31 डिसेंबर संचारबंदी : महाराष्ट्रात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यामागे काय 'लॉजिक' आहे?

मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्रात पाच जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू (रात्रीची संचारबंदी) लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दिवसभर अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होत असताना केवळ रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू करून सरकारला कोरोनाचा संसर्ग रोखता येणार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात 22 डिसेंबरपासून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू असेल.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्यावेळी गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारने संचारबंदी लागू केल्याचे समजतं.

पण बहुतांश लोक रात्री घरी असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यामागे काय 'लॉजिक' आहे? असा प्रश्न विचारला जातोय.

तसंच दिवसभरातही अनेक ठिकाणी लोक गर्दी करताना दिसून येत आहेत. तेव्हा दिवसा कोरोनाचा संसर्ग होत नाही का? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.

शिवाय, रात्रीच्या संचारबंदीत प्रवास आणि पर्यटनाला जाण्याची मुभा असणार आहे का? अशा सर्व प्रश्नांचा आढावा आपण या बातमीत घेणार आहोत.

संचारबंदी

फोटो स्रोत, Getty Images

संचारबंदी म्हणजे काय?

कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू केली जाते तर संचारबंदीत नागरिकांना घराबाहेर येण्यास परवानगी नसते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये संचारबंदी लागू केली जाऊ शकते.

संचारबंदीचा नियम मोडल्यास संबंधितांना अटक करण्याचे अधिकार पोलिसांना असतात. संचारबंदीची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि पोलीस करत असतात.

संचारबंदीत वैद्यकीय सेवा वगळता बाकी सेवा बंद असतात.

संचारबंदी

फोटो स्रोत, Getty Images

'कोरोनाचा संसर्ग दिवसा होत नाही का?'

सोमवारी (21 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदीची घोषणा केली.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत संचारबंदीबाबत निर्णय घेण्यात आला.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

अनलॉकनंतर मुंबईसह राज्यभरात विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रम, रेल्वे प्रवास, समुद्र किनारे, रेस्टॉरंट्स आणि पब अशा विविध ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.

जवळपास संपूर्ण वर्ष घरात बसलेल्या नागरिकांमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्साह दिसून येत आहे.

अशावेळी मुंबई, पुण्यासारख्या शहरात विशेषत: तरुणाई रात्री उशिरापर्यंत सेलिब्रेशन करत असते. पण यंदा गर्दीत कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळेच रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय सरकारने घेतला. पण राज्य सरकार केवळ रात्रीच्या वेळेस संचारबंदी लागू का करत आहे? असा प्रश्न सामान्य जनतेकडून विचारला जात आहे.

दिवसा सर्व काही सुरू असताना रात्रीच्या वेळेस जेव्हा लोक घरी असतात तेव्हा संचारबंदी लागू करून काय साध्य होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ट्विटरवर यासंदर्भात अनेक लोक ट्विट करत आहेत. यापैकी काही पोस्ट पाहूयात,

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

X पोस्टवरून पुढे जा, 4

X पोस्ट समाप्त, 4

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई लोकल, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "दिवसभर लोकांवर नजर ठेवण्यासाठी आमच्याकडे टास्क फोर्स आहे. पण 24 तास हे करणं शक्य नाही म्हणून रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे."

यंदाचा 31 डिसेंबर दरवर्षीप्रमाणे नाही. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन इक्बालसिंह चहल यांनी केले आहे.

ख्रिसमसच्या मिड नाईट मास प्रेयर करता येणार नाही का?

ख्रिसमससाठी राज्यातील चर्चमध्ये जय्यत तयारी सुरू असताना रात्रीच्या संचारबंदीमुळे चर्चमध्ये रात्री 12 वाजता मास प्रेयर म्हणजेच सामूहिक प्रार्थना करता येणार नाहीय.

मुंबईतील वांद्रे, वसईसहीत राज्यभरातील चर्चमध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रात्री 12 वाजता ख्रिश्चन बांधव एकत्र जमतात आणि चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना केली जाते.

कॅथेड्रल चर्च, मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

या सामूहिक प्रार्थनेला विशेष महत्त्व असतं. पण संचारबंदी रात्री 11 पासून सुरू होत असल्याने 12 वाजता गर्दी करता येणार नाहीय.

मुंबईतील ख्रिश्चन धर्मगुरुंच्या संघटनेचे प्रवक्ते निजेल बॅरेट यांनी बीबीसी मराठीशी बोलतना सांगितलं, "राज्य सरकार कोरोनापासून सुरक्षेसाठी काही नियमावली तयार करत आहे. तेव्हा आपण सरकारला सहकार्य केलं पाहिजे असं आमचं मत आहे. ख्रिसमससाठी रात्री 12 वाजता होणारी मास प्रेयर आता रात्री 8-10 या वेळेत केली जाईल. रात्री 10 नंतर चर्चमध्ये गर्दी नसेल."

मुंबईत एकूण 132 चर्च आहेत. ख्रिसमसला सकाळी सात ते रात्री सहा वाजेपर्यंत प्रार्थनेसाठी चर्च खुली राहणार आहेत. यावेळी सोशल डिस्टंसिंगचं पालन बंधनकारक असणार आहे. तसंच चर्चमध्ये प्रवेशा करताना मास्क लावणेही अनिवार्य आहे.

नाईटलाईफ

फोटो स्रोत, Getty Images

31 डिसेंबरला रात्री बाहेर जाता येणार का?

राज्यात पाच जानेवारीपर्यंत संचारबंदी असल्याने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत करण्यात येणाऱ्या पार्ट्यांवरही आता निर्बंध आले आहेत.

यांसदर्भात बोलतना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं, "शनिवार आणि रविवार शहरात रात्रभर रेस्टॉरंट्स आणि पब सुरू असतात. याठिकाणी 50 लोकांच्या मर्यादेचा नियम पाळला जात नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. म्हणून कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रीच्या वेळेस संचारबंदी लागू केली आहे."

संचारबंदीत प्रवासावर मात्र कोणतेही निर्बंध नसल्याचं इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे.

कारमधून लोक प्रवास करत असतील तर त्यांना रोखण्यात येणार नाही. पण चारपेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असं आवाहन आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केलं आहे.

यापूर्वी राज्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाला सुरूवात झाल्यानंतर मार्च, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती.

गोवा

फोटो स्रोत, Getty Images

संचारबंदीत रिसॉर्ट किंवा पर्यटनासाठी जाता येईल का?

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अनेकजण बाहेरगावी जाण्याचं नियोजन करतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पर्यटन होत नसले तरी अनलॉकनंतर रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट्समध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

25 आणि 31 डिसेंबरला सेलिब्रेशनसाठी अनेकांनी बाहेरगावी पर्यटनासाठी किंवा रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी बुकिंग केलं आहे. पण रात्री संचारबंदी लागू केल्याने बुकिंग रद्द करावं लागणार का, अशी शंका नागरिकांच्या मनात आहे.

संचारबंदीत सार्वजनिक ठिकाणी चारपेक्षा अधिक लोकांना गर्दी करता येत नाही. पण इन-डोअर किंवा बंद खोलीत पार्टीसाठी आम्ही एकत्र जमू शकतो का? असाही प्रश्न लोकांच्या मनात आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "रिसोर्ट किंवा पर्यटनाला जाण्यास मनाई नाही. पण रिसॉर्टमध्ये पार्टी किंवा सेलिब्रेशन रात्री 11नंतर करता येणार नाही. पण तुम्ही रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी जाऊ शकता."

पर्यटनासाठी जायचं असल्यास प्रवास सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंतच करता येणार आहे, असंही चहल यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि गृह विभागाशी चर्चा करणार असल्याचे समजतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)