पश्चिम बंगालमध्ये भाजप 200 हून अधिक जागांवर विजयी होणार - अमित शाह

फोटो स्रोत, Amit Shah
गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आज (19 डिसेंबर) दाखल झाले.
मेदिनीपूर इथल्या प्रचारसेभत अमित शाह यांनी म्हटलं, "येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप पश्चिम बंगालमध्ये 200हून अधिक जागांवर विजय मिळवेल. राज्यातल्या जनतेनं एकदा भाजपच्या हातात सत्ता द्यावी."
शाह यांच्या प्रचारसभेपूर्वी शुभेंदू अधिकारी यांच्यासहित 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे पाच आमदार आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दुपारी मेदिनीपूर येथे पोहोचताच त्यांनी हबीबपूर परिसरात शहीद खुदीराम बोस यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांचा शाल घालून त्यांचा आदर-सत्कारही करण्यात आला. अमित शाह यांनी खुदीराम बोस यांच्या प्रतिमेला हार घालून त्यांना श्रद्धांजली दिली. यावेळी पत्रकारांशी संवास साधताना अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.
अमित शाह म्हणाले, "शहीद खुदीराम बोस यांच्या जन्मभूमीच्या मातीचा टिळा लावू घेण्याचं आज मला सौभाग्य मिळालं. स्वातंत्र्य लढ्यात बंगाल आणि इथल्या सुपुत्रांचं योगदान कुणीच विसरू शकत नाही. इथं आल्यानंतर मला नव्या चेतना आणि ऊर्जेचा अनुभव होत आहे. देश बोस यांचं बलिदान कायम स्मरणात ठेवेल. पश्चिम बंगालमध्ये पुढे इतक्या खालच्या पातळीचं राजकारण होईल, असा विचार शहिदांनी कधीच केला नव्हता."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ते पुढे म्हणाले, "आजच रामप्रसाद बिस्मील, अशफाक उल्ला खान आणि ठाकूर रोशन सिंह यांचा स्मृती दिनही आहे. आपल्याला देशासाठी मरण्याची संधी तर मिळाली नाही. पण जगण्याची संधी जरूर मिळाली आहे. चला, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण एक मजबूत, सशक्त आणि सुरक्षित भारताचं निर्माण करू."
दरम्यान, अमित शाह यांनी कोलकात्याहून मेदिनीपूरला हेलिकॉप्टरने दाखल होण्यापूर्वी कोलकात्यात सातशे वर्षे जुन्या सिद्धेश्वरी मंदिरात जाऊन पूजा-अर्जा केली.
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)