You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मुंबईत वीज गेल्यावर ब्रेकिंग न्यूज, आमच्या गावात तर 2 दिवस लाईट नाही'
मुंबईत काल (12 ऑक्टोबर) वीज गेली आणि देशभर चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर #PowerCut, #बत्तीगुल यांसारखे हॅशटॅग ट्रेंड झाले. काही तासांनी मुंबईत वीज आली सुद्धा. अजूनही मुंबईतल्या काही भागात विजेचा लपंडाव सुरूच आहे. पण बऱ्यापैकी भागात आलीच.महाराष्ट्र असो वा भारतातील इतर राज्य असो, ग्रामीण भागात विजेचा लंपडाव किंवा अगदी दोन-दोन दिवस वीज नसणं, ही सर्वसामान्य बाब होऊन बसलीय.बीबीसीने याबाबतच काल एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी लिहिलं, "मुंबईची लाईट 2 तास गेली नाही तर एवढा गहजब होतो, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आठआठ तास वीज नसते. त्यावर कुणीच बोलत नाही."
या ट्वीटवर बऱ्याचजणांनी आपली मतं मांडली. त्यातील अनेक मतं ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील किंवा निमशहरी भागातील ट्विटर युजर्सची आहेत. त्यामुळे त्यांची दखल घेणं आवश्यक आहे.
पुण्यातील भोर येथील प्रशांत कोंडे यांनी माध्यमांच्या वृत्तांकनाबाबत खंत व्यक्त करत म्हटलंय, ग्रामीण भाग बऱ्यापैकी दुर्लक्षित राहतो, मग वीज असेल किंवा पाणीपुरवठा, असं म्हटलंय.
पंढरपुरातील समाधान भोई म्हणतात, महाराष्ट्रात ग्रामीण आणि शहरांमधील भेदाची दरी रुंदावलेलीच आहे.
संकेत वागल यांनीही मुंबईला प्राधान्य दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
बीडमधील केजचे उमेश पटाईत यांनी त्यांच्या गावातील विजेची स्थिती सांगितली आहे.
नितेश मेस्त्री यांनी सुसंवादी ट्वीट केले आहे. मुंबईकरांनाही ग्रामीण महाराष्ट्राच्या वेदना कळतात, असं नितेश यांचं म्हणणं आहे.
प्रीतम जोशी यांनी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसईत किती तास वीज जाते, हे सांगितलंय.
बीबीसी मराठीच्या फेसबुकवरसुद्धा अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (12 ऑक्टोबर) सकाळीच मुंबई शहरातल्या बहुतेक भागातली वीज गायब झाली होती. 10 वाजून 15 मिनिटांनी वीज पुरवठा बिघाडाच्या या प्रकरणाची नोंद शहराला वीज पुरवठा करणाऱ्या बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट या कंपनीने घेतली.
पुढच्या दोन तासांमध्ये वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात महावितरणला यश आलं. पण, मुंबईसारख्या औद्योगिक राजधानीत घडलेल्या या प्रकारामुळे काही तास सगळ्याच यंत्रणेचा गोंधळ उडाला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)