इरा खान: '14 वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला होता'

फोटो स्रोत, Ira khan
प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याची मुलगी आणि नाट्य दिग्दर्शक इरा खानने तिच्यावर 14 व्या वर्षी लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं आहे. इरा सध्या 23 वर्षांची आहे.
चार वर्षांपूर्वी तिने मानसिक आरोग्याबाबत आपले विचार मांडले होते. यावेळी तिने बाललैंगिक अत्याचाराबाबत पोस्ट टाकली आहे.
आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती म्हणते की 'लहानपणी झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे मला काही काळ नैराश्याचा सामना करावा लागला.'
"मी चौदा वर्षांची होती. तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला. ही जराशी विचित्रच परिस्थिती होती कारण मला हेच कळत नव्हतं की ती व्यक्ती हे मुद्दामहून करत आहे की तिच्याकडून ते चुकून होत आहे. असं रोज घडत नव्हतं."
पुढे ती सांगते की "मी याबाबत माझे वडील आमिर खान आणि आई रीना दत्ता यांच्याशी बोलले. त्यांनीच मला या बिकट परिस्थितीतून बाहेर येण्याचा मार्ग दाखवला."
"ती व्यक्ती माझ्यासोबत नेमकं काय करत आहे हे समजून घेण्यासाठी मला एक वर्ष लागलं. पण जेव्हा मी माझं मन पक्कं केलं त्यावेळी मी लगेच माझ्या आई-वडिलांना इमेल केला. आणि या परिस्थितीतून बाहेर आले."
"माझा भूतकाळ मला सतावत नाही. मी आता त्या गोष्टीला घाबरत नाही. मी असा विचार करते की माझ्यासोबत हे आता तर होत नाहीये ना. माझा भूतकाळ मी केव्हाच पाठीमागे टाकलाय. मी जेव्हा 18-20 वर्षांची होते तेव्हा या गोष्टीच्या वेदना होत असत," असं इराने म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Ira khan
याच व्हीडिओमध्ये इराने आमिर खान आणि रीना दत्त यांच्या घटास्फोटाबाबतही आपले विचार मांडले आहेत. "माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट अतिशय शांततेनी झाला आहे. कुणाचाही कुणावर राग नाही. जुनैद आणि माझी काळजी दोघेही घेतात. लोकांना वाटतं की या गोष्टीमुळे मला कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं असेल पण तसं नाहीये माझे पालक जबाबदार आणि समजूतदार आहेत," असं इराने म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता कोरोना पॉडकास्ट तुम्ही बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहू शकता.)








