महाराष्ट्र विधानसभा 2019 : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री लाभली नाही, याची खंत वाटते - मुक्ता टिळक
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
पाहा व्हीडिओ-
15.38: कमल व्यवहारे - महिलेचं चारित्र्यहनन करून तिला बदनाम करण्याची पुरूषी मानसिकता आहे. सभागृहात महिलांचा विषय आला की सगळ्या महिला सदस्य एकत्र येतात. त्याचप्रमाणे पुण्याचा विकासाचा प्रश्न असेल तेव्हा एकत्रपणे काम करतो. एखाद्या कर्तृत्ववान
15.35: मुक्ता टिळक - महिलेला कसं तोलायचं ही समाजाची धारणा. महिलेच्या बाबतीत चारित्र्य हा मुद्दा काढला जातो. टोमणे मारून बोलण्याची समाजाची रित आहे.
15.32 : राजलक्ष्मी भोसले -लोक काय म्हणतात याचा विचार सोडून महिलांनी काम केलं पाहिजे, योग्य मुद्द्यांसह चांगला अभ्यास करून काम करावं.
15.30: कमल व्यवहारे - काँग्रेसनं महिलांना आरक्षण दिलं. पण पुरूष नेत्यांच्या पत्नीला, मुलीला ही संधी देण्याची पद्धत बनली आहे. महिलेने खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवल्यास पराभव होतो. सगळ्याच पक्षामध्ये महिलांना संधी देण्याची पुरुषांची मानसिकता नाही
15.25 : मुक्ता टिळक - राजकारणात तुम्ही चांगलं काम करत असलात तरी अनेक विषय येऊन चिकटतात. अशा वेळी आपण आपल्याला सिद्ध करण्यात आपला वेळ जातो. त्यामुळे स्पष्ट दिशेने पुढे गेल्यास महिलांना राजकारणात चांगली संधी आहे.
15.20 : मुक्ता टिळक - संघटनेत 33 टक्के महिला असल्या पाहिजेत असं भाजपचं धोरण आहे. जास्तीत जास्त महिला आमदार पक्षाच्या निवडून आल्या आहेत. ज्या प्रकारे पुरुष नेत्याशी कार्यकर्ते मोकळेपणाने वागू शकतात. त्याप्रमाणे काहीवेला महिला नेत्यांशी बोलू शकत नाहीत. महिलांच्या मागे पुरूषच बऱ्याच वेळा काम करत असतो. राजकारणात काय चाललं आहे याचं ज्ञान महिलांनी स्वतः मिळवलं पाहिजे.
15.18: राजलक्ष्मी भोसले -सुरूवातीला महिला मिळत नव्हत्या, आता रिझर्व्हेशन नसलेल्या ठिकाणीही महिला निवडून आलेल्या आहेत. राजकारणात मतदार जबाबदार आहेत. महिलांना अडचणी खूप आहेत. निवडून येण्यासाठी पैसे वाटावे लागतात. सोसायट्यांमधूनही लोक पैसे मागतात. महिला लोकांना दारू प्यायला नेऊ शकत नाहीत. मटण पार्ट्या देऊ शकत नाहीत. अशा स्थितीत महिला काम करू शकत नाहीत.
15.14: राजलक्ष्मी भोसले - राज्यात केंद्रात तुमचं सरकार आहे. निधीची कमतरता नाही. पुण्याच्या 100 किमीपर्यंत वसाहती वसवण्यात याव्यात. बुलेट ट्रेनपेक्षा तो पैसा पुण्याच्या विकासासाठी वापरावा. पुणे शहरात लोकांना घर घेण्यासाठी पैसे नाहीत.
15.12 : मुक्ता टिळक - स्मार्ट सिटीचा मुद्दा आणि उद्देश वेगळा आहे. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नांना धरून काम केलं जातं. नवीन पार्किंग धोरण आम्ही आणलं आहे. गाड्या लावण्यासाठी जागा देण्याकरिता पार्किंग लॉट्स तयार केले जात आहेत. सेव्हपुणे ट्रॅफिक मूव्हमेंट आम्ही सुरू केली आहे.
15.09 : मुक्ता टिळक - पुणे - नागपूर दोन्ही शहरे महाराष्ट्रासाठी महत्त्वाची. काँग्रेस राष्ट्रवादीने मेट्रोबाबत समर्पक उत्तरे नागरिकांना दिली नाहीत.
15.07: राजलक्ष्मी भोसले - पुण्याची जाणीवपूर्वक गोची करण्यात आली. सगळं ठरलेलं असताना नागपूरला मेट्रो पळवली. नागपूरमध्ये मेट्रोची आवश्यकता नव्हती तरी तिथे नेली.
15.05: कमल व्यवहारे - बीआरटी उत्तम संकल्पना होती. पण ती व्यवस्थित राबवली गेली नाही. पुण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले. पण मेट्रो मंजूर झालेली असताना नागपूरला नेली.
15.03: राजलक्ष्मी भोसले - बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. कात टाकल्यानंतर साप पुन्हा जोमाने चालू लागतो. जे झाकलेले होते ते आता वर येतील. खालच्या फळीतील नवीन नेतृत्व यामुळे समोर येईल.
14.59: कमल व्यवहारे - कलमाडी आणि काँग्रेसने पुणे शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलं. कार्यकर्त्यांची कमतरता नाही. तेच ते चेहरे दिले असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता. तरूणांनी राजकारणात यावं म्हणूनच राजीव गांधींनी 18 वर्षांच्या मुलांना मतदानाचा अधिकार दिला.

फोटो स्रोत, you tube
14.57: राजलक्ष्मी भोसले - युवा नेतृत्व निर्माण होणार आहे. येत्या काळात नवे आमदार राष्ट्रवादीच्या माध्यमातून पाहायला मिळतील. शरद पवारांसोबत काम केल्यामुळे सुरेश कलमाडी 88 हजार मतांनी निवडून आले होते. पण त्यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर त्यांचा 1 लाखाहून अधिक मतांनी पराभव झाला.
14.56: राजलक्ष्मी भोसले - दोन दिवसांपासून शरद पवार महाराष्ट्रात दौरे करत आहेत. त्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक उत्स्फूर्तपणे त्यांच्या सभेला येत आहेत. जुने गेले आम्हाला सीट रिकामी झाली. पक्षातही लोकांना बदल पाहिजे आहे. पक्षांतर केलेल्या नेत्यांच्या ठिकाणी नव्यांना संधी देणार
14.54: राजलक्ष्मी भोसले - आघाडीचं ठरलं आहे. बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. एक पीढी बदलली आहे. नव्या मतदाराचे प्रश्न आणि समस्या वेगळे, नव्या पीढीला आम्हीही जास्त प्राधान्य देत आहोत. पुन्हा पक्षाला चांगले दिवस येतील.
14.52: मुक्ता टिळक - लोकसभा निवडणुकीपासून कल भाजपच्या बाजूने. युती करायची किंवा नाही ते वेळ आल्यावर ठरवणार, युती झाली नाही तरी जास्तीत जास्त जागा जिंकून आणायचा प्रयत्न.
14.50: मुक्ता टिळक - प्रमोद महाजन, अटलजी यांच्या संकल्पनेतून युती केली, शिवसेनेसोबतची युती ही नैसर्गिक. आठही ठिकाणी भाजप जिंकलेली असल्यामुळे सर्वच ठिकाणी दावा. पण वरिष्ठांनी ठरवल्यानुसार निर्णय घेणार.
14.48 मुक्ता टिळक - कसबा पेठचा किल्ला गिरीष बापट यांनी अभेद्य राखला. त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभेत दिसून येईल. पक्ष संधी दिल्यास कसबा पेठेतून निवडणूक लढवणार .
पुण्याच्या भाजपच्या महापौर मुक्ता टिळक, काँग्रेसच्या कमल व्यवहारे आणि राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी भोसले या महिला महापौरांसोबत चर्चेला सुरूवात.

14.18: निवडणुकीत इलेक्टीव्ह मेरिट महत्त्वाचं असतं. जुन्या कार्यकर्त्यांना पक्ष समजावून सांगतो. त्यामुळे जुन्या आणि नव्या नेत्यांमध्ये गैरसमज होत नाहीत.
14.09: या सरकारनं हमीभाव दीडपट-दुप्पट वाढवला आहे. स्वामीनाथन अहवालातील शिफारसी लागू करण्याला सुरुवात केली आहे.
13.59: स्थानिक भाषांना अमित शाह यांचा विरोध नाही.
13.56: गरज नसली तरी युती करणारच.
13.55: युतीची सर्चा सामोपचारानं होईल. सर्वजण युतीवर चर्चा आहेत कारण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडे लक्ष देण्यासारखं तिकडे काहीच घडत नाही.
13.47: ईडी, सीबीआयच्या चौकशीत कोणाला गुंतवावं इतकं सोपं ते नाही. आम्ही या संस्थांचा धाक दाखवत नाही. आम्ही काही लोकांनाच भाजपात घेतलं आहे. सर्वांना घेतलेलं नाही. निवडणुकीच्या राजकारणात सत्ता येण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो.
13.41: युतीमध्ये आता लहान-मोठं कोणी नाही. शिवसेना आणि भाजप आता सख्खे भाऊ आहेत.
13.39: युतीचा प्रश्न आम्ही सोडवू. शिवसेनेशी आमचं मनोमिलन झालेलं आहे.
13.35: शिवसेनेची टीका ही आम्ही टीका नाही. तर अपूर्ण राहिलेलं काम लक्षात आणून देण्याचं काम मित्रपक्ष करतो असं आम्ही समजतो.
13.32: सरकार फक्त घोषणा करत नाही. आम्ही स्वयंपाकासाठी महिलांना गॅस दिला, सबसिडी दिली, आर्थिक दुर्बलांना आरक्षण दिलं, जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पाणी दिलं. काँग्रेसकडे बोलण्यासारखं काहीच नाही म्हणून ते भावनिक मुद्द्यावर बोलतात.
13.26: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्याशी संवादाला सुरुवात.

12.45: आरक्षणाबद्दल गैरसमज आणि अती चर्चा झाल्यामुळे त्याबदद्ल प्रश्न उपस्थित केले जातात.
12.30: विरोधी पक्ष मोदींना संपवायचाय. फॅसिझम असाच असतो.
12.23: मोदींकडून काय अपेक्षा करताय. तरुणांमध्ये व्यवस्थेबद्दलची शंका, बंद पडलेले धंदे, मंदी, कांद्यावर बोलणं अपेक्षित आहे ना.
12.21: माझा लढा फॅसिझमविरोधात आहे. फॅसिझमविरोधात लढणाऱ्या सर्वांनी एकत्र यावं.
12.19: भाजपचा भ्रष्टाचार हा नोटबंदीतच होता लोकांनी मान्य केलं नाही. कमरेखाली वार न करणं हा शरद पवार यांचा दुर्गुण आहे.
12.14 :काँग्रेस लिबरल पक्ष आहे. शरद पवार खूप कामं करतात. पण वैयक्तिक हेव्यातून शत्रूला संपवायचं नाही हे तत्त्व शरद पवारांनी जोपासलं
12.12 : भाजपला पाठिंबा देणं ही आमची ऐतिहासिक चूक होती. भाजप सरकारला पाठिंबा देण्याबद्दल मी आधीही मत व्यक्त केलं आहे. त्यावेळी मी पवार साहेबांच्या बाजूला उभं राहून सांगितलं होतं, "विचारधारेशी तडजोड केली तर आपण मागे जाऊ."

12.05: नितीन गडकरी तुमच्या बापजाद्यांना अघोषित आरक्षण होतं असं मी म्हटलं होतं. गडकरींच्या भाषेत मला कुठेतरी मनुचा गर्व दिसला.
12.03: भारतात आलेला फॅसिझम हा आपला शत्रू आहे. त्याविरोधात पुरोगामी पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे.
11.59: राष्ट्रवादीतून भाजपात नेते गेले हे पवारांचं अपयश नाही ते इडीचं यश आहे
11.58: भाजपात गेलेली मंडळी फक्त सत्तेसाठी आली होती. चाळणी झाली. चांगलं ते राहिलं.
11.55: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चेला सुरुवात

11.30: पीकविम्यात अपवादानं एखाद्याला पैसे आले असतील. लोकांना पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत. मराठवाड्यात अकरा महिन्यांपूर्वी दुष्काळ जाहीर झालेला आहे. शेतकऱ्यांनी दुष्काळासाठी विम्याचे पैसे भरले.
केंद्र-राज्य आणि शेतकऱ्यांचे मिळून 3200 कोटी रुपये दिलेले होते. मात्र परताव्याचे 34 कोटी मिळालेले आहेत फक्त. असा नफा त्या कंपन्यांना होतो याचाच अर्थ हा संघटितरित्या टाकलेला दरोडा आहे. ही प्रधानमंत्री फसल विमा योजना नाही तर प्रधानमंत्री कार्पोरेट दरोडा योजना आहे.
11.27:आम्ही केलेली आघाडी लोकांना पटवून देण्यात कमी पडलो, पण एकट्यानं विरोधात लढणं शक्य नाही, लोकशाहीमध्ये संख्याबळाला महत्त्व असतं.
11.25 : चौथी शिकलेल्या वसंतदादांनी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हे सूत्र आणलेलं. फडणवीसांनी योजना आणल्याचा दावा करू नये. जलयुक्त शिवार असं नामकरण फक्त केलं. पण ती दादांची संकल्पना आहे. पण त्याचं एवढं भांडवल केलं गेलं. की ठेकेदार पोसले गेले. मराठवाडा आज कोरडा ठणठणीत आहे. कारण कामं झाली ते पाणी तरी अडलं पाहिजे ते झालेलं नाही.
11.22 : चंद्रकांत पाटील दरबारी राजकारणी आहेत. ते विद्यार्थी चळवळीतून आले असं म्हटलं जातं. त्यांनी विद्यार्थ्यांचे कोणते प्रश्न सोडवले हे माहिती नाही. जर ते निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवेन
11.16 : "मतविभागणी टाळली पाहिजे असं मला वाटतं. मतदाराला सुद्धा माहीत नाही की त्यांनी दिलेलं मत पोचतंय की नाही. इव्हीएममध्ये दोष असो अथवा नसो. मतदाराच्या मनात संशय आहे. मग काय हरकत आहे बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला."
11.14 : निवडणुकीच्या वेळेस पाकिस्तान बागुलबुवा आहे, मोदींसारखा सुपरमॅन आपल्याला सोडवणार आहे, अशा प्रकारचा भ्रम आमच्या तरुण मुलांच्या मनात निर्माण झाला. त्याचा फायदा सत्ताधारी भाजपला झाला.
11.12:पुलवामा घडलं नसतं तर भाजप 100% पराभूत झाला असता

11.11 : भाजपकडे निवडणुकीचं तंत्र आहे. ते पैसा सत्ता वापरतात. जातीयता धार्मिकता अशा संवेदनशील गोष्टींचा वापर करतील. काहीही करून आम्हाला जिंकायचं आहे यासाठी ते काहीही करतात. पूर्वी काँग्रेस करायचं आता ते करतात
11.09: सामान्य लोकांच्या संवेदना जागृत का होत नाहीत य़ाचा विचार करता ते सोपं नसल्याचं दिसतं. त्यासाठी साधना लागते. चांगल्या पद्धतीने काम झालं तर त्या जाग्या होतात नाहीतर होत नाहीत.
11.03: मी माझे शब्द आजही मागे घेणार नाही. निर्णयप्रक्रियेत आहेत त्यांच्याविरोधात बोलायलाच हवं. शरद पवार कृषिमंत्री असताना आम्ही त्यांच्याविरोधात बोलत होतो. आता भाजपा सरकारमध्ये आहे म्हणून आज आम्ही त्यांच्याविरोधात बोलत आहोत. थेट शरद पवारांबरोबर लढाई नव्हती. ते लोकांना पाठिशी घालणारे होते. म्हणून त्यांच्याविरोधात बोलत होतो. आता पवारांच्या पाठिशी कुणी नाही. तेच लोकं भाजपमध्ये जाऊन बसले आहेत.
11.00: आम्ही कुणाला सर्टिफिकेट दिलेलं नाही. किमान लोकशाहीमध्ये मतं मांडायचं स्वातंत्र्य आम्हाला राहिल. समाजातल्या दुबळ्यातल्या दुबळ्या घटकाला मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. सध्या मत मांडणाऱ्या व्यक्तीला दहशतवादी पद्धतीनं लक्ष ठेवून त्रास दिला जातो. हा आधीच्या आणि आताच्या सरकारमधला फरक आहे.
10.59: काँग्रेस आणि एनपीसी सह चर्चेत आहात. विधानसभेत तुम्ही जाऊ शकता. तुम्ही यांच्याकडून गंडवले जाणार नाही का? असं विचारताच राजू शेट्टी म्हणाले, "हे साधूसंत असल्याचं सर्टिफिकिट आम्ही देत नाही. पण आमची एकट्याची ताकद चालत नाही. मोगलाशी लढायचं तर कुतुबशहा आणि आदिलशहाशी संगत केलीच पाहिजे"
10.58: माजी सहकाऱ्याच्या आशीर्वादानं महाराष्ट्र, कर्नाटक, उ. महाराष्ट्रातले लोक फसवले जात असतील. साडेचारशे ते पाचशे कोटीचा माग लागत नाही. कडकनाथचे आरोपी मात्र सोशल मीडियावर लाइव्ह असूनही सापडत नाहीत. हा काय प्रकार आहे. नागपूरमधल्या कोंबड्या उपाशी मरतायंत., अशा शब्दांमध्ये राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.
10.57: कडकनाथच्या आंदोलनाच्यावेळेस पोलिसांना भारतीय जनता पार्टीचा ड्रेस घालून काम करताना पाहिलं. कडकनाथच्या प्रश्नाकडे सरकारनं लक्ष द्यायला हवं होतं- राजू शेट्टी
10.54: पाकिस्तानातून शेतकरी आणण्यात कसला राष्ट्रवाद आहे असा प्रश्नच राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.
10.50: शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संवादाला सुरूवात

निवडणूक म्हणजे प्रचाराची रणधुमाळी, विरोधकांचे आरोप आणि सत्ताधाऱ्यांचं प्रत्युत्तर, सभा गाजवणारी भाषणं, माध्यमांमधून तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या बातम्या...पण या सगळ्यामध्ये तुम्ही कोठे आहात?
म्हणूनच निवडणुकीच्या धामधुमीत तुम्हाला भेडसावणारे प्रश्न थेट तुमच्या नेत्यांना विचारण्याची संधी बीबीसी मराठी तुम्हाला देत आहे. राष्ट्र महाराष्ट्र या डिजिटल कार्यक्रमाच्या निमित्तानं.
या कार्यक्रमात तुम्ही नेत्यांना तुमच्या मोबाईल फोनवरून प्रश्न विचारू शकता. राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बीबीसी मराठी हे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवेल.
आज दिवसभर पुण्यामध्ये या डिजिटल कार्यक्रमाचं आयोजन बीबीसी मराठीने केलं आहे. या कार्यक्रमात राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते येणार आहेत. ते बीबीसी मराठीच्या आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत.

हा कार्यक्रम सकाळी 9.30 वाजता सुरू होऊन दुपारी 2.30 पर्यंत चालणार आहे.
कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, पुण्याचे खासदार गिरीष बापट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड तसंच शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे सहभागी होणार आहेत.
यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वपारूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता.
बीबीसी मराठी
बीबीसी मराठीच्या वेबसाईट आणि सोशल चॅनल्सची सुरुवात 2 ऑक्टोबर 2017 रोजी झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत ही बीबीसी मराठीची पहिली हेडलाईन होती.
बीबीसी मराठीने गेल्या एक-दीड वर्षांत मराठी पत्रकारितेत अनेक गोष्टी पहिल्यांदा केल्या.
• पूर्णतः डिजिटल असलेलं हे मराठीतलं पहिलंच व्यासपीठ.
• बातम्या सांगण्याच्या पद्धतीत नवनवीन प्रयोग केले. 360 डिग्री व्हीडिओ आणि VR (Virtual Reality) व्हीडिओ मराठीत पहिल्यांदाच केले.
• जागतिक बातम्या मराठीत नियमितपणे देणारं पहिलं व्यासपीठ.
• महिला, दलित, धार्मिक अल्पसंख्याक आणि लैंगिक अल्पसंख्याकांना समान हक्क मिळावेत यासाठी बीबीसी मराठी नेहमी पुढाकार घेतला.
• प्रत्येक परिस्थिती बीबीसी मराठीने निष्पक्ष बातम्या देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तुमच्या कौतुकाची थापही मिळवली.
• बीबीसी मराठीच्या अनेक बातम्यांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात थेट चांगला बदल घडला.
• बीबीसी मराठीने सदैव किचकट विषय सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केला.
• भारतातले आघाडीचे विचारवंत प्रा. सुहास पळशीकर आणि इतर अनेक मान्यवरांचं लिखाण तरुणांपर्यंत आणलं.
• सर्वांत महत्त्वाचं म्हणजे Jio TV अॅपवर भारतातलं पहिलं डिजिटल व्हीडिओ स्ट्रीमिंग सुरू केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








