You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी: कोरोना लस येत नाही, तोवर लढाई सुरूच राहणार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (20 ऑक्टोबर) यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. भारताची स्थिती अनेक देशांच्या तुलनेत चांगली आहे पण आपल्याला ही स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
देशात 12 लाख बेड आहेत आणि 90 हजार कोव्हिड सेंटर आहेत. जगात सर्वाधिक टेस्ट भारतातच होत आहे असं मोदी यांनी म्हटलं. देशात टेस्टची क्षमता लवकरच 10 कोटीचा आकडा पार करेल असं मोदी यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे
- काही लोक असं वागत आहेत की कोरोनाचं संकट टळलं आहे. पण जोपर्यंत लस तयार होत नाही तोपर्यंत आपण जबाबदारीने वागलं पाहिजे.
- संत कबीरदासने सांगितले आहे- अनेकदा आपण पिकलेली शेती पाहून समाधानी होतो पण जोपर्यंत धान्य घरी पोहचत नाही तोपर्यंत आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही.
- नवरात्री, ईद आणि नानक जयंतीच्या शुभेच्छा
- जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही हे लक्षात ठेवा त्यामुळे हात धुणे, मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिग या गोष्टी पाळा.
कोरोनाकाळात मोदींची अशी झाली भाषणं
कोरोनाकाळात नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी विशिष्ट वेळेची पूर्वसूचना देऊन देशाला उद्देशून भाषण केलं आहे. कोरोनानं नुकतेच भारतात हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती, तेव्हा म्हणजे 19 मार्च रोजी मोदी पहिल्यांदा कोरोनाबाबत बोलले.
19 मार्च रोजी मोदींनी 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली होती. त्यानंतर 24 मार्च रोजी मोदींनी 21 दिवसांचं पहिलं लॉकडाऊन जाहीर केलं होतं.
14 एप्रिल रोजी पहिलं लॉकडाऊन संपलं, मात्र कोरोनाचा प्रसार वाढत जात होता. त्यामुळे 14 एप्रिल रोजी मोदींनी पुन्हा 14 दिवसांनी लॉकडाऊन वाढवला.
त्यानंतर 12 मे रोजी मोदींनी पुन्हा देशाला उद्देशून भाषण केलं आणि त्यात त्यांनी 'आत्मनिर्भर भारत' योजनेची घोषणा केली होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज घोषित केलं होतं.
त्यानंतर 30 जून रोजी मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलं आणि त्यात कोरोनाबाबत बेजबाबदार वागणाऱ्या नागरिकांना सुनावलं होतं.
अनलॉक करताना सोशल डिस्टंन्सिंग आणि मास्क वापरणं किती महत्त्वाचं आहे, हे मोदींनी सांगितलं होतं.
आता आज मोदी काय बोलणार, ते आजही कोरोनावर बोलणार की आणखी दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलणार, हे पाहावं लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)