आदित्य ठाकरे - मुंबई लोकल ऑक्टोबर महिन्यात सुरू होऊ शकतात

फोटो स्रोत, @AUThackeray
राज्यामध्ये टप्याटप्याने विविध सेवा आणि कार्यलयं सुरू होत असताना मुंबईतली लोकल रेल्वे सेवा अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू नाही. पण ऑक्टोबरच्या मध्याच्या सुमारास लोकल्स सर्वांसाठी खुल्या करण्याचा आमचा विचार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
हिंदुस्तान टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरेंनी ही माहिती दिली आहे.
"ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत आणखी काही गोष्टी सुरू होतील आणि मग त्यासाठी वाहतुकीच्या इतर पर्यायांनाही परवानगी द्यावी लागेल, ऑक्टोबरच्या मध्याच्या सुमारास कदाचित आम्ही लोकल टेन्स सुरू करू," असं मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी या मुलाखतीत सांगितलं आहे.
तर अत्यावश्यक सेवांसोबतच इतर लोकांसाठीही लोकल सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी सूचना मुंबई हायकोर्टाने आज (29 सप्टेंबर) राज्य सरकारला दिली आहे.
वकिलांना मुंबई लोकलमधून प्रवास करता यावा यासाठी हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली. त्यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ही सूचना केली आहे.
राज्यात रेस्टाँरंट्स, जिम, शाळा - कॉलेजं, सिनेमा आणि नाट्यगृहं अजूनही बंद आहेत.
राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वं तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (28 सप्टेंबर) सांगितलं.
सध्या हॉटेल्समधून फक्त होम डिलीव्हरी वा पार्सल न्यायला परवानगी आहे.
सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन कार्यपद्धती निश्चित करणार असल्याचं गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








