कोरोना संकट: पवार म्हणतात काटकसर करा, वायफळ खर्च टाळा, आर्थिक संकट मोठं

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

शरद पवारांनी फेसबुकवरून लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देताना लोकांना जाणीव करून दिली आहे की राज्यावर आणि देशावर मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. त्यासाठी सरकार योग्य वेळी पावलं उचलेल, पण लोकांनी आतापासूनच काटकसरीने वागायला हवं, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

शरद पवारांच्या फेसबुक लाईव्हमधले 11 महत्त्वाचे मुद्दे:

  • हे खूप मोठं संकट आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. सरकारी सूचनांचं तंतोतंत पालन करा.
  • आजचा तातडीचा प्रश्न आरोग्याचा. 2-3 आठवड्यांनंतर आर्थिक प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागेल. उद्योगधंदे बंद ठेवल्याने अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम.
  • सगळ्यांना आर्थिक परिणाम भोगावे लागू शकतील. त्यासंबंधीचे निर्णय सरकार घेईल. लोकांनी काटकसर करावी. वायफळ खर्च थांबवावा.
  • संकटकाळात दवाखाने बंद ठेवणं ही गंभीर बाब. ज्यांना वैद्यकीय ज्ञान आहे, त्या सर्वांनी (BAMS, BHMS) मदत करावी.
  • ऊसतोड कामगारांची कारखान्यावरच सोय करण्यात यावी.
  • राज्याला पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा उपलब्ध आहे.
  • कुणी साठेबाजी करत असेल, तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागले. कठोर पावलं टाकली जातील. ही कमाईची संधी नाही. ही मदत करण्याची संधी आहे.
  • राज्य सरकार, अधिकारी हे सांगतील तेच ऐका. व्हॉट्सअपवर गोष्टी पसरवू नका.
  • खासगी फायनान्सवाले त्रास देत असतील तर शासनाला किंवा मला सांगा.
  • शहरांतून गावांकडे जाणं टाळावं. गावकऱ्यांनाही भीती की शहरातून रोग येईल.
  • केळी उत्पादकांना थोडं नुकसान सहन करावं लागू शकतं. सरकार त्यांना शक्य होईल ती मदत करेल.
कोरोना
लाईन
Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

कोरोना संकटाचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, विश्लेषण ऐकण्यासाठी आणि मतं व्यक्त करण्यासाठी सहभागी व्हा बीबीसी मराठीच्या कोरोना पॉडकास्टमध्ये रोज रात्री 8 वाजता फेसबुकरव LIVE.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)