नरेंद्र मोदी म्हणतात, नागरिकांनी नवीन वर्षात आत्मनिर्भर भारताचा संकल्प करावा

फोटो स्रोत, ANI
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं.
2020 या वर्षातली ही शेवटची 'मन की बात' असणार आहे.
देशवासियांनी नवीन वर्षासाठी आत्मनिर्भर भारताचा संकल्प करावा, असं मोदींनी यावेळी म्हटलं.
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-
- बहुतांश लोकांनी नवीन वर्षासाठी शुभेच्छा आणि संदेश पाठवले आहेत. कोल्हापूरहून अंजली यांनी लिहिले आहे की यावर्षी आपण देशाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ.
- मला सर्व संदेशात एक कॉमन गोष्ट दिसून येत आहे. बहुतांश पत्रांमध्ये लोकांनी देशाच्या सामुहिक शक्तीची प्रशंसा केली आहे. टाळी-थाळी वाजवून लोकांनी एकजूटता दाखवली. याचाही आठवण लोकांनी काढली.
- आत्मनिर्भर भारत या अभियानाची लोक प्रशंसा करत आहेत. दिल्लीतील एका तरूणाने याचेच एक उदाहरण दिले. दिल्लीच्या बाजारात मेड इन भारत खेळण्यांची मागणी वाढली आहे.
- मी सुरुवातीलाही सांगितले आहे. तुम्ही एक यादी बनवा. दिवसभर लागणाऱ्या उपयुक्त गोष्टींची यादी बनवा. यापैकी कोणत्या विदेशी वस्तू आहेत. कोणत्या वस्तूंनी आपल्याला बंदी बनवले आहे ते पाहा. या वस्तूंना देशी पर्याय कोणते आहेत ते पाहा.
- भारतातील बिबट्यांच्या संख्येत 60 टक्यांनी वाढ झालीय. 2014 मध्ये बिबट्यांची संख्या 7900 होती. आता 12,852 एवढी झाली आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक संख्या वाढली. तर महाराष्ट्रातही संख्या अधिक आहे. गेल्या काही वर्षात सिंह,वाघ यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
यावेळच्या संबोधनात नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलन आणि देशातील कोरोना स्थितीबाबत कही भाष्य केलं नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




