विधानसभा निवडणूक निकाल: परळी, कणकवली, कोथरूड, कर्जत-जामखेड, सातारा लोकसभा निवडणूक - चुरशीच्या लढती

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागायला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलमधून भाजप-शिवसेना महायुतीकडेच महाराष्ट्राचा कल असल्याचं दिसत आहे.
कुणाला किती जागा मिळणार याबाबत उत्सुकता आहेच, पण राज्यातील काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
सोमवारी संध्याकाळी आलेल्या एक्झिट पोल्सनंतर बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे, वरिष्ठ पत्रकार किरण तारे, वरिष्ठ पत्रकार संजय जोग, 'कोलाज.इन'चे संपादक सचिन परब आणि बीबीसी मराठीचे अभिजीत कांबळे यांच्याशी संवाद साधला.
यावेळी कर्जत जामखेड येथून रोहित पवार विजयी होऊन शरद पवारांचे राजकीय वारसदार ठरणार का, कणकवलीतील राणे विरुद्ध शिवसेना द्वंद्व, परळीतला निकाल भावनिक मुद्द्यांवरून लागणार का, कोथरूडये चंद्रकांत पाटील यांना किती अवघड जाणार, अशा अनेक प्रश्नांवर आणि लोकसभा पोटनिवडणूक आणि उदयनराजे यावर चर्चा झाली.
1. परळी पंकजा मुंडेंची की धनंजय मुंडेंची?
परळी मतदारसंघातून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विरुद्ध महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यात होणाऱ्या थेट लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीपर्यंत इथे झालेल्या वादामुळे इथली लढत आणखीनच इंटरेस्टिंग बनली आहे.
राही भिडे सांगतात, "पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघंही गोपीनाथ मुंडेंचं नाव घेऊन राजकारण करतायत. पण गोपीनाथ मुंडेंनी असलं भावनांचं राजकारण कधीही केलं नाही. व्हिडिओ क्लिपचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या दोघांनी लोकांसमोर भावनांचा उद्रेक केला. लोक त्याकडे ड्रामा म्हणून बघतायत. पंकजांना याचा सर्वस्वी फायदा होईल, असं वाटत नाही. धनंजय यांनीसुद्धा त्याचा खुलासा दिल्यामुळे त्यांनाही सहानुभूती मिळालेली आहे. त्यामुळे एकतर्फी निकाल असणार नाही."
पाहा संपूर्ण चर्चा-
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
संजय जोग यांच्या मते, "पंकजा आणि धनंजय या दोघांनी जे भावनांचं राजकारण केलं, त्यातून किती मतं मिळवता येतील हा चर्चेचा मुद्दा आहे. पण त्या दोघांच्या कामाकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही."
जिथे लढत असते, तिथे ज्याचं ग्राउंडवरचं काम चांगलं असतं, तो सीट काढतो हे आपल्याला माहिती आहे, असं सचिन परब यांनी सांगितलं. "तिथे गेल्यावर धनंजय मुंडेंचं ग्राउंडवर, प्रत्यक्ष मतदारसंघात काम जास्त होतं असं चित्र आहे. धनंजय मुंडे वंजारी मतांमध्ये फूट टाकण्यात काही प्रमाणात यशस्वी झालेत. त्यामुळे मला वाटतं, की धनंजय मुंडे काही प्रमाणात प्लसमध्ये आहेत."
किरण तारे यांच्या मते, धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेता म्हणून अतिशय चांगली इमेज तयार केली आहे. "परंतु तिथला मतदार फारच संवेदनशील आहे. आणि इथं नेमक्या शेवटच्या टप्प्यात भावनेच्या आधारवर निवडणूक वळली होती. त्याचा फायदा महिलांना नेहमीच होतो. तो पंकजांना होईल असं वाटतं."
2. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार की राम शिंदे?
बीबीसी मराठीचे अभिजीत कांबळे सांगतात की रोहित पवारांनी नक्कीच आव्हान निर्माण केलंय. "1995 पासून सलग भारतीय जनता पक्षाचा आमदार इथून निवडून आलेला आहे. राम शिंदे विद्यमान आमदार आहेत. तीन सभा झाल्या या भागात. देवेंद्र फडणवीस दोन वेळा येऊन गेले. पण रोहितसाठी ही निवडणूक सोपी नक्कीच नाही. शरद पवारांनी खास लक्ष घातलंय. जातीची समीकरणं निवडणुकांच्या निकालावर परिणाम करत असतात."
पुण्य नगरीच्या राही भिडे यांच्यानुसार, "रोहित पवारांनी चांगला जम बसवलाय. साखर कारखाना चांगल्या प्रकारे चालवला आहे. शेतकरी वर्ग त्यांच्याबरोबर आहे. रोहितचं व्यक्तित्व शरद पवारांसारखं संयमी आहेत. या सगळ्याचा परिणाम निवडणुकीवर होतो. या भागातल्या धनगरवाड्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. पण त्यांच्या समाजाचा मंत्री असूनसुद्धा राम शिंदेंनी काय केलं."
पाहा संपूर्ण चर्चा-
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
"तिथून निवडणूक लढवण्याचा निर्णय नऊ महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. राम शिंदे स्वतः धनगर आहेत. पण राम शिंदेंनी कधीही धनगर जमातीसाठी काही केल्याचा उल्लेखही केलेला नाही. त्यामुळे तिथे नाराजी आहे," असं संजय जोग म्हणाले.
तर किरण तारे यांच्या मते, स्थानिक मुद्द्यांचा परिणाम नक्की होणार आहे. "रोहितनं योजनाबद्ध पद्धतीनं तयारी सुरू केलेली आहे. रोहित जर त्यांचा वारसदार आहे हे लोकांसमोर मांडायचं असेल तर पवारांना त्या भागावर जोर लावणं गरजेचं होतं."
3. कणकवलीत नितेश राणे की शिवसेनेचे सतीश सावंत?
सचिन परब यांच्या मते, राणेंचा भाजपप्रवेश झाल्यावर स्वाभिमान आणि भाजपच्या ताकदीनं नितेश राणे नक्कीच जिंकून येतील, असं चित्र होतं. "ते आमदार आहेत आणि लोकांपर्यंत पोचलेले आहेत. पण सतीश सावंत त्यांना आव्हान देऊ शकतील, असं वाटलं नव्हतं. राणेंच्या मागे असलेले दुय्यम-तिय्यम नेते इतकं मोठं आव्हान उभं करू शकतील, असं अजिबात वाटलं नव्हतं. नितेश राणे हमखास जिंकतील, अशी परिस्थिती नक्की नाही."
ते पुढे सांगतात, भाजपचा परंपरागत 25-30 हजाराचा मतदार ब्राह्मण आहे. मराठा नेता बनण्यासाठी नितेश राणेंनी ब्राह्मणविरोधी वक्तव्य केली होती. ती मतं भाजपला पडली नाहीत, तर नितेश राणेंना अडचण पडू शकते. सावंत सहकार क्षेत्रातला माणूस आहे. सह्याद्रीकडच्या भागात 70 टक्के मतदान त्यांना अपेक्षित आहे. नुसती लढत आहे. सुदैवाने यावेळेस हिंसाचार झालेला नाही. पण जेव्हा हिंसाचार झाला नाही तेव्हा तेव्हा राणे पडलेत असं चित्रं दिसलंय.
पाहा संपूर्ण चर्चा-
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
राणेंनी पूर्वीपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलेलं होतं, असं राही भिडे यांना वाटतं. "तेव्हा ते दरवेळेस निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. नितेशचा संपर्कही चांगला आहे. शिवसेनेला गोंजरायचा प्रयत्न केलेलासुद्धा लोकांमध्ये चांगला परिणाम घडवणार होता. पण सतीश सावंतांचं आव्हान आहे नक्कीच. पण राणे ही सीट नक्की काढू शकतील," असं त्यांनी सांगितलं.
संजय जोग सांगतात, "शिवसेना राणेंच्या मुद्द्यावर तडजोड करायला कदापि तयार नाही. त्यांनी पूर्ण ताकदीनिशी प्रचार केला. 40 मिनिटांच्या भाषणात 25 मिनिटं राणेंचाच उद्धार केला फक्त. सतीश सावंतांनी स्वतःचं एक विश्व उभारलेलं आहे. याचा फायदा सेनेनं उचलला. मला वाटतं, की सतीश सावंत यांना ही जागा मिळू शकेल."
ही फाईट राणे विरुद्ध शिवसेना अशीच होती. खूप वैयक्तिक लढत झाली आहे ही. पण केवळ राणेंचा मुलगा म्हणून नितेशला हार पत्करावी लागली तर त्यात भाजपची हार नक्की असेल, असं किरण तारे सांगतात.
4. कोथरूडमध्ये मनसेविरुद्धची लढाई चंद्रकांत पाटलांसाठी किती अवघड?
कोथरूडमधून मावळत्या विधानसभेच्या आमदार मेधा कुलकर्णींना वगळून त्यांच्याऐवजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत असल्यानं साऱ्या राज्याचं लक्ष वर आहे.
तर याठिकाणी प्रबळ स्थानिक उमेदवार आहेत मनसेचे किशोर शिंदे आणि त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह त्यांच्या सहकारी पक्षांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे ही लढत जरा रंजक झाली आहे.
संजय जोग सांगतात, "मेधाताई त्याच पक्षातून निवडून आलेल्या होत्या. भाजपचं नेटवर्क तयार होतं. त्यांच्या सुदैवानं विरोधी पक्ष खिळखिळा झालेला आहे. पक्षानं ठरवलं की चंद्रकांत पाटलांना उमेदवारी द्यायची. मग समोर किशोर शिंदे असले तरी नेटवर्किंग, पोल मॅनेजमेंट आणि चंद्रकांत पाटील या तिन्ही मुद्द्यांचा परिणाम होणारच आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 4
"पूर्वी कोथरूड म्हणजे भाजपचा मतदारसंघ होता. पण किशोर शिंदेनं चांगली फाईट दिलेली आहे. मनसेचं पुण्यात प्रस्थ आहे. महापालिकेत त्यांचे 29 नगरसेवक निवडून आलेले होते. त्यांना लोकांचा सपोर्ट आहे. त्यामुळे ही लढाई भाजपला सोपी जाणार नाही," राही भिडे यांनी सांगितलं.
सचिन परब यांच्या मते, "भाजपला टीकेला तोंड द्यावं लागलं हे खरं आहे. पण टीका करणारा भाजपचा वर्षांनुवर्षाचा मतदार आहे. त्यामुळे टिकेचा परिणाम होईल असं वाटत नाही. मला तर ही प्रचंड फाईट होईल असं वाटत नाही."
किरण तारे यांच्या मते, "भाजपचे प्रदेशाध्यक्ष जिथून लढतायंत तिथून जिंकण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करणार यात शंकाच नाही. किशोर शिंदेंचं फार काही आव्हान आहे, असं मलातरी वाटत नाही. चंद्रकांत पाटलांवर टीका, मस्करी जरूर झाली आहे. पण याचा अर्थ मतदार त्यांना मत देणार नाही, असं होणार नाही."
- नक्की वाचा - कोथरूड : चंद्रकांत पाटलांसाठी किती सोपं किती कठीण?
- नक्की वाचा - चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक का लढवत आहेत?
5. सातारा लोकसभा कोण जिंकणार - उदयनराजे की श्रीनिवास पाटील?
उदयनराजे भोसलेंनी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांना लगेचच उमेदवारीही दिली गेली आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकांबरोबरच साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक होतेय.
त्यांच्यापुढे आव्हान आहे ते श्रीनिवास पाटील यांचं. दोन वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले पाटील हे शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. ते सिक्कीमचे राज्यपालही होते.
राही भिडे यांच्या मते, "उदयनराजेंनी घर बदललं म्हणून त्यांना आव्हान मिळणार आहे. राष्ट्रवादीतूनच ते जिंकत होते. एकदा भाजपतून ते पडलेले आहेत. त्यांचा करिश्मा असला तरी तेही पराभूत झालेले आहेत. कदाचित उदयनराजेंचा पराभवही होऊ शकेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 5
"उदयनराजेंनी या मतदारसंघातून लाखोंच्या फरकानं विजय मिळवला आहे. आजच्या तरुणाला राजाचं वेड आहे. क्रेझ आहे. पण या राजानं घर बदललं आहे हे त्यांना आवडलंय का, ते पाहायला हवं आहे. श्रीनिवास पाटलांची IAS अधिकारी, पवारांचा भक्त अशी फार चांगली इमेज आहे. नेहमीचे मतदार नक्कीच त्यांच्या बाजूने जातील," असं संजय जोग यांनी सांगितलं.
सचिन परब यांच्या मते, "मतदारसंघाचं राजकीय शहाणपण आहे, ते सांगतात की श्रीनिवास पाटील चांगले उमेदवार आहेत. पण दुसरीकडे पाहिलं, तर भाजपची ही अत्यंत महत्त्वाची सीट आहे. त्यांना उदयनराजेंना निवडून आणावं लागेल. ते जर जमलं नाही, तर त्यांना पश्चिम महाराष्ट्राचं किंवा मराठा मतदारांचं जे गणित करायचं आहे ते कोसळेल. त्यामुळे ही जागा कोणाची हे प्रेडिक्ट करणं अजिबात सोपं नाहीये."
किरण तारे सांगतात, "उदयनराजेंचा प्रभाव कमी होत चाललाय असं लोकसभेसाठी म्हणणारे भाजपचे लोकच आता उदयनराजेंसाठी काम करणारेत. हा विरोधाभास मोठा आहे. शरद पवार स्वतः निवडणूक लढणार असतील तर मी लढणार नाही, हे उदयनराजेंचं स्टेटमेंट आलं तेव्हा ते एक पाऊल मागे आल्याचं चित्रं उभं राहिलं. त्यांचं मताधिक्य कमी होत चाललंय पण तरी ते हरतील असं वाटत नाही."
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








