कोरोना व्हायरसवर उपाय सुचवा आणि 1 लाख जिंका- सरकारची योजना : #5मोठ्याबातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी, कोरोना,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी

आजची विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. कोरोनावर उपाय सुचवा आणि 1 लाख जिंका, पंतप्रधान मोदींचं ट्वीट

कोरोना विषाणूवर उपाय सुचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरद्वारे आवाहन केलं आहे. यासाठी केंद्र सरकारकडून Covid-19 Solution Challenge अशी स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. या स्पर्धेत जिंकणाऱ्यांना 1 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. 'टीव्ही9' ने ही बातमी दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पंतप्रधान मोदी यांनी एक लिंक शेअर केली आहे. ही लिंक स्पर्धेच्या पेजवर घेऊन जाते. हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं अधिकृत पेज आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र तसंच राज्य सरकार सर्वतोपरी मेहनत घेताना दिसून येत आहे. सरकारकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीही कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. कोरोनाला थांबवण्यासाठी तांत्रिक मदत देणाऱ्यांचंही स्वागत आहे. कोरोना विरोधातील लढ्यात सहभागी व्हा असं Covid-19 Solution Challenge पेजवर म्हटलं आहे.

2. गुजरातमध्ये 5 काँग्रेस आमदारांचे राजीनामे

26 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले. काँग्रेस आपल्या आमदारांना जयपूरला स्थलांतरित करण्याच्या विचाराधीन असतानाच हे राजीनामे दिले आहेत. 'इंडिया टुडे'ने ही बातमी दिली आहे.

काँग्रेसने 14 आमदारांचा पहिला गट जयपूरला रवाना केला. त्यापैकी 4 आमदारांनी राजीनामे दिले. जे. व्ही. काकडिया आणि सोमाभाई पटेल यांचा त्यात समावेश आहे.

दरम्यान काँग्रेस पक्षात फूट पडली नसल्याचा दावा विरजीभाई थुमर यांनी केला. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेसने आमदारांना जयपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

182 सदस्यीय गुजरात विधानसभेत भाजपकडे 103 तर काँग्रेसकडे 73 जागा आहेत. भारतीय ट्रायबल पार्टी यांचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य आहे. तर एक अपक्ष उमेदवार आहे. 2 जागा रिक्त आहेत.

भाजपला राज्यसभेची तिसरी जागा जिंकण्यासाठी क्रॉस व्होटिंगची आवश्यकता आहे. त्यांना 111 मतांची आवश्यकता आहे.

काँग्रेसला 74 मतांची आवश्यकता असून, जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

3. निर्भयाच्या दोषींची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव

निर्भया बलात्कारप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तिघा दोषींनी आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता या तिघांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका दाखल केली आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

निर्भया, कायदा आणि सुव्यवस्था

फोटो स्रोत, delhi police

फोटो कॅप्शन, निर्भया प्रकरणातील दोषी

दिल्ली न्यायालयाने चारही आरोपींना 20 मार्च रोजी फासावर लटकवण्याचे आदेश दिले होते. सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब करून झाल्यानंतर आता तिघा दोषींनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.

चारही आरोपींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

3. कांदा निर्यातीसाठी लोडिंग सुरू

केंद्र सरकारने 15 मार्चपासून कांदा निर्यात आणि साठवणुकीवरील निर्बंध उठवल्यानंतर राज्यातील कांदा बाजारपेठेत निर्यातीची लगबग सुरू झाली आहे. आखाती देशांमध्ये दुबई, ओमान, मस्कतसह दक्षिण आशियातील सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका या देशातील आयातदारांकडून मागणी असून सहा महिन्यांनंतर सुरू झालेल्या निर्यातीमुळे कांदा दरात सुधारणा अपेक्षित आहे. 'अॅग्रोवन'ने ही बातमी दिली आहे.

कांदा, आयात-निर्यात
फोटो कॅप्शन, कांदा

कांदा निर्यात प्रक्रिया सुरळीत होण्याबाबतची अधिसूचना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने वेबसाईटवर जाहीर केली. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांदा निर्यातीसाठी मालाची लोडिंग करून माल बंदरावर पाठवायला सुरुवात केली आहे.

उन्हाळी कांद्याच्या दरात वाढ झाल्यानंतर वाणिज्य मंत्रालयाने दर नियंत्रित करण्यासाठी निर्यात प्रक्रियेवर केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 निर्बंध आणले होते.

5. जेएनयूमधील एका रस्त्याला सावरकरांचे नाव

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका रस्त्याला विनायक दामोदर सावरकर यांचं नाव देण्यावरून वादंग झाला आहे. 'आऊटलुक'ने ही बातमी दिली आहे.

एक्झिक्युटिव्ह काऊंसिल मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रमोद कुमार यांनी सांगितलं. दरम्यान जेएनयू विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष आयशी घोष यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

गेल्या वर्षी दिल्ली विद्यापीठात सावरकरांचा पुतळा उभारण्यावरून वाद निर्माण झाला होता. प्रशासनाची परवानगी न घेता हा पुतळा उभारण्यात आला होता. नंतर विद्यार्थी संघटनेने हा पुतळा हटवला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)