कोरोना लॉकडाऊन: सरकारनं कामगारांना थेट पैसे द्यावेत-राहुल गांधी

राहुल गांधी, कोरोना,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काँग्रेस नेते राहुल गांधी

केंद्र सरकारनं आर्थिक पॅकेजमध्ये दुरुस्ती करावी असं मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

त्यांनी मांडलेले मुद्दे

1.केंद्र सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज हे एकप्रकारचं कर्ज आहे. सरकारनं शेतकरी आणि मजुरांच्या खिशात डायरेक्ट पैसे जमा केले पाहिजेत.

2.सरकारनं कर्ज देऊ नये. सावकाराचं काम करू नये. मजुरांना कर्जाची नव्हे, तर पैशाची गरज आहे. जे त्यांच्या खिशात डायरेक्ट जमा करावेत.

3.आज भुकेल्या पोटानं रस्त्यावर चालणारे लोक भारताचं भविष्य आहे.

राहुल गांधी, कोरोना,

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, राहुल गांधी

4.केंद्र सरकारनं आर्थिक पॅकेजचा पुनर्विचार करावा आणि मोदींनी डायरेक्ट पैसे जमा करण्याचा विचार करावा.

5.भारत संकटात सापडला आहे. आपले कोट्यवधी लोक बिना अन्नपाण्याचं रस्त्यावर हिंडत आहे. त्यामुळे मला दु:ख होत आहे.

6.रस्ते अपघातांत मजूरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे मनाला यातना होत आहे.

7.लॉकडाऊन उठवण्याचा विचार अभ्यासपूर्ण करावा लागणार आहे. हा एक इव्हेंट नाहीये. आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं आपल्याला रक्षण करायचं आहे.

8.कोरोनाच्या संकटाला आता नुकतीच सुरुवात झाली आहे. हे एक वादळ आहे, त्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. यापेक्षा मोठं वादळ आता येईल. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठं संकट येणार आहे.

9.कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांचे हात बळकट करायला पाहिजे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)