शिवसेना-भाजप आमने-सामने : 'आरे'वरून राजकारण तापलं

आरेचं जंगल वाचविण्यासाठी आंदोलन

फोटो स्रोत, RADHIKA JHAVERI

मुंबईतल्या आरे कॉलनीमधल्या जंगलावरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने उभे राहिल्याचं चित्र आहे. मेट्रो कारशेडच्या बांधकामासाठी झाडं तोडण्याच्या प्रस्तावाला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे.

झाडं तोडावी लागणार असली, तरी मेट्रो प्रकल्प पर्यावरणासाठी फायद्याचा असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच पुन्हा मांडली होती. तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात MMRCL च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मेट्रो कारशेडसाठी दुसरा सुयोग्य पर्याय नसल्याचं म्हटलं आहे.

2014 साली मेट्रो कारशेडसाठी आरेमधली जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्याला मुंबईतील पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचा विरोध आहे.

29 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीनं या प्रकल्पासाठी आरे कॉलनीतली 2702 झाडं कापण्यास परवानगी दिल्यावर त्याविरोधातली मोहीम आणखी तीव्र झाली आहे. त्यावरून आता राजकारणही तापताना दिसतंय.

शिवसेना आणि विरोधी पक्षांची सरकारवर टीका

मंगळवारी मुंबईमध्ये शिवसेना भवनात आदित्य ठाकरे यांनी विशेष पत्रकारपरिषद बोलावून आरेमधल्या वृक्षतोडीला आपला विरोध असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. या पत्रकार परिषदेत वन्यजीव अभ्यासक नयन खानोलकर आणि राजेश सानप यांनी आरे कॉलनीतील जैवविविधता दाखवणारं प्रेझेंटेशनही सादर केलं.

आरे

एवढी जैवविविधता असताना मेट्रोची कारशेड इथे उभारायचा सल्ला देणारे सल्लागार कोण होते असा प्रश्न आदित्य यांनी विचारला आहे.

आरेमधल्या कारशेडला आपला विरोध का आहे हे सांगताना ते म्हणाले, "मेट्रो आम्हाला सर्वांना हवी आहे. मीही मेट्रोमधून प्रवास करतो. आरेमधल्या कारशेडला आम्ही विरोध करतो आहोत यामागे राजकीय हेतू नाही. MMRCLनं काल सांगितलं आहे, की तिथे कारशेड झाली नाही, तर मेट्रो होणं शक्य नाही. मग नक्की हा घोटाळा आहे का? एवढा विरोध असताना चार वर्ष तुम्ही त्याच्यावर काही बोलत नाही. एवढं सगळं करून मग सांगता की दुसरीकडे जागा नाही. हे सगळे एक्सपर्ट रिपोर्ट रद्द करून MMRCLच देशाचं पर्यावरण खातं का चालवत नाही? हे मुंबई विरुद्ध MMRCL असं झालं आहे, जे व्हायला नको होतं."

Facebook पोस्टवरून पुढे जा, 1

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 1

फक्त आदित्यच नाही, तर विरोधी पक्षातल्या अन्य नेत्यांनी आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात आपलं मत नोंदवलं आहे

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही गेल्या आठवड्यात फेसबुकवर व्हीडियोच्या माध्यमातून आरे कॉलनीतील झाडं तोडण्याच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवला होता.

Facebook पोस्टवरून पुढे जा, 2

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त, 2

"८२ हजार लोकांनी तक्रारी नोंदवल्या असतील आणि तरीही आपण झाडं कापण्याचा निर्णय घेत असू, तर संशय हा कुठेतरी निर्माण होणारच. विकास नक्की व्हावा पण निसर्गाच्या विरोधात नाही. अॅमेझॉनला किती मोठी आग लागली, त्याच्यासाठी सगळ जग एकवटलंय, हळहळ व्यक्त करतंय. हे सगळं चालू असताना, आरे आपण नष्ट करायला निघालोय यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही," असं अमित ठाकरे म्हणाले.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनीही आरेमधल्या वृक्षतोडीला ट्विटरवरून वारंवार विरोध दर्शवला आहे. "कोस्टल रोड आणि मुंबई मेट्रोला माझा विरोध नाही. दोन्ही प्रकल्प काँग्रेसच्या सरकारनंच आणले होते. ते लागू करण्यासाठी पर्यावरणपूरक मार्गाचा अवलंब का करत नाही," असं देवरा म्हणतात.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आंदोलकांना पाठिंबा दर्शवला असून या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

X पोस्टवरून पुढे जा, 3

X पोस्ट समाप्त, 3

काय आहे सरकार आणि मुंबई मेट्रोची भूमिका?

आरे कॉलनीच्या 1300 हेक्टर जागेपैकी 30 हेक्टर जागा मेट्रोसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी झाडं तोडली जाणार असली, तरी त्यामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानाची मेट्रो भरपाई करेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

"मीही पर्यावरणप्रेमी आहे. तोडलं जाणारं प्रत्येक झाड पाहून मला दुःख होतं. पण आपल्याला ताळमेळ साधायला हवा. लोक खाजगी वाहनांऐवजी मेट्रोचा वापर करू लागतील, तेव्हा कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल," असं काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते.

आरेचं जंगल वाचविण्यासाठी आंदोलन

फोटो स्रोत, RADHIKA JHAVERI

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मेट्रो 3 साठी झाडं तोडण्याचं समर्थन केलं आहे. मेट्रोमुळे रोजगार आणि विकासाला चालना मिळेल तसंच पर्यावरणाचं रक्षण होईल असं गडकरी म्हणाले आहेत. तसंच विलंबामुळे मेट्रो प्रकल्पावरचा खर्च वाढून मुंबईकरांचंच नुकसान होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनीही मेट्रो कारशेड आरे कॉलनीऐवजी कांजुरमार्गमधल्या पर्यायी जागेत हलवायची असेल तर त्यासाठी साडेपाचशे कोटी रुपये अधिक खर्च होतील असं विधान केलं होतं.

'सेव्ह आरे' विरुद्ध 'अरे, ऐका ना'

मुंबईतील पर्यावरणप्रेमी सध्या #SaveAarey हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्यानंतर MMRCLनं मेट्रोसंदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी #AareyAikaNa या हॅशटॅगचा आधार घेतला आहे.

त्यांचं म्हणणं आहे की, "आम्ही आरे कॉलनीतील आदिवासींना हटवतो आहोत, प्रकल्पामुळे परिसरातल्या वन्यजीव, वनस्पतींचं नुकसान होईल. पण ही विधानं चुकीची आहेत आणि तथ्यांवर आधारीत नाहीत."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

MMRCLच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनीही ट्विटरवरून आपली बाजू मांडली आहे. त्या म्हणतात, "आरे येथील कारशेडला दुसरा सुयोग्य पर्याय नाही आणि त्यामुळे 2700 झाडे कापावी लागतात. त्यासाठी एकीकडे 6 पट झाडे लावली जाणार आहेतच. पण ही झाडे तोडल्यामुळे कायमचे वाढणारे CO2 उत्सर्जन केवळ 80 दिवस मेट्रो चालली की भरून निघणार आहे. या बाबीकडे दुर्लक्ष करायचे?"

वृक्षतोडीविरोधात सेलिब्रिटीजही मैदानात

मेट्रो प्रकल्प हा आरे कॉलनीत उभा राहणारा हा एकमेव प्रकल्प नाही. यंदा सहा जूनला सरकारनं आरे कॉलनीच्या 1300 हेक्टर क्षेत्रापैकी 40 हेक्टर (99 एकर) भाग प्राणीसंग्रहालयाच्या उभारणीसाठी देण्याचं जाहीर केलं होतं.

अशी प्रकल्पांना जागा देण्यानं या या जागेवरचं वन्यजीवन नष्ट होईल आणि पुढेमागे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलावरही त्याचा परिणाम होईल, अशी भीती पर्यावरणप्रेमींना वाटते. त्यामुळंच त्यांनी आरेमधल्या वृक्षतोडीला विरोध केला आहे.

त्या विरोधाच्या आवाजात बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजचा आवाजही मिसळताना दिसतो आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या रविवारी आरे कॉलनीमध्ये झालेल्या निदर्शनांत सहभागी झाली होती. "जवळपास तीन हजार झाडं तोडण्याचा निर्णय झाला आहे. आपणा सर्वांना एक ठोस भूमिका घ्यायला हवी की हे चालणार नाही. प्रत्येकानं या मोहिमेला पाठिंबा द्यायला हवा. प्रदूषणाचा त्रास आपण आणखी वाढवून चालणार नाही," अशी प्रतिक्रिया श्रद्धानं दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

X पोस्टवरून पुढे जा, 6

X पोस्ट समाप्त, 6

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनीही आरे कॉलनीतल्या वृक्षतोडीला विरोध केला आहे. "2700 झाडं तोडणं आणि इतक्या वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासात घुसखोरी करणं ही शोकांतिका ठरेल. माझा सक्त विरोध आहे आणि मी सरकारला कळकळीची विनंती करते की याकडे लक्ष द्या आणि जंगल वाचवा," असं त्या ट्विटरवर म्हणतात.

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

काँग्रेसकडून खासदारकीची निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाकडे लक्ष वेधलं आणि आरेचं जंगल वाचवणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 8
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 8

अभिनेत्री दिया मिर्झाही सातत्यानं ट्विटरवरून आरे कॉलनीतील वृक्षतोडीला विरोध करते आहे.

"आम्ही मेट्रोच्या विरोधात नाही. जरूर बांधा. पण माणसांना जगण्यासाठी उपयुक्त अशा निसर्गाचं नुकसान करून नाही. कारशेडसाठी पर्याय आहेत. थोडा वेळ लागेल. पण योग्य गोष्ट निवडा. आरेच्या जंगलाची कत्तल थांबवा," असं दियानं म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)