देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या शपथविधीवर काय म्हणतात आजची वृत्तपत्रं

पेपर

कालच्या राजकीय भूकंपाच्या दिवसाची सुरुवात अशी झाली, की वृत्तपत्र उघडायच्या आधीच त्यातली बातमी शिळी झाली होती. आज काय होतंय, कुणास ठाऊक!

दरम्यान, कालच्या नाट्यमय घडामोडींनंतर आजचे पेपर पाहणं उत्सुकतेचं होतं. म्हणून आज पाहा मराठीतील प्रमुख वृत्तपत्रांचे पहिले पान एकाच ठिकाणी.

लोकसत्ता- "सत्तासिंचनाचा नवा प्रयोग"

देवेंद्र फडणवीस, अजित पवार

फोटो स्रोत, Loksatta

फोटो कॅप्शन, लोकसत्ताचे मुखपृष्ठ

"

एका महिन्याच्या सत्तानाट्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सरशी होत असल्याचे दिसत असतानाच शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अचानक खेळाचे फासे पालटले. उभा महाराष्ट्र नव्या आघाडीकडे उत्सुकतेने पाहत असताना शनिवारी सकाळी राजभवनावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राजकीय वर्तुळास धक्का दिला. बंडखोर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बहुमताच्या परीक्षेत भाजपवर मात करण्याचा महाआघाडीचा निर्धार.

"

महाराष्ट्र टाइम्स- "अजित पवार यांचे बंड"

मटाचे पहिले पान

फोटो स्रोत, Maharashtra Times

फोटो कॅप्शन, 'मटा'चे पहिले पान

'महाराष्ट्र टाईम्स'ने अजित पवार यांच्या बंडाला महत्त्व दिले असून, अजित पवारांच्या नाराजीची शक्यता सांगितली आहे. रोहित पवार यांच्या प्रवेशामुळे, पार्थ पवार यांच्या पराभवाच्या धक्क्यामुळे राजकारणात आपल्याला डावललं गेल्याची सल अजित पवार यांच्या मनात होती. त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं कळतं, असं मटाने म्हटलं आहे.

सकाळ - "अंधारातील सत्तानाट्य"

सकाळचं पहिलं पान

फोटो स्रोत, Sakal

फोटो कॅप्शन, सकाळचं पहिलं पान

"राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सरकारस्थापना उंबरठ्यावर असताना भाजपने मध्यरात्री केलेल्या राजकीय खेळीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडाची साथ लाभून राजकीय भूकंप झाला. सकाळने राज्यातली राष्ट्रपती राजवट केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीविना कशी हटवली गेली याचा तपशील दिला आहे. हा निर्णय पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पातळीवर झाल्याचं म्हटलं आहे. मंत्रिमंडळाचे प्रमुख या नात्याने पंतप्रधानांना विशेष अधिकार देणाऱ्या नियम 12च्या अन्वये ही प्रक्रिया पार पडल्याचं समजतं," असं सकाळने म्हटलं आहे.

लोकमत- "अजित पवारांचे बंड; मुख्यमंत्री देवेंद्र"

लोकमत

फोटो स्रोत, Lokmat

'लोकमत'नेही अजित पवारांचे बंड अग्रस्थानी दिलं आहे. फडणवीस यांचं 'ऑपरेशन महाराष्ट्र' असंही म्हटलं आहे. पुतण्याच्या बंडानंतरही शरद पवारांनी पक्षाला सावरलं असल्याचं म्हटलं आहे.

सामना - "काळा दिवस! भाजपचा चोरून शपथविधी"

सामनाचं पहिलं पान

फोटो स्रोत, Saamana

फोटो कॅप्शन, सामनाचं पहिलं पान

भाजप विरुद्ध शिवसेना या एकेकाळच्या मित्रपक्षांमध्ये वैर आता किती प्रबळ झालं आहे याची झलक सामन्याच्या वृत्तांकनातून मिळते. "काळा दिवस" असं सामनाने कालच्या दिवसाचं वर्णन केलं आहे. "भाजपने चोरून शपथविधी केला", "12 तासातच अजितदादांच्या बंडाचे 12 वाजले" असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ने पारडं आमच्या बाजूने आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

दिव्य मराठी - "मी (लपून-छपून) आलो!"

'दिव्य मराठी'चं पहिलं पान

फोटो स्रोत, Divya Marathi

निवडणूक प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं "मी पुन्हा येईन" हे वाक्य चांगलंच गाजलं होतं. त्याचा आधार घेत दिव्य मराठीने "मी (लपून-छपून) आलो!" अशी खोचक टिप्पणी केली आहे. 'महाराष्ट्राचे महाभारत; पुन्हा भाजपचेच सरकार', असं दिव्य मराठीने म्हटलं आहे.

(वरील सर्व वृत्तपत्रांवरील मजकूर - बातम्या आणि जाहीरातींवर त्या-त्या वृत्तपत्रांचा कॉपीराईट अधिकार आहे. बीबीसी त्यापैकी कुठल्याही मजकुरासाठी जबाबदार नाही.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)