You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
New Year 2020 : नवीन वर्षात किती सुट्ट्या मिळणार?
नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर एका गोष्टीची सगळ्यांनाच उत्सुकता असते, ती म्हणजे यंदा आपल्याला किती सुट्ट्या मिळणार आहेत.
2020 च्या कॅलेंडरमध्येही किती लाल चौकटी असतील, हा विचार तुम्हीही करत आहात का? महाराष्ट्र सरकारनं 2020 मधली सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार यावर्षी एकूण 24 सुट्ट्या मिळणार आहेत.
2020 मध्ये एकूण 24 सुट्ट्या मिळणार आहेत. त्यापैकी प्रजासत्ताक दिन, पारशी नववर्ष दिन, मोहरम आणि दसरा या सुट्ट्या रविवारी आल्या आहेत.
गुड फ्रायडे (6 एप्रिल), महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर), ख्रिसमस (25 डिसेंबर) सारख्या सुट्टया शुक्रवारी येत असल्यामुळे या महिन्यांमध्ये शुक्रवार-शनिवार-रविवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टीही तुम्हाला मिळू शकते.
नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना सुट्याच सुट्या मिळणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात 14 दिवस बँका बंद राहतील. बँकाना असलेल्या सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यातील सुट्टयांसोबतच दुसरा आणि चौथा शनिवार तसंच चार रविवारचाही समावेश आहे. त्यामुळे बँक हॉलिडेचा विचार करूनच या महिन्यात तुमच्या कामांचं नियोजन करा.
याव्यतिरिक्त बँकांना वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी 1 एप्रिल 2020ला सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी बँकांपुरती मर्यादित असेल, ती शासकीय कार्यालयांसाठी लागू नसेल
सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे -
नरेंद्र मोदी, राहुल गांधींकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा
नवीन वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी म्हटलंय, "2020 या वर्षासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. येणारं वर्ष तुमच्या सगळ्यांसाठी आनंददायी, आरोग्यदायी आणि स्वप्नांची पूर्तता करणारं ठरो."
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"नवीन वर्षाचं स्वागत आपण सगळ्यांनी आनंदानं आणि उत्साहानं करूया," असं त्यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)