डोनाल्ड ट्रंप आणि मीम्सची भिंत; 'ये दीवार टूटती क्यूँ नही'!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांची पत्नी मेलॅनिया ट्रंप भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.

या दोन दिवसात ते दिल्ली आणि अहमदाबादचा दौरा करतील. अहमदाबादमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर एक झोपडपट्टी येते. ही झोपडपट्टी लपवण्यासाठी एक भिंत उभारण्यात येणार आहे. मात्र, स्थानिकांकडून याला विरोध होतोय. ही झोपडपट्टी अहमदाबाद एअरपोर्टहून साबरमती आश्रमाच्या मार्गावर आहे.

या प्रकारामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स शेयर केले जात आहेत.

एका प्रसिद्ध जाहिरातीत ये दिवार तुटती क्यूँ नही असं वाक्य होतं. एका नेटिझनने त्याची आठवण करून दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)