कोरोना लॉकडाऊन नियम : 20 एप्रिलपासून देशात काय सुरू, काय बंद?

फोटो स्रोत, ANI
20 एप्रिलपर्यंत काटेकोरपणे लॉकडाऊनचं पालन करण्यात येईल आणि परिस्थिती सुधारली तर 20 एप्रिलनंतर काही क्षेत्रात दिलासा दिला जाऊ शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी देशाला संबोधित करताना सांगितलं होतं.
लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवत आला असताल तरी अर्थव्यवस्थेचं चाक फिरतं राहणं आवश्यक आहे. त्यामुळेच काही सोयसुविधा काही ठिकाणीच सुरू करण्याचा निर्णय सरकार घेत आहेत.
त्याबद्दलचे नियमही केंद्र तसंच विविध राज्य सरकारांनी आपापल्या परीने, मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचं पालन होईल, या उद्देशाने आखले आहेत.
या वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनसाठी नव्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत. त्या कोणत्या आहेत, एकदा पाहूया...
नव्या मार्गदर्शक सूचनांमधील महत्त्वाच्या बाबी
- रेल्वे, मेट्रो, महामार्ग आणि हवाई वाहतूक 3 मेपर्यंत बंद असेल.
- केंद्र सरकार आणि राज्य सरकारची सर्व कार्यालयं खुली असतील.
- शॉपिंग मॉल, चित्रपटगृहं, ऑडिटोरियम, खेळाची मैदानं, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, जिम, रेस्टोरंट यासारखी सार्वजनिक स्थळं बंदच राहतील.
- महाविद्यालयं आणि सर्व शैक्षणिक संस्थांदेखील 3 मेपर्यंत बंद असतील. मात्र, शैक्षणिक सत्र व्यवस्थित पार पडेल, याची काळजी संस्थांना घ्यावी लागेल. यासाठी ते ऑनलाईन क्लासेससारखे उपाय करू शकतात. दूरदर्शन आणि इतर शैक्षणिक चॅनल्सची मदतही घेतली जाऊ शकते.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

- मंदिरं, मशिदी, गुरुद्वारे अशी सर्व धार्मिकस्थळं 3 तारखेपर्यंत बंद राहतील. कुठल्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही.
- लग्न सोहळे, सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, राजकीय कार्यक्रम, परिषदा आणि क्रीडा स्पर्धांचं आयोजन करता येणार नाही.
- अंत्यसंस्कारावेळीसुद्धा 20 पेक्षा जास्त जण उपस्थित राहू शकणार नाहीत.
- सार्वजनिक ठिकाणी जाताना चेहऱ्याला मास्क किंवा इतर कुठल्याही कापडाने झाकणं यापुढे सर्वांनाच बंधनकारक असेल.
- रेशनची दुकानं, भाजीपाला, औषधं, किराणा, दूध, मांस, मच्छीमार्केट खुले राहणार.
- बँका, एटीएम सुरू राहतील. शेअर बाजारही सुरू राहील.
- मात्र, लोकांना होणारा त्रास लक्षात घेता 20 एप्रिलपासून काही गोष्टींमध्ये सवलत दिली जाऊ शकते. म्हणजेच 20 एप्रिलपासून काही उद्योग-व्यवसाय सुरू करता येतील.
- शेती, हॉर्टिकल्चर आणि शेतीशी संबंधित व्यवहार सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल.

फोटो स्रोत, Getty Images
- मनरेगाचं काम सुरू करता येईल. मात्र, काम करताना त्यांना सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करावं लागेल.
- शेतीचं साहित्य आणि पुरवठा साखळीशी संबंधित कामं करता येतील.
- औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि मेडिकल उपकरणांचं उत्पादन करणारे कारखानेही उघडता येतील.
- चहा, कॉफी आणि रबर उत्पादन क्षेत्राला निम्म्या कामगारांसह काम करण्याची परवानगी दिली जाईल.
- तेल आणि गॅस क्षेत्राशी संबंधित सर्व व्यवहार सुरू राहतील.
- टपाल सेवाही सुरू राहील आणि देशभरातील पोस्ट ऑफिसेस उघडण्यात येतील.
- गौशाळा आणि जनावरांचे शेल्टर होम (चारा छावणी) खुले राहतील.
- महामार्गावरील ढाबे, ट्रक दुरुस्तीची दुकानं, प्लंबर, मोटर मेकॅनिक, सुतारकाम करणारी दुकानं आणि अशाच प्रकारचे स्वयंरोजगार करणाऱ्यांना कामाची परवानगी देण्यात येईल. मात्र, या सर्व सवलती कोरोनाची हॉटस्पॉट आणि कॉन्टेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्यांना देण्यात येणार नाही.
- 30 एप्रिलपासून ग्रामीण भागातील उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी मिळेल. मात्र, त्यासाठीसुद्धा सोशल डिस्टंसिंगचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असणार आहे.
- राज्य सरकार किंवा केंद्र शासित प्रदेशांना या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मात्र, आपापल्या राज्यांची परिस्थिती आणि गरज बघता संबंधित राज्यं किंवा केंद्रशासित प्रदेश लॉकडाऊन अधिक कठोर करू शकतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




