कोरोना: देशभरात 21 दिवस लॉकडाऊन आणि नरेंद्र मोदी यांच्या 12 महत्त्वाच्या घोषणा

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यरात्री 12 वाजल्यापासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. 21 दिवसांकरता म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 महत्त्वाच्या घोषणा

1.आज रात्री 12 वाजल्यापासून पूर्ण देशात लॉकडाऊन.

2.सर्व राज्यं, शहरं, गावं 3 आठवडे बंद. घरातून बाहेर निघण्यावर पूर्णतः बंदी.

3.मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही देशात जिथे कुठे आहात तिथेच राहा.

4.तज्ज्ञ सांगतात की संक्रमण रोखण्यासाठी 3 आठवडे आवश्यक. तसं केलं नाही तर देश 21 वर्षं मागे जाईल.

5.तुमच्या घराबाहेर लक्ष्मणरेषा आखण्यात आलीये. तुम्ही त्यापलीकडे टाकेलेलं एक पाऊल आजाराला घरात आणेल.

6.इटली आणि अमेरिका या देशांमधल्या पायाभूत सुविधा उत्तम आहेत, तरी तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली.

7.हा आजार इतक्या वेगाने पसरतो की कितीही तयारी केली तरीही संकट मोठं होत जातं.

8.सोशल डिस्टन्सिंग (घरात बसून राहणं) हा कोरोनाचा मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग आहे.

9.एकदा कोव्हिड पसरू लागला की थांबवणं फार कठीण जातं. म्हणून आत्ताच संक्रमण थांबवावं लागेल.

10.गरिबांसाठी कठीण काळ आहे. सरकार आणि संघटना गरिबांच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहेत.

11.हॉस्पिटल्सना सुसज्ज करण्यासाठी 15 हजारो कोटी रुपये खर्च करणार आहोत.

12.देशभरात मेडिकल आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षणासाठी काम सुरू झालं आहे.

कोरोना
लाईन

कोरोना व्हायरसबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून भाषण केलं. त्यांनी जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल भारतीयांचे आभार मानले. तसंच, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं.

21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तू म्हणजेच किराणा, भाजीपाला, दूध, मेडिकल सुरू राहतील असं पंतप्रधान मोदींनी ट्वीटद्वारे स्पष्ट केलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"जिथे आहात तिथेच राहा. तुमच्या घराभोवती लक्ष्मणरेषा आखून घ्या. आपल्याला घरातच राहायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग अत्यावश्यक आहे. देशाच्या पंतप्रधानापासून गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांना लागू आहे. कोरोनाचा संसर्ग आपल्याला रोखायचं आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची आहे. आपली आताची कृती कोरोनामुळे होणारं नुकसान कमी होऊ शकतं", असं पंतप्रधान म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "जान है तो जहाँ है' हे लक्षात ठेवा. धैर्य आणि शिस्तीने वागायची आवश्यकता. डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. कठीण काळातही हॉस्पिटल प्रशासन काम करत आहे. परिसर सॅनिटाईझ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा विचार करा. पोलीस, प्रसारमाध्यमं यांचा विचारा करा.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे जे आवश्यक ते आपण करत आहोत. जागतिक आरोग्य संघटना, देशभरातील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच हा निर्णय घेतला आहे".

आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी एन-95 मास्क, पीपीई किट तसंच अन्य अत्यावश्यक उपकरणं युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी एक बॅनर दाखवला- को-कोई, रो-रोड पर, ना-ना निकले.

कोणत्याही अफवा आणि अंधविश्वास यांच्यावर विश्वास ठेऊ नका. अफवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो. केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा. डॉक्टरांच्या सल्याविना औषध घेऊ नका. तुमची एक कृती तुमचा जीव धोक्यात टाकू शकते.

21 दिवसांचा वेळ खूप आहे. परंतु आपल्या आयुष्यासाठी ते महत्त्वाचं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)