नितीश कुमार यांनी घेतली सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

नितीश

फोटो स्रोत, Ani

नितीश कुमारांनी आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेतली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे एनडीएचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी तारकिशोर प्रसाद आणि रेणूदेवी यांनी देखील शपथ घेतली. हे दोघे बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"मला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. पण भाजप नेत्यांच्या आग्रहास्तव मी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईन," अशी प्रतिक्रिया जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी दिली होती.

बिहारची राजधानी पाटण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला.

नितीश यांच्या आधीच्या मंत्रिमंडळात भाजपचे सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री होते. मात्र आता त्यांच्याऐवजी आता दोन जण मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत.

सुशीलकुमार मोदी यांच्याऐवजी तारकिशोर प्रसाद यांना संधी मिळाली. बिहार विधानसभा आणि विधानपरिषद भाजप नेते म्हणून तारकिशोर यांच्या नावाची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली त्यानंतर ते उपमुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झालं होतं.

64 वर्षीय तारकिशोर 2005 पासून कटिहार मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी आरजेडीच्या राम प्रकाश महतो यांना दहा हजार मतांच्या फरकाने हरवलं होतं.

तारकिशोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असून, त्यांचं मूळ गाव सहरसा जिल्ह्यातील तलखुआ हे आहे. तारा किशोर यांना कलवार वैश्य समाजाची पार्श्वभूमी असून, बिहारमध्ये या समाजाला मागासवर्गीय दर्जा आहे.

तारकिशोर यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. मेडिकल स्टोअरही त्यांनी चालवलं आहे. 2001 मध्ये ते कटिहार चेंबर ऑफ कॉमर्सचे ते अध्यक्षही होते.

कटिहारच्या व्यापारी वर्गावर त्यांची चांगली पकड आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेचे नेते म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर कटिहारमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

सुशील कुमार मोदी बिहारचे उपमुख्यमंत्री असतील का? अशी विचारणा राजभवनबाहेर भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांना करण्यात आली. ते म्हणाले, "योग्य वेळ आल्यानंतर याचे उत्तर मिळेल. काही वेळ वाट पहा."

एनडीए आमदारांच्या बैठकीत नितीश कुमार यांची विधीमंडळाचे पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. सुशील कुमार मोदी यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली.

भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदासाठी कटिहार शहराचे आमदार तारा किशोर प्रसाद तर उपनेतेपदी बेतियाच्या आमदार रेणू देवी यांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)