निवार चक्रीवादळ झालं कमकुवत, पण धोका अजूनही कायम

भयंकर निवार चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय.

या निवार वादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटर वरून ताशी 65-75 किलोमीटरवर येणार असला तरी धोका अजूनही टळला नसल्याचं हवामान विभागाने म्हटलंय.

पुदुचेरीच्या उप राज्यपाल किरण बेदी यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पहाटे तीन वाजताच्या सुमारास ट्विट करत सांगितलं.

यानंतर चार वाजताच्या सुमारास ट्वीट करत त्यांनी वाऱ्यांचा वेग कमी झाल्याचं सांगितलं. त्या लिहितात, "वादळाचा तडाखा अजूनही दिसतोय. पहाटे पाचपर्यंत हा वेग राहील असा अंदाज आहे."

या चक्रीवादळाने आता पुदुचेरी ओलांडलं असून ते पुढे सरकलेलं आहे.

निवर चक्रीवादळाची भीषणता लक्षात घेत प्रतिबंधात्मक पावलं उचलण्यात आली होती. तामिळनाडूमध्ये काल (25 नोव्हेंबर) आणि आज (26 नोव्हेंबर) सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. सोबतच एक लाखापेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. NDRF ची पथकंही इथे तैनात आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)