लोकसभा निकाल: मोदी, अमेठी, सेंसेक्स आणि सनी लिओनी यांचीच चर्चा सगळीकडे : सोशल

आजकाल निवडणुका फक्त राजकीय रिंगणात लढल्या जात नाहीत. प्रचारसभा, बैठका आणि रोडशोंना जितकी गर्दी होते, तितकीच हवा तयार करण्यात गेल्या दोन लोकसभा निवडणुकांपासून सोशल मीडियावरही तयार करण्यात आली आहे.

त्यामुळेच गुरुवार सकाळपासून जसजसा निकाल येऊ लागला, त्याच गतीने लोकही आपापली मतं घेऊन सोशल मीडियावर हजर आहेत.

निकालांचे ट्रेंड्स स्पष्ट होतानाच सोशल मीडियावर #Verdict2019, #ModiAaRahaHai, #Amethi, #Sensex आणि गंमत म्हणजे #SunnyLeone सुद्धा ट्रेंड व्हायला सुरुवात झाली.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजप 300 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे आणि "फिर एक बार मोदी सरकार"ची दाट शक्यता आहे. काँग्रेस सध्या 50

पण लोकांनी सोशल मीडियावर कोपरखळ्या मारायला सुरुवात केली आहे. कुणी भाजपची आघाडी, कुणी काँग्रेस आणि आप तर कुणी चक्क सनी लिओनीवर चर्चा करायला सुरुवात केली.

रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी गुरुदासपूर मतदारसंघाबद्दल बोलताना सनी देओल यांच्याऐवजी सनी लिओनी यांचा उल्लेख केला. त्यानंतर जणूकाही सनी लिओनीबद्दलच्या पोस्टचा ट्विटरवर पूर आला.

'आयरनी मॅन' या अकाउंटवरून ट्वीट केलं आहे की अर्णव हे मोदींच्या प्रेमात देवदास झालेत.

'फ्रिकी डी राव्हल' या अकाउंटवरून ट्वीट केलं आहे की, "असं वाटतंय की अर्णब जरा जास्तच एक्साईट झालेत."

एवढंच नव्हे तर खुद्द सनी लिओनीने या ट्रेंडवर प्रतिसाद दिला आहे. "किती मतांनी आघाडीवर आहे?" असं तिने विचारलं आहे.

सर जडेजा फॅन यांनी ट्वीट केलं आहे की, "आता हरणाऱ्यांना कारण शोधावी लागतील की आपल्या अपयशाचं खापर कुणावर फोडायचं - EVM, निवडणूक आयोग की मतदार?"

दुसरे युजर ऋषभ महाजन यांनी ट्वीट केलं की, "प्रिय विरोधी पक्ष, मोदींविषयी असणारा तिरस्कार नाही तर तुमचं काम तुम्हाला मतं मिळवून देईल."

तर दीपक जोशींनी लिहिलं की, "काँग्रेस सध्या या परिस्थितीत आहे."

अमेठीच्या जागेची जोरदार चर्चा आहे. इथून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या काट्याची लढत आहे.

सध्या तरी या ठिकाणी स्मृती इराणी आघाडीवर आहेत. म्हणूनट कृष्णा अत्री यांनी ट्वीट काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना टॅग करून ट्वीट केलं आहे की, "तुम्ही म्हटला होतात की राहुल गांधी अमेठीतून हरले तर मी राजकारण सोडून देईन. तुम्हाला आठवयतंय ना?"

शशांक पवार यांनी ट्वीट केलंय की जर राहुल गांधी वायनाडमधून जिंकले आणि अमेठीमधून हरले तर ते कोणत्या EVM वर प्रश्नचिन्ह लावतील?

भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार बनवणार, असं सकाळपासून आलेल्या आकड्यांमधून स्पष्ट होताना दिसल्यावर सेन्सेक्सनेही मुसंडी मारली आहे. यावरही नेटकऱ्यांनी भरपूर चर्चा केली आहे.

ट्विटर युजर दीपा यांनी एक GIF शेअर करून म्हटलं की मार्केट तर वरवरच जातंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)