सचिन पायलट यांनी राहुल गांधींची घेतली भेट, निर्णायक चर्चा झाल्याचा काँग्रेसचा दावा

सचिन पायलट

फोटो स्रोत, Getty Images

राजस्थानमधील राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय वळण आलं आहे. बंडखोरी केलेल्या सचिन पायलट यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीच याबाबत पत्रक काढून माहिती दिली.

"सचिन पायलट हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटले आणि त्यांनी सविस्तरपणे त्यांची तक्रार सांगितली. दोघांमध्ये मोकळेपणाने आणि निर्णायक चर्चा झाली," अशी माहिती केसी वेणुगोपाल यांनी दिली.

सचिन पायलट हे काँग्रेससोबत आणि राजस्थानमधील काँग्रेस सरकारसोबत काम करणार आहेत, अशीही माहिती वेणुगोपाल यांनी दिलीय.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

महत्त्वाचं म्हणजे, सचिन पायलट यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसकडून तीन सदस्यीय समितीची स्थापना केली जाणार आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच याबाबतचे आदेश पक्षाच्या संघटनेला दिले आहेत.

सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात बंड केले होते. गेले काही आठवडे राजस्थानमधील काँग्रेसचं सरकार अस्थिर होतं.

आता 14 तारखेला होणाऱ्या अधिवेशनात सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार सहभागी होतील, अशी शक्यता काँग्रेसच्या पत्रकानंतर निर्माण झालीय.

सचिन पायलट, काँग्रेस, भाजप, राजस्थान
फोटो कॅप्शन, सचिन पायलट

राजस्थानमध्ये आतापर्यंत काय काय घडलं?

20 जुलै रोजी सचिन पायलट आणि त्यांच्या सोबत असलेल्या 18 आमदारांना विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. तुम्हाला अपात्र का ठरवण्यात येऊ नये याचे स्पष्टीकरण द्या असं या नोटीसमध्ये होतं.

या नोटीसविरोधात सचिन पायलट यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर सध्या राजस्थान हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.

राजस्थान हायकोर्टाच्या जयपूर खंडपीठात न्या. इंद्रजीत महंती आणि न्या. प्रकाश गुप्ता यांच्या निगराणीत ही सुनावणी सुरू आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

याआधी अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर घोडेबाजारीचा आरोप केला होता. सरकार पाडण्यासाठी आमदारांना 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी पैसे घेतले नाहीत. सचिन पायलट यांनी घोडे-बाजार केल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे.

देशात सगळीकडे घोडेबाजार चालला आहे, कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होत आहे. हे सगळं षडयंत्र दिल्लीतून सुरू आहे, याची सगळी माहिती माझ्याकडे आहे, असं गहलोत म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

राष्ट्रीय माध्यमांनी प्रामाणिकपणे सत्याची सोबत करावी. दिल्लीत लोकशाही संपवणारे लोक बसलेले आहेत. ते घोडेबाजार करून सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. माध्यमं स्वतःला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवून घेत असतील तर लोकशाही वाचवणं त्याचं कर्तव्य आहे, असंही गहलोत म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यावर सचिन पायलट यांची अद्याप काही प्रतिक्रिया आली नाही.

याआधी, मी भाजपमध्ये जाणार नाही, असं सचिन पायलट यांनी स्पष्ट केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

सचिन पायलट यांनी इंडिया टुडेला एक मुलाखत देऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज नसल्याचं त्यांनी त्यात म्हटलं आहे.

या मुलाखतीत सचिन पायलट म्हणाले, "मी त्यांच्यावर नाराज नाही, माझी कुठल्या विशेषाधिकाराचीसुद्धा मागणी नाही. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण व्हावीत असं आम्हाला वाटतं. आम्ही वसुंधरा राजे सरकारविरोधात अवैध उत्खनन प्रकरणाचा मुद्दा उठवला होता. सत्तेत आल्यावर गेहलोत यांनी याबाबत काहीच केलं नाही. एवढंच नाही ते तर वसुंधरांच्याच मार्गावर चालायला लागले."

सचिन यांनी या मुलाखीत पुढे सांगितलं, "सरकारी बंगला कायमस्वरूपी स्वतःकडे ठेवण्याच्या वसुंधरा यांचा निर्णय 2017 मध्ये राजस्थान हायकोर्टानं फेटाळून लावलं होतं. गेहलोत यांनी बंगला खाली करून घ्यायला पाहिजे होता, पण त्यांनी कोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं."

"गेहलोत तर भाजपच्याच मार्गावर चालत आहे, त्यांना मदत करत आहेत. ते मला आणि माझ्या समर्थकांना राजस्थानच्या विकासासाठी काम करू देत नाहीयेत. माझ्या आदेशांना मानू नका, असं नोकरशहांना सांगितलं आहे. कुठलीही फाईल माझ्याकडे येत नाही. महिने झाले कॅबिनेट आणि सीएलपीची बैठक झालेली नाही. लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करता येत नसतील तर त्या पदाचा काय उपयोग?"

कोरोना
लाईन

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते पुढे सांगतात, " मी हे मुद्दे अनेकदा उपस्थित केले. राजस्थान काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांनासुद्धा सांगितलं. इतर वरिष्ठ नेत्यांनासुद्धा सांगितलं. मी गेहलोत यांच्याशीसुद्धा चर्चा केली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही, करण मंत्री आणि आमदारांची क्वचितच बैठक व्हायची. माझा स्वाभिमान दुखावला गेला आहे. राज्याच्या पोलिसांनी तर मला देशद्रोहाची नोटीस पाठवली."

"तुम्हाला आठवत असेल की 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशद्रोहाचा कायदा हटवण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलं होतं. आणि इथं तर काँग्रेसचं सरकार स्वतःच्याच मंत्र्याविरोधात त्याचा वापर करत आहे. माझं हे पाऊल अन्यायाच्या विरोधात आहे. जेव्हा विधानसभेचं अधिवेशन सुरू असतं तेव्हाच पार्टीचा व्हिप वैध ठरतो. मुख्यमंत्र्यांनी संसदीय पक्षाची बैठक त्यांच्या घरी बोलावली. कमीतकमी पक्ष कार्यालयात तरी बैठक बोलवायची."

सचिन पायलट यांनी राजस्थानमधील वेगवान राजकीय घडामोडींदरम्यान माध्यमांशी बोलणं टाळलं होतं. या घडामोडींनंतर पहिल्यांदाच ट्विटरवर लिहिलं आहे की, "सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।"

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सचिन पायलट यांच्या प्रतिक्रियेला ट्विटरवरून उत्तर दिलं आहे.

अविनाश पांडे

फोटो स्रोत, Twitter

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून काढलं

सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.

त्याचसोबत, सचिन पायलट यांचे समर्थक मंत्र्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या राजस्थान प्रदेशाध्यक्षालाही पदावरून काढण्यात आलं.

मंगळवारी पुन्हा एकदा आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

सचिन पायलट यांनी ब्लॅकमेल केल्याचा गहलोत यांचा आरोप

"सचिन पायलट यांना पदांवरून हटवल्यानं आनंद झाला नाहीय. पण पक्षाकडे त्यांनी दुसरा पर्यायच ठेवला नाही," असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले.

सचिन पायलट ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप अशोक गहलोत यांनी केला. आपल्याकडे बहुमत असल्याचा दावाही गहलोत यांनी केलाय.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

"भाजपकडून षड्यंत्र आखलं जात होतं. गेल्या सहा महिन्यांपासून हे षड्यंत्र आखलं जात होतं. घोडेबाजार होत होता. या षड्यंत्राला बळी पडून आमचे काही साथीदार दिल्लीत गेले होते. मात्र, हे षड्यंत्र यशस्वी झालं नाही," असंही गहलोत म्हणाले.

आतापर्यंत काय घडलं?

याविषयी बोलताना पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला सोमवारी म्हणाले होते, "सकाळी 10 वाजता काँग्रेसच्या आमदारांची पुन्हा एक बैठक बोलवण्यात येणार आहे. आम्ही पुन्हा एकदा सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांना विनंती केली आहे की या आणि राजकारणाच्या सद्यस्थितीवर चर्चा करा. कुण्या एका व्यक्तीविरोधात तक्रार असेल तर तेही सांगा. सोनिया गांधी आणि राहुल गांधी सर्वांचं म्हणणं ऐकायला आणि त्यावर तोडगा काढायला तयार आहेत."

मात्र, सोमवारी रात्रीपासून सोशल मीडियावर एक व्हीडियो व्हायरल होतोय. यात सचिन पायलट समर्थक आमदारांसोबत दिसत आहेत. सचिन पायलट यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याचाही अंदाज बांधला जातोय.

ज्येष्ठ पत्रकार प्रदीप कौशल यांच्या मते काँग्रेसने एखादा तोडगा काढून सचिन पायलट यांची मनधरणी केली तर सचिन पायलट यांची स्थिती एखाद्या योद्ध्याने तलवार उगारली, पण वार करण्याआधीच ती म्यान केली, अशी होईल. म्हणजेच हा पर्याय सचिन पायलट यांची प्रतिष्ठा कमजोर करणारा ठरेल.

सचिन पायलट, काँग्रेस, भाजप, राजस्थान
फोटो कॅप्शन, सचिन पायलट

सचिन पायलट सध्या उपमुख्यमंत्री आहेत. सोबत काही खात्याचे मंत्रीही आहेत. इतकंच नाही तर गेल्या 6 वर्षांपासून ते प्रदेशाध्यक्षसुद्धा आहेत. अशा परिस्थितीत डील कशावर होईल?

याविषयावर सचिन पायलट यांनी अजूनतरी स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही. आज होणाऱ्या बैठकीला सचिन पायलट उपस्थित राहतील की त्यांचे समर्थक आमदार उपस्थित होतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

याआधी सोमवारी जयपूरमधल्या मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधीमंडळ दलाची बैठक झाली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला 107 आमदार उपस्थित होते. यातल्या एका आमदाराने बाहरे येताना, "ऑल इज वेल" म्हटलं होतं.

राजस्थानातल्या गहलोत सरकारवर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी निशाणा साधलाय.

मालवीय यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की गहलोत यांच्याकडे बहुमत असेल तर त्यांना तातडीने फ्लोर टेस्ट घेऊन बहुमत सिद्ध करावं. ते पुढे असंही लिहितात की गहलोत आपल्या आमदारांना रिसॉर्टवर नेत आहेत, याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही.

सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना 101 आमदारांच्या समर्थनाची गरज आहे. गहलोत सरकारच्या मंत्र्यांचा दावा आहे की त्यांना 115 आमदारांचं समर्थन आहे.

काँग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीत आमदारांनी काँग्रेस नेतृत्त्व आणि अशोक गहलोत यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे. या आमदारांनी काँग्रेस सरकार किंवा पक्षविरोधी कारवायांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामील आमदारांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

या प्रस्तावाच्या माध्यमातून सचिन पायलट यांना कठोर संदेश देण्याचा गहलोत समर्थक आमदारांचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातंय.

सचिन पायलट, काँग्रेस, भाजप, राजस्थान

फोटो स्रोत, Getty Images

व्हिप जारी करूनही सचिन पायलट पक्षाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. ते दिल्लीतच आहेत. असं असलं तरी सोमवारी सकाळी पक्ष प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी काँग्रेस पक्षाचे दरवाजे सचिन पायलट यांच्यासाठी खुले असल्याचं आणि चर्चेतून कुठलीही समस्या सोडवली जाऊ शकते, असं म्हटलं होतं.

त्यापूर्वी रविवारी सचिन पायलट यांच्या कार्यालयातून एक निवेदन प्रसिद्ध करून सांगण्यात आलं होतं की "आमच्यासोबत 30 आमदार आहेत आणि गहलोत सरकार अल्पमतात आलं आहे."

मात्र, विधिमंडळ गटाच्या बैठकीतली आमदारांची उपस्थिती बघता सचिन पायलट करत असलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहेत.

आमदारांसोबत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी व्हिट्री साईनही दाखवलं. संपूर्ण प्रकरणात सचिन पायलट कुठेच दिसले नाहीत. इतकंच नाही तर ते अजून प्रसार माध्यमांसमोरही आलेले नाहीत.

मात्र, प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातला वाद सोडवण्यासाठी प्रियांका गांधींनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केली आहे आणि त्या या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)