मुंबई लोकल : सर्व महिलांसाठी लोकल सुरू करायला अखेर हिरवा कंदील

फोटो स्रोत, Getty Images
सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. बुधवारपासून (21ऑक्टोबर) सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जात असल्याचं ट्वीट रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी केलं आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 17 ऑक्टोबरपासून सर्व महिलांना लोकल ट्रेनमधून प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारनं रेल्वे प्रशासनाकडे केली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
कोरोना काळात मुंबई आणि परिसरातील लोकल ट्रेनमध्ये सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी आहे. सर्व महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडत सरकार एकप्रकारे महिलांना 'नवरात्री गिफ्ट' देऊ पाहत होतं.
महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाने रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम विभागातील विभागीय व्यवस्थापकांना पत्र लिहून लोकल रेल्वेमध्ये सर्व महिलांना 17 ऑक्टोबरपासून प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली.
सकाळी 11 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी सात वाजेपासून रात्री लोकलसेवा बंद होईपर्यंत महिलांना लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी मिळावी. त्यांना प्रवासादरम्यान क्यू आर कोड विचारण्यात येऊ नये. वैध तिकीट काढून सर्व महिलांना प्रवासाची परवानगी देण्यात यावी, असं महाराष्ट्र सरकारनं लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

विशेष म्हणजे, रेल्वे विभागानंही महाराष्ट्र सरकारचं पत्र स्वीकारलं, मात्र त्यासंबंधी तात्काळ निर्णय घेतला गेला नव्हता.
पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, "आम्ही महाराष्ट्र सरकारशी काल (रविवार-18 ऑक्टोबर) बोललो. रेल्वे तयार आहे. पश्चिम रेल्वेनं आपली सेवा वाढवली असून 700 गाड्या सुरू केल्या आहेत, त्यापैकी 2 लेडीज स्पेशल आहेत. सेंट्रल रेल्वेनंही 706 गाड्या सुरू केल्या आहेत. राज्य सरकारनं अजून त्यांच्या व्यवस्थेबद्दल आम्हाला कळवलं नाहीये."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
रेल्वे प्रशासनाची भूमिका
महाराष्ट्र सरकारच्या पत्राबद्दल बीबीसी मराठीनं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी संपर्क साधला होता.
त्यांनी म्हटलं होतं, "महाराष्ट्र सरकारनं 16 ऑक्टोबर रोजी पत्र लिहून विनंती केली की, 17 ऑक्टोबरपासून महिलांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी. महाराष्ट्र सरकारनं काही निश्चित वेळा सुद्धा सांगितल्या आहेत."
"मात्र, सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यामुळे याबाबत असा एका दिवसात निर्णय घेता येणार नाही. आम्ही सरकारची विनंती नाकारली नाहीये. पण सरकारसोबत बैठक घेऊन, किती लोक प्रवास करू शकतील, किती गाड्या सोडाव्या लागतील, याबाबत चर्चा करू. त्यानंतर निर्णय घेऊ," असं सुतार म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)