निकाल LIVE : युतीला बहुमत पण भाजपचे आकडे घटले, आता शिवसेना काय करणार?

देवेंद्र फडणवीस शरद पवार

विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजप 102 जागांवर आघाडीवर आहे. 2014 साली भाजपला 122 जागा होत्या. शिवसेनेला 61 जागांवर आघाडी आहे. 2014 साली शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांवर आघाडीवर आहे. 2014 साली राष्ट्रवादीला 41 जागा होत्या. काँग्रेस 41 जागांवर आघाडीवर आहे. 2014 साली काँग्रेसला 42 जागा मिळाल्या होत्या.

6.30- कोथरुड मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा 25495 मतांनी विजय. त्यांनी मनसेच्या किशोर शिंदे यांचा 25495 मतांनी पराभव केला.

6.00- मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके यांनी भाजपाचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव केला. भोसरी मधून भाजपच्या महेश लांडगे यांचा विजय झाला असून, त्यांनी अपक्ष विलास लांडे यांचा पराभव केला. जुन्नर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांचा विजय झाला असून,त्यांनी शिवसेनेच्या शरद सोनवणे यांचा पराभव केला.आंबेगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांचा विजय झाला. खेड आळंदी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते विजयी झाले असून, त्यांनी शिवसेनेच्या आमदार सुरेश गोरेंचा पराभव केला. शिरूर मधून अशोक पवार यांचा विजय

5.45- दिग्रस येथून शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड 63,607 मतांनी विजयी झाले आहेत. राळेगावात भाजपचे अशोक उईके 10,141 मतांनी विजयी विजयी झाले आहेत. उमरखेड मतदारसंघातून भाजपचे नामदेव ससाणे 9,427 मतांनी विजयी झाले आहेत. पुसदमधून राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक 9,750 मतांनी विजयी झाले आहे. भाजपचे उमेदवार आमदार निलय नाईक पराभूत झाले आहेत.

5.05- बीड मतदारसंघात राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा 1770 मतांनी विजयी.

4.55- दौंडमध्ये राष्ट्रवादीचा निसटता पराभव. भाजप उमेदवार राहुल कुल यांचा ६१८ मतांनी विजय. चुरशीच्या लढतीत राहुल कुल यांची सरशी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश थोरात यांना विजय घोषित करण्यात आलं होतं. मात्र यावर राहुल कुल यांनी आक्षेप घेत फेर मोजणी घेतली. त्यात राहुल कुल यांना 618 मतांच्या फरकाने विजय झाला आहे.

4.50- 'उद्धव ठकरेंची पत्रकार परिषद मी ऐकली आहे आमचं जे ठरलं आहे त्यानुसारच आम्ही पुढे जाऊ'-देवेंद्र फडणवीस

मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो त्यांनी माझं अभिनंदन केलं आहे मी त्यांचं अभिनंदन केलं आहे, सरकार महायुतीचच येणार आहे, असंही त्यानी पुढे म्हटलंय.

4.50- 'महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. 164 जागा लढवूनही आम्ही 26 टक्के मतं मिळवली. आमचा स्ट्राईक रेट 70 टक्क्यांच्या आसपास आहे. ही विजय साजरा करण्याची वेळ आहे, विश्लेषणाची नाही. सातारा आणि परळीतला पराभव विचार करायला लावणारा आहे. आमच्या काही मंत्र्यांचे पराभव झाले आहेत. दोन्ही पक्षांना बंडखोरीचा फटका बसला आहे. अपक्षांपैकी 15 जण आमच्याबरोबर आहेत', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

4.42- राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदे यांना 43,357 मतांनी नमवलं.

4.40- 'जनतेने डोळे उघडले आहेत. लोकसभेवेळी 50-50चा फॉर्म्युला ठरला होता. निम्म्या जागा घ्यायच्या असं ठरलं होतं. आमची अडचण उद्धवजी समजून घेतील असं चंद्रकांतदादा म्हणाले होते. जागावाटपात समजून घेतलं. पण मुख्यमंत्रीपदाच्यावेळी त्यांच्या अडचणीत वाढ होईल. कारण मला पक्ष वाढवायचा आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि आम्ही चर्चा करू. पारदर्शकपणे चर्चा करून सत्तास्थापनेचा दावा करू'- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख.

4.35- जळगाव मतदारसंघातून भाजपचे सुरेश दामू भोले विजयी. जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी विजय मिळवला. भुसावळमधून संजय सावकारे विजयी. काँग्रेसचे शिरीष चौधरी, एरंडोलमध्ये शिवसेनेचे चिमणराव पाटील आणि अंमळनेरमध्ये अनिलभाईदास पाटील विजयी. चोपडा इथं शिवसेनेच्या लता सोनावणे, जामनेर इथं गिरीश महाजन, शिवसेनेचे किशोर पाटील आणि भाजपचे मंगेश चव्हाण चाळीसगाव इथं विजयी

4.30-संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा 62000 मतांनी विजय. शिर्डीत भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी ठरले. काँग्रेसचे लहूजी कानडे श्रीरामपूर मतदारसंघातून अव्वल. अकोलेमधून राष्ट्रवादीचे किरण लहामटे यांचा 57 हजारांनी दणदणीत विजय. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे विजयी. नेवासामधून अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख यांचा 31 हजारांनी विजय. कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा अटीतटीच्या लढतीत विजय

4.15-पृथ्वीराज चव्हाण विजयी. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा 9 हजार 132 मतांनी विजय झाला आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे अतुल भोसले यांनी निवडणूक लढवत होते.

3.50- 'पराभवाची कारणं शोधावी लागतील. पक्षाला कल्पना दिली होती. जनतेनं नाकारलं हे सत्य स्वीकारावं लागेल. पुढची मार्गक्रमणा ठरवलेली नाही'- एकनाथ खडसे

3.40- बडनेरा मतदारसंघातून रवी राणा तिसऱ्यांदा विजयी. त्यांना 76337 मते मिळाली असून, त्यांनी 16347 मतांनी विरोधातील शिवसेनेच्या प्रीती बंड यांचा पराभव केला आहे. बंड यांना 60113 मते मिळाली आहेत. निफाडमधून राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विजयी.

3.30- बागलाण मतदारसंघातून भाजपचे दिलीप बोरसे यांनी राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण यांचा पराभव करत बाजी मारली.

3.25- मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी पराभूत. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीनाट्यामुळे बहुचर्चित मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पराभवाचा धक्का बसला. अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंचा पराभव केला. चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला होता.

3.25-विनय कोरे शाहूवाडी मतदारसंघातून विजयी.

3.20- चिंचवड मतदारसंघातून भाजपचे लक्ष्मण जगताप विजयी

3.20- अचलपूर मतदारसंघातून प्रहारचे बच्चू कडू चौथ्यांदा विजयी

3.00- कागल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ विजयी.

2.57- नागपुरात भाजपला धक्का. पश्चिम नागपूरमध्ये सुधाकर देशमुख तर नागपूर उत्तरमध्ये डॉ.मिलिंद माने यांचा पराभव झाला.

2.55- मिरजेत भाजपचे सुरेश खाडे विजयी तर तासगावमध्ये राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील विजयी. जतमध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत विजयी. खानापुरात शिवसेनेच्या अनिल बाबर यांना यश. काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांनी पलूस मतदारसंघात 1 लाख 62 हजार विक्रमी मतांनी विजयी. इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील सर्वोत्तम.

2.40-सांगलीत भाजपचे सुधीर गाडगीळ 6 हजार मतांनी विजयी.

2.35- चंदगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील साडेचार हजार मतांनी विजयी

2.30-कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण दोन्ही जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी. ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव विजयी.

2.00- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष या सर्वांनी परस्परांना सहकार्य केलं.

1.40-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार- 220 पार जनतेनं स्वीकारलेलं नाही. सत्तेचा उन्माद लोकांना आवडला नाही. पक्षांतरांचा निर्णय जनतेला भावलेला नाही. साताऱ्यात जाऊन जनतेचे आभार मानू. साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न जपणाऱ्यांना धडा. दिवाळीनंतर पक्षबांधणीसाठी सर्वसमावेशक बैठका.

1.30- परळी मतदारसंघात पंकजा मुंडे पराभूत. 'हा पराभव नम्रपणे स्वीकारते. पराभवाची जबाबदारी स्वीकारते. आमच्यासाठी हा निर्णय अनाकलनीय. काय चुकलं याचं चिंतन करू. गलिच्छ राजकारणातून मला मुक्त करा असं शेवटच्या सभेत सांगितलं होतं. त्यामुळे हलकं वाटतं आहे. पराभवाचा दोष कोणालाही देणार नाही', असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

1.25-वांद्रे पूर्व मतदारसंघात मुंबईचे माजी नगराध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर यांना कडवी टक्कर.

1.15-कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना मनसेच्या किशोर शिंदेंनी चांगली टक्कर दिली आहे. अकराव्या फेरीअखेर चंद्रकांत पाटील आघाडीवर.

1.10- नांदगाव मतदारसंघातून पंकज भुजबळ पिछाडीवर. सेनेचे सुहास कांदे आघाडीवर.

1.05-नंदुरबार मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार गावित विजयी झाले आहेत. त्यांना 1,20,825 मतं मिळाली आहेत, तर त्यांच्या विरोधातील उमेदवार काँग्रेसचे उदेसिंग पाडवी यांना 50,955 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात 1,87,358 इतकं मतदान झालं आहे.

12.55-पुरंदरमधून विजय शिवतारे पराभूत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय जगताप 30,820 मतांनी विजयी

12.55- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले 41255 मतांनी पिछाडीवर

12.50- बोरिवली मतदारसंघातून भाजपचे सुनील राणे आघाडीवर. सुनील तावडे यांच्याऐवजी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं होतं.

12.47-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक मुंबईतील अणुशक्ती नगरमधून आघाडीवर.

12.45-सोलापूर शहर मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे 7125 मतांनी आघाडीवर.

12.40-नालासोपारा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर आघाडीवर. माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा पिछाडीवर.

12.40- येवला मतदारसंघातून छगन भुजबळ सातव्या फेरीनंतर आघाडीवर.

12.37- कल्याण ग्रामीणमध्ये चुरशीचा मुकाबला. शिवसेनेचे रमेश म्हात्रे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात अटीतटीची लढत. रमेश म्हात्रे यांच्याकडे अल्प आघाडी.

12.35- ठाण्यात भाजपचे संजय केळकर आघाडीवर. याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने मनसेचे अविनाश जाधव चमत्कार घडवू शकतात अशी चर्चा होती. मात्र तूर्तास संजय केळकर यांनी आघाडी घेतली आहे.

12.30- डोंबिवलीत मनसेच्या मंदार हळबे यांना मागे टाकत भाजपचे रवींद्र चव्हाण आघाडीवर.

12.25- कराड दक्षिणमध्ये भाजपचे अतुल भोसले आणि काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत. उदयसिंह पाटीलही रिंगणात.

12.20- नवी मुंबईतील बेलापूर, पनवेल आणि ऐरोलीत भाजपचे उमेदवार आघाडीवर. बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे, पनवेलमधून प्रशांत ठाकूर आणि ऐरोलीतून गणेश नाईक यांनी आघाडी घेतली आहे.

12.05-बारामती मतदारसंघात अजित पवार प्रचंड आघाडीसह पुढे. अजित पवारांना भाजपमध्ये नव्याने दाखल झालेले गोपीचंद पडळकर टक्कर देणार का? अशी चर्चा होती मात्र मतदारांनी अजित पवारांनाच कौल दिला आहे.

11.55- भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव 11,933 मतांनी आघाडीवर आहेत. यामिनी जाधव यांना 20943, काँग्रेसच्या मधू चव्हाण यांना 9010 मते तर एमआयएमच्या वारिस पठाण यांना 5838 मते मिळाली आहेत.

11.53- वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात अॅड. आशिष शेलार यांना 45,599 मते तर आसिफ झकेरिया यांना 17,840 मते मिळाली आहेत.

11.47- धुळे जिल्ह्यात धुळे शहर मतदारसंघात अनिल गोटे आघाडीवर आहेत. अनिल गोटे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. धुळे ग्रामीण मतदारसंघातकाँग्रेसचे कुणाल पाटील यांना 548 मतांची आघाडी मिळाली आहे. तर साक्रीमध्ये मंजुळा गावित यांना 7270 मतांची आघाडी मिळाली आहे. शिंदखेडामध्ये पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना 38 हजार 700 मतांची तर शिरपूरमध्ये काशिराम पावरा यांना 17,122 मतांची आघाडी मिळाली आहे.

11.43- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे पहिल्या फेरीपासून पिछाडीवर आहेत. ताज्या आकडेवारीनुसार उदयनराजे भोसले 20,782 मतांनी पिछाडीवर आहेत.

11.40- शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना महायुतीतच राहाणार आणि सत्तेत 50 टक्के वाटा मिळवणार असे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या आकडेवारीनुसार शिवसेनेच्या जागांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. भाजपच्या जागांमध्ये मात्र घट झाल्याचं दिसून येतं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

11.34- मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजपच्या रोहिणी खडसे 3 हजार मतांनी पुढे आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या त्या कन्या आहेत.

11.32- येवला मतदारसंघातून छगन भुजबळ 10,257 मतांनी आघाडीवर आहेत.

11.29- पुण्यातील कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक यांना पाचव्या फेरीअखेर 30 हजारांचे मताधिक्य मिळाले आहेत. यापूर्वी गिरिश बापट या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.

11.20- 11 व्या फेरीअखेर परळी विधानसभेत धनंजय मुंडे 18,206 मतांनी आघाडीवर आहेत. धनंजय मुंडे 56716 मते तर पंकजा मुंडे यांना 385102 मते मिळाली आहेत.

11.10- इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील सहाव्या फेरीअखेर पिछाडीवर आहेत. त्यांना 27,456 मते मिळाली आहेत तर राष्ट्रवादीते दत्तात्रय भरणे यांना 30 हजार 438 मते मिळाली आहेत.

मोदी
फोटो कॅप्शन, मुंबई भाजपा कार्यालयाजवळ भाजपानं अशा प्रकारे तयारी केली आहे.

11.09-सांगलीमध्ये भाजपाचे सुधीर गाडगीळ 684 मतांनी आघाडीवर आहेत. मिरज मतदारसंघात सुरेश खाडे 16,576 मतांनी आघाडीवर आहेत. तासगावमध्ये सुमनताई पाटील यांना 52,216 मतांची आघाडी मिळाली आहे. जतमध्ये विक्रम सावंत 14 हजार मतांनी आघाडीवर आहेत. खानापूरमध्ये अनिल बाबर 7956 मतांनी तर पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम 51 हजार मतांनी आघाडीवर आहेत. जयंत पाटील इस्लामपूरमध्ये 14 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर शिराळ्यात राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

11.03- अकराव्या फेरीअखेर धनंजय मुंडे 18,206 मतांनी आघाडीवर आहेत. धनंजय मुंडे यांवा 56,716 मते मिळाली आहेत तर पंकजा मुंडे यांना 38,510 मते मिळाली आहेत.

11.02- येवला मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ 7479 मतांनी आघाडीवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर मतदारसंघात पी.एन. पाटील 2500 मतांनी आघाडीवर आहेत.

10.55- पाचव्या फेरी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 20,350 मते मिळाली आहेत. आशिष देशमुख यांना 9,216 मते मिळाली आहेत.

महायुतीला 178 जागांवर यश मिळत असल्याचे सध्या उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून दिसते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महायुतीला 178 जागांवर यश मिळत असल्याचे सध्या उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून दिसते

10.53- धनंजय मुंडे आठव्या फेरीअखेर 6561 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना 37,949 तर पंकजा मुंडे यांना 31,898 मते मिळाली आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

10.46- शिराळा मतदारसंघात मानसिंग नाईक 2700 मतांनी आघाडीवर आहेत. इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील 5500 मतांनी आघाडीवर आहेत. तासगावमध्ये सुमन पाटील 10 हजार मतांनी तर मिरजमध्ये सुरेश खाडे 3200 मतांनी आघाडीवर आहेत.

10.40- सातारा जावळी मतदारसंघात शिवेंद्रसिंह भोसले 1441 मतांनी आघाडीवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी मतदारसंघात सत्यजीत पाटील 3093 जागा कराड मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार 11,000 मतांनी आघाडीवर आहेत.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

10.30- तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर पिछाडीवर आहेत. तर दर्यापूर मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखडे 809 मतांनी आघाडीवर आहेत.

10.28- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले 30 हजार मतांनी पिछाडीवर

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

10.27- बारामती मतदारसंघातून अजित पवार आघाडीवर. तसेच हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला येथून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर.

10.23- पुण्यातल्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी थांबवण्यात आली आहे. इथं EVM मशीनबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत.

10.22- धुळ्यातील शिंदखेडा मतदारसंघात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी 23466 मतांची आघाडी मिळवली आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

10.15- वरळीमध्ये शिवसेनेचे आदित्य ठाकरे 11,893 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना 13834 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांना 1941 मते मिळाली आहेत.

10.14- मिरज मतदारसंघात भाजपचे सुरेश खाडे 13,364 मतांनी आघाडीवर. इचलकरंजी मतदारसंघात प्रकाश आवाडे 14185 मतांनी आघाडीवर आहेत. सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील 932 मतांनी तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात ऋतूराज पाटील काँग्रेस 8788 मतांनी आघाडीवर.

10.08- दुसऱ्या फेरीअखेर कोथरुड मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर. पाटील यांना 10,589 मतं तर मनसेच्या किशोर शिंदे यांना 4,555 मते मिळाली आहेत.

10.05- भाजप-शिवसेना युती 220 जागांवर विजयी होईल- राहुल नार्वेकर

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

10.04- नाशिक मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे 2584 मतांनी आघाडीवर आहेत.

10.03- कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदे यांना 11,251 आणि महेश शिंदे यांना 8910 मते मिळाली आहेत. शशिकांत शिंदे यांना 2341 मतांची आघाडी मिळाली आहे.

09.59- नागपूर दक्षिणमध्ये भाजपाचे मोहन मते 310 मतांनी तर नागपूर उत्तरमध्ये काँग्रेसचे नितीन राऊत 2 मतांनी आघाडीवर. नागपूरमध्य मध्ये भाजपचे विकास कुंभारे 1500 मतांनी आघाडीवर. दक्षिण पश्चिममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2560 मतांनी आघाडीवर

09.58- नागपूर पश्चिममध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे 174 मतांनी आघाडीवर

09.57- नागपूर पूर्व मतदारसंघात भाजप उमेदवार कृष्णा खोपडे यांना 4 हजार 901 मतांची आघाडी

09.51- कागलमध्ये राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफांना 10 हजार मतांची आघाडी

09.47- शाहूवाडी मतदारसंघात दुसऱ्या फेरीत शिवसेना सत्यजित पाटील 2650 मतांनी आघाडीवर

09.45- बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर हे पाचव्या फेरी अखेरीस अकराशे मताधिक्यानी राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्या पेक्षापुढे आहेत.

09.43- कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील आघाडीवर

09.40- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले 10000 मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील निवडणूक लढवत आहेत. इथं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही इथं सभा झाली होती.

09.38- अचलपूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार बच्चू कडू 2855 मताने आघाडीवर तर मेळघाट मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजकुमार पटेल 2954 मताने आघाडीवर आहेत.

09.37- सोलापूरमधून प्रणिती शिंदे पिछाडीवर

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ असलेला सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तर शिवसेनेचे दिलीप माने आघाडीवर आहेत. सोलापुरात प्रणिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नरसय्या आडम, एमआयएमचे फारुख शाब्दी आणि अपक्ष उमेदवार महेश कोठे रिंगणात आहेत. 2009 निवडणुकीत चारही पक्ष वेगळे लढल्याने भाजप आणि सेनेत झालेल्या मतविभाजनाचा प्रणिती यांना फायदा झाला होता.

09.36- बारामतीत दुसऱ्या फेरीअखेर अजित पवार 12229 मताने आघाडीवर, गोपीचंद पडळकर यांना दुसऱ्या फेरीअखेर 2470 मतं.

09.35- मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5093 मतांनी पुढे.

09.34- कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे चंद्रकांत जाधव 8300 मतांनी आघाडीवर आहेत.

09.30- अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी वरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे पिछाडीवर आहेत. महाआघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार आघाडीवर.

09.28- कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात ऋतूराज पाटील 6159 मतांनी आघाडीवर. त्यांच्याविरोधात भाजपचे अमल महाडीक निव़़डणूक लढवत आहेत.

09.27- फलटणमध्ये राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण 3128 मतांनी आघाडीवर तर वाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील 3900 मतांनी आघाडीवर

09.26- वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे 7020 मतांनी आघाडीवर

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

09.24- करवीर मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रदीप नरके 3834 मताने आघाडीवर

09.23- धुळे शहर मतदारसंघात अनिल गोटे 800 मतांनी आघाडीवर आहेत.

09.21- कराड मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर आहेत

09.18- अचलपूर मतदार संघ अपक्ष उमेदवार बच्चू कडू आघाडीवर

09.17- कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात ऋतूराज पाटील 9842 मतांनी आघाडीवर

09.16- पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजप सुधाकर देशमुख ५१२ मतांनी पुढे

09.15- सांगली जिल्ह्यात विविध मतदारसंघांमध्ये आघाडीवर असणारे उमेदवार पुढीलप्रमाणे

सांगली - आघाडीवर - काँग्रेस - पृथ्वीराज पाटील मिरज - भाजप - सुरेश खाडे इस्लामपूर - राष्ट्रवादी - जयंत पाटील शिराळा - राष्ट्रवादी - मानसिंगराव नाईक पलूस कडेगाव - काँग्रेस - विश्वजीत कदमखानापूर - शिवसेना - अनिल बाबरतासगाव - राष्ट्रवादी- सुमनताई पाटील जत - काँग्रेस - विक्रम सावंत

09.13- महाराष्ट्रात महायुतीने 177 जागांवर तर महाआघाडीने 79 जागांवर आघाडी मिळवली आहे. इतर पक्षांनी 9 जागांवर आघाडी मिळवली आहे.

09.12- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील 1089 आघाडीवर

09.11- वर्धा विधानसभा मतदारसंघात भाजपचे पंकज भोयर 700 मतांनी आघाडीवर, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार 1300 मतांनी आघाडीवर, देवळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रणजीत कांबळे 4267 मतांनी आघाडीवर, तर आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपचे दादाराव केचे 500 मतांनी आघाडीवर.

वर्ध्यात भाजपला 3 जागांवर आघाडी

09.10- बडनेरा मतदारसंघात महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आघाडीवर

09.08- सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले 1000 मतांनी पिछाडीवर

09.07- काटोल मतदारसंघात अनिल देशमुख (राष्ट्रवादी कॉग्रेस) 5050 चरणसिंह ठाकुर (भाजप) 4956 पहिला फेरीत अनिल देशमुख यांना 94 मतांची आघाडी.

09.05- शिर्डी मतदारसंघात भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील पहिल्या फेरीत 4613 मतांनी पुढे.

09.04- इचलकरंजी अपक्ष प्रकाश आवाडे यांची 5000 मतांची आघाडी

09.04- केज विधानसभा मतदार संघात भाजपाच्या नमिता मुंदडा ह्या पहील्या फेरी अखेरीस आघाडीवर

09.03- करवीर पहिल्या फेरीत शिवसेनेचे चंद्रदीप नरके 2446 मतांनी आघाडीवर

09.02- तासगावमध्ये सुमन आर पाटील पहिल्या फेरीत 5 हजारने आघाडीवर

09.01- नांदगाव मतदारसंघ- पंकज भुजबळ पिछाडीवर, सुहास कांदे शिवसेना आघाडीवर

09.00- सांगली - विटा खानापूर- पहिली फेरी 96 मतांनी शिवसेनेचे अनिल बाबर आघाडीवर. अपक्ष सदाशिव पाटील पिछाडीवर

08.58- सुरुवातीच्या कलांनुसार महायुतीला 167 जागांवर तर महाआघाडीला 68 जागांवर आघाडी मिळाली आहे.

08.54- अमरावतीत भाजपचे उमेदवार सुनील देशमुख 1897 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या सुलभा खोडके यांना 2339, तर भाजपच्या सुनील देशमुख यांना 4236 मतं मिळाली आहेत.

08.52- यशोमती ठाकूर पिछाडीवर- अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर 267 मतांनी पिछाडीवर आहेत. शिवसेनेचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी आघाडी घेतली आहे. 

08.50- सी व्होटरने दिलेल्या माहितीनुसार महायुतीचे उमेदवार 151 जागांवर तर महाआघाडीचे उमेदवार 57 जागांवर आघाडीवर आहेत.

08.47- सुरुवातीच्या कलांनुसार महायुतीचे उमेदवार 140 जागांवर आघाडीवर आहेत. म्हणजेच बहुमतापासून महायुती आता फारशी लांब नाही.

08.42- महायुतीचे उमेदवार 133 जागांवर तर महाआघाडीचे उमेदवार 51 जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर पक्षांचे व अपक्ष उमेदवार 5 जागांवर आघाडीवर आहेत.

08.39- सुरुवातीच्या कलानुसार महायुतीने पार केला 100 चा आकडा. महायुतीचे उमेदवार 112 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस महाआघाडीचे 45 उमेदवार आघाडीवर तर इतर पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार 3 जागांवर आघाडीवर आहेत.

08.37- बडनेरा मतदारसंघात महाआघाडी पुरस्कृत रवी राणा 623 मतांनी आघाडीवर आहेत तर शिवसेनेच्या प्रीती बंड पिछाडीवर आहेत.

08.36- सी व्होटरने दिलेल्या आकडेवारीनुसार महायुतीला 87 जागांवर आघाडी मिळाली आहे.

08.31- सकाळी येत असलेल्या सुरुवातीच्या कलानुसार महायुतीचे 73 जागांवर तर महाआघाडीचे उमेदवार 29 जागांवर आघाडीवर आहेत. ही आकडेवारी सी व्होटरने प्रसिद्ध केली आहे.

08.25- सी व्होटरने दिलेल्या सकाळी सुरुवातीच्या आकडेवारीमधून महायुतीला 64 जागांची तर महाआघाडीला 22 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे.

08.21- सुरुवातीच्या कलांनुसार महायुतीला 55 जागा तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला 21 जागांवर आघाडी मिळालेली दिसून येते.

08.15- सी व्होटरने दिलेल्या ताज्य़ा आकडेवारीनुसार भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीला 23 जागांवर तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला 6 जागांवर आघाडी मिळाली आहे.

8.00- मतमोजणीला सुरुवात. महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभांच्या निवडणुकांसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे.

मतमोजणी

फोटो स्रोत, ANI

7.57- महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. कोणताही नेता किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी येथे दिसत नाही.

काँग्रेसचे टिळक भवन

फोटो स्रोत, Abhijeet Kambale

07.42 निवडणुकांचे निकाल काही वेळात जाहीर होतील. त्याआधीच काही राजकीय पक्षांनी मिठाई आणि लाडूची तयारी करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयातील हे चित्र

भाजप प्रदेश कार्यालय

फोटो स्रोत, ANI

07.38- थोड्याच वेळात महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याममधील विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट व्हायला लागतील. मुंबईमधील कुलाबा येथील मतमोजणी केंद्रातील हे चित्र

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

07.02- निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यालय आतापासूनच सजल्याचे दिसून येते. आकाशदिवे तसेच भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांची पोस्टर्सही लावलेली दिसत आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

महाराष्ट्रातल्या 288 जागांसाठी सोमवारी मतदान झालं. संपूर्ण राज्यात यंदा 60 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. काही अपवाद वगळता राज्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडलं होतं.

निवजणूक कवरेज

सर्व एक्झिट पोल्सचे निकाल आले आहेत. सर्व पोल्सनुसार राज्यात पुन्हा शिवसेना भाजपचीच सत्ता येणार, असा अंदाज सर्व पोल्सनी व्यक्त केला आहे.

एक्झिट पोल

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)