

शेतकरी आंदोलनात अनेकविध शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व कोण करत आहे?

'आयटीओ पूर्णपणे शेतकऱ्यांच्या ताब्यात'

आयटीओ भागात बीबीसीचे प्रतिनिधी कीर्ति दूबे उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलं की, पूर्ण आयटीओ शेतकऱ्यांच्या ताब्यात आल्याचं चित्र दिसत आहे.

"इथं शेतकरी ट्रॅक्टर घुसवत आहेत आणि पोलिस एका अर्थाने बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे."

शेतकरी आंदोलन

"शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, पोलिसांनी आधी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला आणि लाठीचार्ज केला."

सुरक्षेच्या कारणास्तव इथलं इंटरनेट बंद करण्यात आलं आहे.

शेतकरी आंदोलन
फोटो कॅप्शन, आयटीओ परिसरात ट्रॅक्टर मोठ्या संख्येने जमले आहेत.

किसान मजदूर संघर्ष समितीने बीबीसी पंजाबीशी बोलताना सांगितलं की ते आधी ठरलेल्या रूटवरच ट्रॅक्टर रॅली करणार आहेत. ते सांगतात की ते मध्य दिल्लीभोवतीच्या रिंग रोडवर फेरी मारून परत जातील. पण अनेक शेतकरी मध्य दिल्लीतल्या ITO परिसरात पोहोचले आहेत. तिथे पोलीस निदर्शकांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे ठिकाण इंडिया गेट, संसद भवन आणि इतर महत्त्वाच्या वास्तूंपासून अवघ्या एक-दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

बीबीसी प्रतिनिधी सलमान रवी सांगतात की, पोलिसांची संख्येपेक्षा निदर्शकांची संख्या खूप जास्त असल्यामुळे पोलीस अनेक ठिकाणी अगतिक दिसत आहेत. थेट मध्ये दिल्लीपर्यंत शेकडो निदर्शक पोहोचतील, हे गृहित धरून तयारी केलेली दिसत नाहीये.

शेतकरी आंदोलन
फोटो कॅप्शन, ट्रॅक्टर

शेतकरी आणि पोलिसांमध्ये आधी चर्चा झाली होती, त्यानुसार शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स दिल्लीभोवतीच्या रस्त्यांवर फेरी मारून परत जाणार होते. निदर्शक शेतकरी आणि त्यांचे ट्रॅक्टर्स अतिसंवेदनशील आणि अतिमहत्त्वाच्या मध्य दिल्ली परिसरात येणं अपेक्षित नव्हतं. अजूनही ट्रॅक्टर्स मध्य दिल्लीत शिरले नसले, तरी निदर्शक मात्र मोठ्या संख्येने पोहोचू लागले आहेत. त्यामुळे मध्य दिल्लीत संघर्ष सुरू आहे.

दिल्लीतली काही मेट्रो स्टेशन्स बंद

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने काही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

दिल्ली मेट्रोच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशन तसंच ग्रीन लाइनवरील काही मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

ग्रीन लाइनवर बहादुरगढ सिटी, टिकरी बॉर्डर, टिकरी कलां, मुंडका, नांगलोई, नांगलोई रेल्वे स्टेशन ही प्रमुख स्टेशन्स आहेत. याच मार्गाने आंदोलक शेतकरी दिल्लीत येण्याचा प्रयत्न करत आहेत.

दिल्ली मेट्रोनं पश्चिम दिल्लीतील काही मेट्रो स्टेशन्सही बंद केले आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रो स्टेशन्स तसेही 12 वाजेपर्यंत बंद केले जातात.

गाझीपूर आणि सिंघु बॉर्डरवर काय परिस्थिती?

सिंघु बॉर्डरहून दिल्लीकडे येत असलेली ट्रॅक्टर रॅली कव्हर करत असलेले बीबीसीचे प्रतिनिधी वेंकट प्रसाद यांनी सांगितलं की, मधुबन चौकाच्या इथे तरुण शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. किमान पाच वेळा पोलिसांनी फायरिंग केल्याचं वेंकट प्रसाद यांनी सांगितलं.

शेतकरी आंदोलन

त्यानंतर शेतकरी पोलिसांच्या वाहनांवर चढले आणि वॉटर कॅननच्या गाडीचा ताबा घेतला. दुसरीकडे काही ज्येष्ठ शेतकरी या तरूणांना शांतता राखण्याचं आवाहन करत होते.

सिंघु बॉर्डरवर बीबीसीचे प्रतिनिधी अरविंद छाब्रा उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलं होतं की, शेतकऱ्यांनी ट्रान्सपोर्ट नगरजवळ बॅरिकेड्स तोडले आणि त्यांनी दिल्लीत प्रवेश केला.

सुरक्षेच्यादृष्टिने इथं हजारो पोलिस तैनात करण्यात आले आहेत, मात्र त्यांच्यापेक्षा शेतकऱ्यांची संख्या कितीतरी अधिक आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या अश्रूधुराच्या गाड्यांवर आणि रॅपिड अक्शन फोर्टच्या गाड्यांवर ताबा मिळवला.

त्यांनी सांगितलं, "शेतकरी सरकारवर नाराज आणि रागावलेले दिसत आहेत. शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले असून रिंग रोडकडे निघाले आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, ते पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गाने जाणार नाहीत. आपण ठरवलेल्या मार्गानेच रिंग रोडवर पोहोचून परेड पूर्ण करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी बोलून दाखवला."

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

दिल्ली-नोएडा आणि दिल्ली-गाझियाबाद मार्गावर अक्षरधाम मंदिराजवळ पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला. इथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ट्रॅक्टर रॅली

दिल्लीहून टिकरी बॉर्डरकडे जाणारा रस्ता गेल्या दोन तासांपासून पूर्णपणे बंद करण्यात आलाय. या भागातील तीन ते चार किलोमीटरच्या अंतरातले चौक पोलिसांनी जेसीबी लावून अडवले आहेत.

नांगलोई चौकात पोलिस आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांनी झेंडे लावलेल्या मोटारसायकल आणि काही कार आणल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना परत पाठवलं. अनेक लोक बॅरिकेडिंगबद्दल काही माहीत नव्हतं, ते आपल्या गाड्यांमधून उतरून पुढे चालत जात होते.

X पोस्टवरून पुढे जा, 8
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 8

ट्रॅक्टर दिल्लीला येण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार दिल्ली-हरियाणाजवळील टिकरी बॉर्डरपाशी शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, टिकरी बॉर्डरहून निघालेली शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली दिल्लीत पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या रॅलीसाठी 10 वाजताची वेळ होती, मात्र सर्व सीमांवरून शेतकरी नियोजित वेळेच्या आधीच निघाले आहेत.

आज शेतकऱ्यांची 'मन की बात' ऐकावी- योगेंद्र यादव

बीबीसी प्रतिनिधी सोनल यांनी स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांच्याशी संवाद साधला.

योगेंद्र यादव

योगेंद्र यादव यांनी ही रॅली तसंच शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करताना म्हटलं, "प्रजासत्ताक दिनाचा अर्थ प्रजा आधी आणि सत्ता नंतर असा आहे. मात्र गेल्या 72 वर्षांमध्ये सत्ता मोठी झाली आणि प्रजा सत्तेच्या भाराखाली वाकली.

या ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून आम्ही प्रजेला प्रतिष्ठा देऊ पाहत आहोत, शेतकऱ्यांचं म्हणणं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांची 'मन की बात' ऐकवली जाते; आता शेतकऱ्यांची 'मन की बात' ऐकली जावी.

"शेतकरी समजून घ्यायला तयार आहेत, पण तत्त्वांशी तडजोड करणार नाहीत. पण सरकार मोकळ्या मनानं चर्चेला तयार नाही. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा शेतकरी संसदेवर मोर्चा नेतील आणि आपलं म्हणणं मांडलं आहे."

प्रजासत्ताक दिनाचं संचलन

एकीकडे शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टर रॅलीची तयारी करत असताना दुसरीकडे दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनाचं संचलन पार पडलं.

भारत-बांग्लादेशमधील द्विराष्ट्रीय संबंधांना पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यावेळी बांग्लादेशच्या विशेष सैन्य दलाच्या पथकानं राजपथावर संचलन केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 9
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 9

या पथकात बांगलादेशचे 122 जवान सहभागी झाले होते. यापूर्वी 2016 साली फ्रान्स आणि 2017 साली संयुक्त अरब अमिरातच्या सैन्याच्या तुकडीनं संचलनात भाग घेतला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)