You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच सोशल मीडियावर कव्हर करतंय बीबीसी मराठी
महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक खरं तर लोकसभेच्या आधीच सुरू झाली होती. जेव्हा लोकसभेच्या युत्या-आघाड्या विधानसभेवर डोळा ठेवून केल्या गेल्या, तेव्हाच विधानसभेचं रणशिंग फुंकलं गेलं होतं.
त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी वगैरे पक्षांच्या यात्रा-सभा तीन महिने आधी सुरू झाल्या म्हणून कुणाला आश्चर्य वाटायला नको.
त्यात महाराष्ट्र देशातलं सगळ्यांत श्रीमंत राज्य. इथे लोकसभेच्या 48 जागा. देशाची आर्थिक राजधानी इथेच. त्यामुळे महाराष्ट्रावर राज्य करणं सर्वार्थाने महत्त्वाचं ठरतं.
या अतिशय महत्त्वाच्या निवडणुकीचं कव्हरेज आम्ही बीबीसी मराठीवर नवनवीन मार्गांनी करतोय. त्याचाच एक भाग म्हणजे आमची महाराष्ट्र यात्रा.
या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आम्ही राज्याच्या 10 शहरांमधून प्रवास करतोय.
मुख्य म्हणजे या यात्रेत टीव्हीसारखी लुटुपुटूची भांडणं नसतील. इथे दोन गोष्टी घडतील - एक तर स्थानिक तरुण पत्रकारांसोबत तिथल्या विषयांवर आणि राजकारणावर गंभीर चर्चा होईल. आणि दुसरी म्हणजे, प्रत्येक शहरातल्या तरुणांसोबत धम्माल गप्पा होतील.
सोशल मीडियावर, म्हणजे फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इन्स्टाग्रॅमवर आणि शेअरचॅट, जिओ चॅट, हॅलो यांसारख्या तरुण चॅटअप्सवर आम्ही पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेचं वार्तांकन करणार आहोत.
तरुणांनी तरुणांसाठी तरुणांच्या मुद्द्यांभोवती तरुणांच्या भाषेत तरुणांच्या प्लॅटफॉर्म्सवर कव्हर होणारी ही पहिली निवडणूक आहे.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी विनायक गायकवाड, समृद्धा भांबुरे आणि राहुल रणसुभे राज्यभरातल्या तरुणांशी संवाद साधत आहेत. बीबीसी मराठीच्या आकर्षक निवडणूक गाडीतून ते 2,982 किमीचा प्रवास करून राज्य पालथं घालत आहेत.
तुम्हाला या धम्माल प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हायचंय? मग आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नक्की फॉलो करा. त्या सर्वांच्या लिंक्स या बातमीच्या तळाशी आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)