कोरोना व्हायरस : राहुल गांधी म्हणतात-'... तर लॉकडाऊन उठवल्यानंतर परिस्थिती पुन्हा गंभीर होईल'

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरसचा लॉकडाऊनमुळे पराभव होऊ शकत नाही, त्यासाठी प्रभावपणे चाचण्या करणं आवश्यक आहे, अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी गुरुवारी (16 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
त्यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले प्रमुख मुद्दे -
- लॉकडाऊन हा उपाय नाही. ते पॉझ बटण आहे. कोरोना व्हायरसचा लॉकडाऊनमुळे पराभव होऊ शकत नाही, तर तो काही काळ थांबू शकतो. लॉकडाऊनमुळे काम संपलं नाहीये, काम पुढे ढकललं गेलंय.
- लॉकडाऊननंतर एक्झिट रणनीती काय, टेस्टिंगची रणनीती काय याचा आधीच आणि पटकन विचार व्हायला हवा. लॉकडाऊननंतर केसेस वाढू शकतात. तेव्हा काय करणार याची तयारी आधीच हवी.
- तुम्ही जेव्हा लॉकडाऊन करतात, तेव्हा आजारही बंद असतो. तुम्ही गोष्टी सुरू करता तेव्हा आजारही वेगाने बाहेर येतो.
- टेस्टिंगची रणनीती नसताना लॉकडाऊन उघडलं तर पुन्हा लॉकडाऊनमध्ये जाण्याची वेळ यावी येईल.
- कोरोनाचा सामना करण्यासाठी टेस्टिंग हे सगळ्यांत प्रभावी शस्त्र आहे. आपला टेस्टिंग रेट आहे 199 प्रति दशलक्ष इतका आहे, तो पुरेसा नाही.
- टेस्टिंग नाट्यमयरीत्या वाढवायला हवं. व्हायरस कुठे चाललाय हे ओळखून वेगाने टेस्टिंग करायला हवं. व्हायरसच्या मागे नाही, आपण पुढे चालायला हवं. सरकारला सल्ला आहे की टेस्टिंग वाढवा.
- टेस्टिंगचा वापर केवळ रुग्ण ओळखण्यासाठीच नाही, तर शस्त्र म्हणून वापर करायला हवा. रोग कुठे पसरतोय ते ओळखण्यासाठी टेस्टिंग वापरा.
- एकदा साथीचा आजार सुरू झाल्यावर सगळ्या देशांनी टेस्टिंग किट्स मागवायला सुरुवात. त्यामुळे तुटवडा निर्माण झालाय, हे खरंय. अशा परिस्थितीत टेस्टिंग वाढवायचं असेल तर मार्ग शोधावे लागतील.
- नॉन हॉटस्पॉट झोनमध्ये टेस्टिंग नाही केलं तर तो हॉटस्पॉट झाला तरी कळणार नाही.
- देशातील काही महत्त्वाचे भाग उघडायला हवे. ते ओळखण्यासाठी टेस्टिंग हवं. भारतात दोन झोन्स हवेत - हॉटस्पॉट झोन आणि नॉन-हॉटस्पॉट झोन.
- आत्ता आपण व्हायरसच्या मागे पळतोय आणि तो पुढे निघून जातोय. रँडम टेस्टिंग केल्यानंतर आपण व्हायरसच्या पुढे जाऊ शकतो.
- केरळ, वायनाडमध्ये जे यश मिळालंय ते जिल्हा स्तरावरच्या प्रयत्नांमुळे मिळत आहे. त्यामुळे जिल्हा आणि स्थानिक प्रशासन महत्त्वाचं आहे, पंतप्रधानांनी राज्यांना बळ द्यायला हवं.
- आता आर्थिक संस्थांवर प्रचंड ताण येणार आहे. लोकांचे जीव वाचवणं ही सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट. पण त्याच बरोबर हाही विचार करायला हवा की आपण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणार नाही.
- जितका आणि जिथे पैसा पोहोचायला हवा, तेवढा पोहोचत नाहीये. बेरोजगारी सुरू झालीये आणि येणाऱ्या दिवसांत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी येईल. या गोष्टी आधीच ओळखून पावलं उचलायला हवी.
- आत्ता सगळे पैसे संपवू नका, ही लढाई खूप काळ चालणार आहे. नंतरसाठी पैसे ठेवण्यासाठी नीट नियोजन हवं. कोविडवर नियंत्रण नाही मिळवता येत, त्याला मॅनेज करावं लागतं.
- स्थलांतरितांच्या मुद्द्याबाबत 2 चुका झाल्या. अचानक लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे गोंधळ झाला. मुख्यमंत्र्यांशी अधिक संवाद साधायला हवा आणि रणनीती आखायला हवी. जगात दुसरा देश नाही जिथे एवढे स्थलांतरित लोक नाहीत. कदाचित चीनचा अपवाद असेल.
- आपल्या गोदामांमध्ये असलेलं धान्य गरिबांना द्यायला हवं. रेशन कार्ड नसलं तरी तरी द्यायला हवं. त्यावर मार्ग शोधून काढा. गोदामांमध्ये ओव्हरसप्लाय आहे. ताबडतोब धान्य वाटायला हवं.
- देशांमधली राज्य अनेक अर्थांनी वेगळी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अधिक स्वातंत्र्य हवं. कधी, कसं लॉकडाऊन हवं, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं.
- बाकी देश काय करत आहेत याची मला काळजी नाही, मला भारताची चिंता आहे. टेस्टिंगची रणनीती काय? आर्थिक संकटासाठी काय रणनीती? अन्नाचा तुटवडा संभवतो, त्यासाठी सरकार काय करतंय? या गोष्टींची मला मुख्य चिंता आहे. भारताच्या समस्या इतर देशांपेक्षा वेगळ्या आहेत. लढाई आत्ता सुरू झालीये. ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे.
- भारत एकजुटीने लढला तर सहज कोरोनाला हरवू. जर आपण एकमेकांशी लढलो तर गोष्टी अवघड होतील.
- भारतीय लोकशाहीचं स्वरूप बदलू शकेल ही खरी शक्यता आहे. पण आधी व्हायरसचा मुकाबला करू. लॉकडाऊन झोपडपट्टीत पूर्णतः करणं कठीण असतं. इमारतीत राहणारे आणि झोपडपट्टीत राहणारे यांच्या समस्या वेगळ्या. स्थलांतरितांचे प्रश्न वेगळे. या सगळ्या समस्यांवर लवकर निर्णय घ्यायला हवे. नाहीतर असंतोष वाढेल.सगळ्यांच्या समस्यांच्या बाबतीत सरकारने संवेदनशील असावं आणि पटपट निर्णय घ्यावे.
- लॉकडाऊन झोपडपट्टीत पूर्णतः करणं कठीण असतं. इमारतीत राहणारे आणि झोपडपट्टीत राहणारे यांच्या समस्या वेगळ्या. स्थलांतरितांचे प्रश्न वेगळे. या सगळ्या समस्यांवर लवकर निर्णय घ्यायला हवे. नाहीतर असंतोष वाढेल.सगळ्यांच्या समस्यांच्या बाबतीत सरकारने संवेदनशील असावं आणि पटपट निर्णय घ्यावे.
- विजय होण्याआधीच विजयाची घोषणा करणं धोकादायक ठरू शकेल. विजयाची घोषणा करण्याची मानसिकता योग्य नाही.
- लॉकडाऊन झोपडपट्टीत पूर्णतः करणं कठीण असतं. इमारतीत राहणारे आणि झोपडपट्टीत राहणारे यांच्या समस्या वेगळ्या. स्थलांतरितांचे प्रश्न वेगळे. या सगळ्या समस्यांवर लवकर निर्णय घ्यायला हवे. नाहीतर असंतोष वाढेल.सगळ्यांच्या समस्यांच्या बाबतीत सरकारने संवेदनशील असावं आणि पटपट निर्णय घ्यावे.
- विजय होण्याआधीच विजयाची घोषणा करणं धोकादायक ठरू शकेल.विजयाची घोषणा करण्याची मानसिकता योग्य नाही.
- भारतात मधुमेह, बीपी, फुफ्फुसांचे आजार, इत्यादींचं प्रमाण जास्त आहे. यात फक्त वयोवृद्धच नाही तर तरुणही आहेत. या सगळ्या लोकांना नॉन हॉटस्पॉट झोनमध्येही जाऊन सांगावं लागेल की त्यांना धोका आहे.
- युरोपात धोका वयोवृद्धांना आहे. आपल्याकडे मध्यमवयीन लोकांनाही असू शकतो कारण त्यांना हे सर्व आजार आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




