You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतीय महिला खेळाडूंनी आतापर्यंत किती पदकं जिंकली आहेत?
1951 सालापासून आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी 698 पदकं जिंकली आहेत.
पदकांबाबत बीबीसीचं विश्लेषण असं असांगतं की, 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत भारतीय महिला खेळाडूंनी 201 सुवर्ण, 240 रौप्य आणि 257 कांस्य पदकं जिंकली आहेत.
भाारतीय महिला खेळाडूंनी कुठं सर्वोत्कृष्ट कामगिरी केली?
एशियन समर गेम्समध्ये सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. 1951 सालापासून भारतीय महिला खेळाडूंनी एकूण 206 पदकं जिंकली. एशियन समर गेम्स दर चार वर्षांनी आयोजित केले जातात.
2014 आणि 2018 मध्ये भारतीय महिला खेळाडूंनी 67 पदकं जिंकली.
राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय महिला खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. 1978 सालापासून आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी 160 पदकं जिंकली. ही एकमेव अशी स्पर्धा आहे, जिच्यात सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी एकूण 58 सुवर्ण, 61 रौप्य आणि 38 कांस्य पदकं जिंकली आहेत.
इव्हेंटवर क्लिक करून वर्षनिहाय जिंकलेल्या पदकांची माहिती जाणून घ्या.
कोणत्या खेळात सर्वाधिक पदकं जिंकली?
भारतानं अॅथलेटिक्स, नेमबाजी आणि धनुर्विद्या या क्रीडा प्रकारांमध्ये सर्वाधिक पदकं जिंकली. भारतीय महिला खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये एकूण 156, नेमबाजीत 137 आणि कुस्तीत 73 पदकं जिंकली आहेत. बॅडमिंटनमध्ये 70, हॉकीत 10, धनुर्विद्येत 65 आणि बॉक्सिंगमध्ये 45 पदकं जिंकली आहेत. हे सुद्धा असे खेळ आहेत, जिथं भारतीय महिला खेळाडूंचा दबदबा राहिलाय.
कार्यपद्धती :
हा डेटाबेस तयार करण्यासाठी बीबीसीच्या डेटा टीमनं स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्या स्पर्धांच्या आकड्यांचा अभ्यास केला, ज्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला होता आणि पदकं (सुवर्ण, रौप्य आणि कांस्य) जिंकली.
भारतीय महिलांनी 1951 साली पहिल्यांदा पदक जिंकलं होतं. त्यामुळे या डेटाबेसची सुरुवात 1951 सालापासून होते. इथं तुम्ही प्रत्येक स्पर्धा, खेळ आणि विश्वचषकाची यादी पाहू शकता. बीबीसीच्या डेटा टीमनं या यादीत अधिकाधिक पदकांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे.
जर कुठली स्पर्धा आमच्या नजरेतून सुटली असेल, तर तुम्ही लक्षात आणून द्या. जणेकरून आम्ही यादीत तिचा समावेश करू शकू. या डेटाबेसमध्ये क्रिकेट विश्वचषक आणि क्रिकेटच्या इतर स्पर्धांची माहिती समाविष्ट करण्यात आली नाही. कारण या खेळात पदक दिलं जात नाहीत.
कुठल्याही खेळात ज्यावेळी एखादी टीम विजय मिळवते, त्यावेळी टीममधील प्रत्येकाला पदकानं गौरवलं जातं. म्हणजेच, एखादी हॉकी टीम पदक जिंकली असेल, तर टीममधील प्रत्येक खेळाडूला त्याच्या नावासह पदक दिलं जातं. यामुळं डेटाबेसमधील पदकांच्या संख्येत कोणताही फरक पडत नाही. टीममधील प्रत्येक खेळाडूला स्वतंत्र पदक देऊन प्रत्यक्षपणे हे सांगितलं जातं की, टीमच्या विजयात प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे.
चॅम्पियनशिपची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
विश्लेषण: शादाब नजमी
डेटा सपोर्ट: अन्या आफताब
डेव्हलपमेंट: ओली पॅटिन्सन आणि ध्रुव नेवानी
इन्फोग्राफिक: गगन नऱ्हे, निकिता देशपांडे आणि पुनित बरनाला
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)