राष्ट्र-महाराष्ट्र LIVE : राजकारणात महिलांबरोबर पुरुषांच्या चारित्र्याचीही चर्चा व्हावी - कल्याणी मानगावे

व

बीबीसी मराठीच्या औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या राष्ट्र-महाराष्ट्र कार्यक्रमात वेगवेगळ्या मान्यवरांनी त्यांची मतं मांडली आहेत.

तरुण महिला कार्यकर्त्यांशी चर्चा

  • सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलींना या प्रश्नांना जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. प्रस्थापित घरातल्या मुलींना सामाजिक संरक्षण असतं पण साधारण घरातून आलेल्या मुलींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात - सक्षणा सलगर
  • जशी महिलांच्या चारित्र्यांची चर्चा होते तेव्हा पुरुषांच्या चारित्र्याची सुद्धा झाली पाहिजे - कल्याणी मानगावे
  • आम्हालाही पक्षानं बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. माझं व्यक्तिमत्त्व हे स्वतंत्र आहे त्यानुसारच बोलण्याचं मला स्वातंत्र्य आहे. - दिशा शेख
  • मी पंचायत समितीमध्ये होते पण माझ्या नेतृत्वाला वाव मिळत नाही असं दिसल्यावर मी राजीनामा दिला आणि पक्ष बदलून मी रस्त्यावर उतरले. - पूजा मोरे
YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

  • महिलांना लढाऊ असणं हे योग्यच आहे पण धोरण ठरवण्यासाठी कुणीतरी सत्तेत असणं आवश्यक आहे - सक्षणा सलगर
  • आम्हाला संधी कुठे आहे हे आम्ही शोधू. राजकारणातल्या महिलांना आणखी एका प्रश्नाला समोर जावं लागतं. आमचा विरोध तीव्र झाला असं कळलं की त्या महिलेवर चिखलफेक केली जाते. त्यांचा आवाज दाबला जातो. महिलांना कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं जातं. हीच गोष्ट पुरुषांना लागूही असली पाहिजे. - कल्याणी मानगावे
  • राजकारणात आलेल्या महिलांना त्रास झाला तर मुलींनी सहन करावं जेणेकरून पुढे ज्या मुली येतील त्यांचं मनोधैर्य कमी होणार नाही असा मुद्दा पूजा मोरेंनी मांडला, पण कल्याणी म्हणतात की आपल्याविरोधात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणं आपलं काम आहे.
  • महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात सर्व पक्षांच्या महिला एकत्र येऊ शकतील का असा प्रश्न प्रतिनिधींनी विचारला असता सर्व पाहुण्यांनी एकमताने म्हटलं की आम्ही कोणत्याही महिलेवर अत्याचार झाला किंवा पिळवणूक झाली तर आम्ही एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहू.
  • दिशा शेख यांनी राजकारणातल्या जेंडर सेंसिटायजेशनचा मुद्दा उचलला. महिला असो वा ट्रान्सजेंडर त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे त्यांना कसं समजून घेतलं पाहिजे असं मत दिशा यांनी व्यक्त केलं.
  • राजकारणात बऱ्याचदा पुरुषी प्रतीकांचा वापर जास्त होत आहे. ५६ इंची छाती वगैरे असा उल्लेख करणं हे पुरुषी मानसिकतेचं लक्षण आहे, अशी प्रतीकं हद्दपार केली पाहिजेत. पण पुरुषांनी हे लक्षात ठेवलं पाहिजेत की मातेचं दूध पिऊनच त्यांची छाती ५६ इंची होते असं सलगर म्हणतात.
  • महिलांचं प्रतिनिधित्व कमी असतं आणि ज्या महिला राजकारणात आहेत त्या निर्णय घेण्यास सक्षम असतील असं नाही. त्यावर काय उपाय आहे असं विचारलं असता कल्याणी सांगतात की जास्तीत जास्त महिलांनी राजकारणात यावं आणि त्यांचं सक्षमीकरण करण्यात यावं. स्किल डेव्हलपमेंट योजनेतून देखील जुन्या पद्धतीचेच कोर्स शिकवले जातात. कुकिंग आणि पार्लरच्या कोर्सने महिला सक्षम होणार नाहीत त्यांना लीडरशिप ट्रेनिंग द्या त्या पुढे येतील.

अंबादास दानवे आणि सत्यजित तांबे यांच्याशी चर्चा

  • यात्रा काढूनच निवडणुका जिंकता थोडी येतात. त्यापेक्षा लोकांच्या भावना जाणणं जास्त महत्त्वाचं आहे. यात्रा प्रभावी मार्ग आहेच. पण तोच एक मार्ग नाही - सत्यजित तांबे
  • येत्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे प्रचाराला येऊ शकतात. - सत्यजित तांबे
  • आम्ही केवळ लोकसभेची निवडणूक हरलो. मोदी सक्षम वाटले लोकांना. लोकांना नवीन काहीतरी हवं असतं. नवीन हॉटेल उघडल्यावर विद्यार्थ्यांना कँटीन नकोस वाटतं तसंच आहे हे - सत्यजित तांबे
  • राहुल गांधींनी प्रचंड परिश्रम केलेत हे मीही मान्य करतो. एक निवडणूक हरलो किंवा जिंकलो यानं सगळं संपत नसतं. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या सिस्टम वेगळ्या आहेत. ते त्याप्रमाणा काम करतात - आंबादास दानवे
  • लोकसभेला औरंगाबादमध्ये हारल्याचं आम्हाला दुःख आहेच. एमआयएमनं जातीचं जे राजकारण केलं, हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी केली. ते नसते तर सेना दोन-अडीच लाखांनी जिंकली असती. नुकसान झालं हे मान्य आहे. जनतेमध्ये नाराजी होती जरूर. पण माझ्या विजयानंतर ती भरून काढू असं वाटतं - आंबादास दानवे
  • मला फार आनंद झालाय. दानवेसाहेबांनी ठरवलंय की आता विकासाचं राजकारण करायचंय. तर इथे औरंगाबादेत काही विकास जरूर होईल असं वाटतंय. हा जनरेशनचा परिणाम आहे असं म्हणूया आपण - सत्यजित तांबे
  • आम्ही नेहमीच मुद्दे मांडतो. सरकारमध्ये बराच काळ राहिल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना अशा आंदोलनांची सवय नाही जशी सेनेच्या आंदोलनांची त्यांना आहे. आमची पद्धत वेगळी आहे. आंदोलनांची सवय नव्हती. हळूहळू सवयी लागतील - सत्यजित तांबे
  • आपल्या नव्या पिढीने विचाराचं राजकारण केलं पाहिजे. भारताची लोकशाही सगळ्यांत मोठी लोकशाही आहे. पण एक प्रगल्भ लोकशाही अमेरिकेच्या लोकशाही मानतो. मतदार जोपर्यंत विचार पकडत नाहीत तोपर्यंत हे इकडून तिकडून उड्या मारणारे घाबरणार नाहीत - सत्यजित तांबे
YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा

  • सर्व जातीधर्माच्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे.
  • आजही आमची वंचित बहुजन आघाडीबरोबर जाण्याची तयारी.
व
  • मला या देशाचा अभिमान आहे, समजा मी रझाकाराची औलाद आहे तर तुम्ही इतके सर्व सत्तेत होतात तर तुम्ही मराठवाड्यासाठी काय केलंत?
  • मी पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला जाणार. पण मी मुसलमान आहे. म्हणून मला लोकं या बाबात सतत विचारतात. मी ध्वजारोहणाला नाही गेलो ही माझी चूक झाली मी मान्य करतो.
  • अजूनही वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र येऊ शकते. प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब एकत्र बसून बोलले तर अजूनही ते शक्य आहे.
YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

line

निवडणुकीच्या धामधुमीत तुम्हाला भेडसावणारे प्रश्न थेट तुमच्या नेत्यांना विचारण्याची संधी बीबीसी मराठी तुम्हाला देत आहे. राष्ट्र महाराष्ट्र या डिजिटल कार्यक्रमाच्या निमित्तानं.

राष्ट्र महाराष्ट्रचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर आता बीबीसी मराठीचा हा कार्यक्रम औरंगाबादमध्ये होणार आहे.

या कार्यक्रमात तुम्ही नेत्यांना तुमच्या मोबाईल फोनवरून प्रश्न विचारू शकता. राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बीबीसी मराठी हे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवेल.

आज दिवसभर औरंगाबादमध्ये या डिजिटल कार्यक्रमाचं आयोजन बीबीसी मराठीने केलं आहे. या कार्यक्रमात राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते येणार आहेत. ते बीबीसी मराठीच्या आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत.

हा कार्यक्रम सकाळी 9.30 वाजता सुरू होऊन दुपारी 2.30 पर्यंत चालणार आहे.

राष्ट्र महाराष्ट्र

या कार्यक्रमात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, काँग्रेस नेते सत्यजित तांबे आणि शिवसेना नेते अंबादास दानवे सहभागी होणार आहेत.

राजकीय मुलाखतीनंतर मराठवाड्यातल्या तरुण तडफदार महिला कार्यकर्त्यांचं एक विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. सध्याच्या राजकारणात महिलांच्या आवाजाला किती महत्त्व दिलं जातंय या विषयावरील चर्चासत्रात सक्षणा सलगर, दिशा शेख, कल्याणी माणगावे, पूजा मोरे आणि यशश्री बाखरीया सहभागी होतील.

यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वापरूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता.

बीबीसी मराठीची वाटचाल

बीबीसी मराठीच्या वेबसाईट आणि सोशल चॅनल्सची सुरुवात 2 ऑक्टोबर 2017 रोजी झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत ही बीबीसी मराठीची पहिली हेडलाईन होती.

बीबीसी मराठीने गेल्या एक-दीड वर्षांत मराठी पत्रकारितेत अनेक गोष्टी पहिल्यांदा केल्या.

• पूर्णतः डिजिटल असलेलं हे मराठीतलं पहिलंच व्यासपीठ.

• बातम्या सांगण्याच्या पद्धतीत नवनवीन प्रयोग केले. 360 डिग्री व्हीडिओ आणि VR (Virtual Reality) व्हीडिओ मराठीत पहिल्यांदाच केले.

• जागतिक बातम्या मराठीत नियमितपणे देणारं पहिलं व्यासपीठ.

• महिला, दलित, धार्मिक अल्पसंख्याक आणि लैंगिक अल्पसंख्याकांना समान हक्क मिळावेत यासाठी बीबीसी मराठीने नेहमी पुढाकार घेतला.

राष्ट्र महाराष्ट्रच्या पुण्यातील कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत घेताना बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित
फोटो कॅप्शन, राष्ट्र महाराष्ट्रच्या पुण्यातील कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत घेताना बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित

• प्रत्येक परिस्थिती बीबीसी मराठीने निष्पक्ष बातम्या देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तुमच्या कौतुकाची थापही मिळवली.

• बीबीसी मराठीच्या अनेक बातम्यांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात थेट चांगला बदल घडला.

• बीबीसी मराठीने सदैव किचकट विषय सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केला.

• भारतातले आघाडीचे विचारवंत प्रा. सुहास पळशीकर आणि इतर अनेक मान्यवरांचं लिखाण तरुणांपर्यंत आणलं.

• सर्वांत महत्त्वाचं म्हणजे Jio TV अॅपवर भारतातलं पहिलं डिजिटल व्हीडिओ स्ट्रीमिंग बीबीसी मराठीनं सुरू केलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 4

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)