You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखील सोबत होते.
काँग्रेसबरोबर सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेतली.
याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळेस आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊतही उपस्थित होते. या भेटीत अनेक विषयांवर चांगली चर्चा झाली असं उद्धव यांनी स्पष्ट केलं.
राज्य आणि केंद्रात समन्वय कसा साधला जाईल याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
CAA आणि NRC बद्दल कुणीही घाबरू नये असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. जेव्हा जनगणना होईल तेव्हा सर्वांनाच आपली माहिती द्यावी लागेल. जनगणनेसाठी सर्वांनाच रांगेत उभं राहावं लागेल, असं ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले, "देशातलं एक महत्त्वाचं राज्य म्हणून केंद्राचं आम्हाला सहकार्य लागेल असं मी पंतप्रधानांना सांगितलं. सीएए, एनआरसी, एनपीआरवर चर्चा झाली आणि त्यावर मी माझी भूमिका स्पष्ट केली. CAAमुळे घाबरण्याची गरज नाही. त्यामुळे लोकांना देशातून काढून टाकण्यात येणार नाही. कोणाचेही अधिकार मी कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही."
जीएसटीच्या विषयावरही चर्चा झाली असं उद्धव यावेळेस म्हणाले. पंतप्रधान कृषी विमा योजना आणि जीएसटीचे पैसे यावेत यासाठी आमचं बोलणं झालं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)