नवरात्री-घटस्थापनाः नवरात्रीसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वं काय आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
17 ते 25 ऑक्टोबरदरम्यान साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यावर्षी नवरात्रामध्ये गरबा वा दांडियाचं आयोजन करता येणार नाही.
सार्वजनिक आणि घरगुती नवरात्र उत्सव, दुर्गापूजा साजरी करताना या नियमांचं पालन करावं लागेल. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवासाठीही अशाच गाईडलाईन्स जाहीर केल्या होत्या.
नवरात्रीसाठीची मार्गदर्शक तत्त्वं काय आहेत?
- नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. देवीच्या घरगुती मूर्तीची उंची 2 फूट तर सार्वजनिक मंडळामधल्या देवीच्या मूर्तीची उंची 4 फुटांपेक्षा कमी असावी.
- देवीच्या आगमनाची वा विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही.
- पारंपरिक मूर्तीऐवजी घरातील धातू वा संगमरवरी मूर्तीचं पूजन करावं. शाडूच्या मातीची मूर्ती असल्यास तिचं विसर्जन घरच्या घरी करावं.
- विसर्जन घरी करणं शक्य नसल्यास स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करावं.
- सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल.
- महापालिका वा स्थानिक प्रशासनांची धोरणं आणि न्यायालयाने दिलेल्या सूचनांचं पालन करून मंडप उभारावा.
- गरबा - दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करता येणार नाही.
- सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यावी. उत्सवासाठी स्वेच्छेने देण्यात आलेली वर्गणी वा देणगी स्वीकारावी.
- 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेबाबत आणि आरोग्य - समाज विषयक जनजागृती जाहिरातींतून करण्यात यावी.
- रक्तदान शिबीरांसारख्या आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करावं.
- आरती, भजन-कीर्तन वा इतर धार्मिक विधी करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन वा केबल नेटवर्कद्वारे करावी.
- मंडळांच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची आणि थर्मल स्क्रीनिंगची सोय असावी.
- दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी फिजीकल डिस्टंन्सिंगचे आणि स्वच्छतेचे नियम पाळण्यात यावेत.
- मंडपामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्ते नसावेत.
- दसऱ्याला रावणदहनाचा कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरूपाचा करावा आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान व्यक्ती तिथे हजर राहू शकतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)




