इस्रायलच्या निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा नेत्यान्याहू मैदान मारणार?

फोटो स्रोत, AFP
इस्रायलमध्ये निवडणुका होत आहेत. गेल्या काही वर्षांतली ही सगळ्यात जास्त चुरशीची निवडणूक असल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू हे उजव्या विचारसरणीच्या लिकूड पक्षाचे नेते आहे. त्यांना पाचव्यांदा सत्तेत येण्याची अपेक्षा आहे.
मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांना माजी लष्करप्रमुख बेनी गॅन्ट्झ यांचं आव्हान आहे.
बेनी गॅन्ट्झ हे ब्लू अँड व्हाईट युतीचे नेते आहे. ही युती सेंट्रिस्ट विचासरणीची आहे. ते सुरक्षा आणि स्वच्छ राजकारण या मुद्द्यावर ते नेत्यान्याहू यांना आव्हान देत आहेत.
इस्रायलच्च्या मजूर पक्षाने गेल्या काही काळात पॅलेस्टाईनशी शांततेचा करार केला आहे. त्यांनी मतदारांचा विश्वास गमावला आहे.
अंदाज काय आहे?
इस्रायलच्या संसदेत 120 जागा आहेत. संसदेत आतापर्यंत कुणालाही बहुमत मिळालेलं नाही. इथे कायमच आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे,
मंगळवारी निकाल येण्यास सुरुवात झाल्यावर सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू होण्याची शक्यता आहे.
निवडणूक पूर्व मतदानचाचणीत दोन मुख्य स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यांना 30-30 जागा मिळण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
असं असलं तरी बेंजामिन नेत्यान्याहू पुन्हा एकदा आघाडीचं सरकार स्थापन करणार असल्याचा अंदाज बीबीसीचे जेरुसलेमचे प्रतिनिधी टॉम बॅटमॅन यांनी व्यक्त केला आहे.
फेब्रुवारी मध्ये अति उजवी विचारसरणी असलेल्या पक्षांच्या संसदेतील जागा नेत्यान्याहू यांनी वाढवल्या. त्यांच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
नेत्यान्याहू यांची आश्वासनं
जेरुसलेम यांनी सोमवारी एका रॅलीत संबोधित करताना लिकूड पक्षाच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं.
डावी विचारसरणी असलेले स्पर्धक जिंकू शकतात असा इशाराही त्यांनी दिला.

फोटो स्रोत, EPA
आमच्या प्रतिनिधीच्या मते नेत्यान्याहू यांनी सुरक्षेच्या मुद्दयावरून जनतेला मोठी आश्वासनं दिली आहेत. पश्चिम किनाऱ्यावरील ज्यू लोकांचा नायनाट करू अशी घोषणा त्यांनी केली.
ही निवडणूक भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे नेत्यान्याहू यांना बरीच कठीण गेली असल्याची माहितीही आमच्या प्रतिनिधीने दिली आहे. नेत्यान्याहू यांनी मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे.
गॅन्ट्झ यांची काय भूमिका आहे?
59 वर्षीय निवृत्त लेफ्टनंट जनरल हे राजकारणात नवखे आहेत. त्यांनी फेब्रुवारीत आघाडीची स्थापना केली. देश वाट चुकला आहे. त्याला योग्य मार्गावर आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
ते नेत्यान्याहू यांना सुरक्षेच्या मुद्दयावरून आव्हान देऊ शकतात. त्यांनी पारदर्शी राजकारण करण्याचंही आश्वासन दिलं आहे. नेत्यान्याहू यांना स्वत:ला वाचवायचं आहे म्हणून ते कायद्यात बदल करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
"त्यांच्यावर जे आरोप आहे त्या पार्श्वभूमीवर स्वत:ला वाचवण्यासाठी एक कायद्याची मोठी भिंत उभी करायची आहे." असं ते म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








