H1B व्हिसावरचे निर्बंध ट्रंप यांनी वर्षाच्या अखेरपर्यंत वाढवले, भारतीयांवर काय परिणाम?

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीन कार्ड आणि परदेशी नागरिकांना मिळणारा H1B या वर्क व्हिसावर घातलेले निर्बंध या वर्षाच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, अमेरिकन सरकारने उचललेल्या या पावलामुळे अमेरिकन नागरिकांसाठी नोकरीच्या संधी वाढतील.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय कार्यालयाच्या अंदाजानुसार व्हिसावर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अमेरिकन नागरिकांना रोजगाराच्या 5 लाख 25 हजार संधी उपलब्ध होतील.
कोरोना विषाणूच्या काळात अमेरिकी बेरोजगारांना यामुळे दिलासा मिळू शकतो. मात्र, परदेशी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या कंपन्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
गुगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्वीट करत म्हटलं आहे, "इमिग्रेशनचा अमेरिकेच्या आर्थिक यशात मोठा हातभार आहे आणि यानेच अमेरिकेला जगात तंत्रत्रानाचा बादशाह बनवलं आहे. गुगललाही इथवर पोहोचवलं आहे. या घोषणेने मी निराश झालोय. आम्ही स्थलांतरितांसोबत आहोत आणि सर्वांना उत्तम संधी देण्यासाठी यापुढेही कार्यरत राहू."
कुणावर होणार परिणाम?
H1B व्हिसा असणाऱ्यांनाच अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. H1B व्हिसा असणाऱ्यांच्या कुटुंबीयांना H4 व्हिसा मिळतो आणि तेदेखील अमेरिकेत राहू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात 2015 साली H1B व्हिसा नियमांमध्ये काही बदल करण्यात आले होते. शिवाय H4 व्हिसाधारकांनाही अमेरिकेत काम करण्याची परवानगी देण्यासंबंधीचे नियम करण्यात आले होते.
मात्र, आता ट्रम्प प्रशासनाने यात पुन्हा बदल केले आहेत.
अमेरिकन प्रशासनानुसार या नियमामुळे 5 लाख 25 हजार लोकांवर थेट परिणाम होणार आहे. यात 1 लाख 70 हजार असे लोक आहेत ज्यांनी ग्रीन कार्डसाठी अर्ज केले आहेत. व्हाईट हाऊसने एप्रिल महिन्यात व्हिसावर निर्बंध घालण्याची घोषणा केली होती. या निर्बंधाचा कालावधी सोमवारी संपला. मात्र, ज्यांच्याकडे सध्या हा व्हिसा आहे त्यांच्यावर नवीन नियमाचा परिणाम होणार नाही.
स्किल्ड कामगारांसाठी H1B व्हिसा, कंपनीअंतर्गत कर्मचारी ट्रान्सफरसाठीचा L-1 व्हिसा, शैक्षणिक आणि संशोधकांना मिळणारा J व्हिसा आणि सीझनल कामगारांसाठीचा H-2B व्हिसा, या सर्व व्हिसांवर या नियमाचा परिणाम होणार आहे. मात्र, अन्न प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्यांना या नियमातून सूट मिळू शकते.
भारतीयांवर किती परिणाम होणार?
गेल्यावर्षी H1B व्हिसाच्या 85 हजार रिक्त जागांसाठी जवळपास 2 लाख 25 हजार अर्ज आले होते. तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे हजारो भारतीय दरवर्षी H1B व्हिसासाठी अर्ज करतात.

फोटो स्रोत, Getty Images
यूएस सिटीझनशीप अँड इमिग्रेशन सर्विसेसची आकडेवारी सांगते की, 5 ऑक्टोबर 2018 पर्यंत 3 लाख 9 हजार 986 भारतीयांनी व्हिसासाठी अर्ज केले होते. ही संख्या जगातल्या इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. जवळपास 47 हजार चीनी नागरिकांनी व्हिसा अर्ज केले होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








