अमेरिका यापुढे पॅलेस्टाइनच्या निर्वासितांसाठी UNला निधी देणार नाही : डोनाल्ड ट्रंप

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप

पॅलेस्टाइन निर्वासितांच्या शिबिरासाठी अमेरिकेने संयुक्त राष्ट्राला निधी देणं थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

United Nations Relief and Works Agency (UNRWA) ही संस्था पॅलेस्टाइनच्या निराश्रितांच्या पुनर्वसनाचं काम करते. ही संस्था 'पूर्णपणे बिघडलेली' आहे, त्यामुळं आम्ही आता हा निर्णय घेत आहोत, असं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे.

अमेरिकेने म्हटलं की त्यांनी हा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला आहे.

"यापुढे आपण या संस्थेला निधी पाठवणार नाही," असं अमेरिकन प्रशासनाच्या प्रवक्त्या हेदर नॉएर्ट यांनी म्हटलं आहे.

पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या एका प्रवक्त्याने अमेरिकेच्या या निर्णयाला "आमच्या लोकांवर हल्ला" म्हटलं आहे.

शाळा

फोटो स्रोत, Reuters

"ही एक प्रकारची शिक्षाच आहे. पण या निर्णयामुळे ही वस्तुस्थिती बदलत नाही अमेरिकेचं या भागातल्या लोकांच्या पुनर्वसनात काही योगदान नाही आहे. त्यांच्या या निर्णयामुळं हा प्रश्न देखील सुटणार नाही," असं प्रवक्ते नाबिल अबू रुडेना यांनी रॉयटर्सला सांगितलं.

या निर्णयाने संयुक्त राष्ट्रांच्या आदर्शांची पायमल्ली झाल्याचं देखील ते म्हणाले.

अमेरिकन प्रशासनाच्या वक्तव्याचा संयुक्त राष्ट्राने प्रखर विरोध केला आहे. UNRWAचे प्रवक्ते ख्रिस गनेस यांनी ट्वीट करून आपला निषेध नोंदवला आहे - "UNRWAचे आरोग्य केंद्र आणि संघर्षमय स्थितीतलं कार्य हे 'पूर्णपणे बिघडलेलं' आहे ही टीका आम्ही सहन करू शकत नाही," असं ते म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

याआधी, अमेरिकेनं संकल्प केलेल्या निधीपैकी काही भाग न देण्याचा निर्णय जानेवारीमध्ये घेतला होता. त्यानंतर आज हा निर्णय आला आहे.

काय आहे UNRWA?

1948 साली अरब-इस्रायली युद्धानंतर निर्माण झालेल्या निर्वासितांचा प्रश्न सोडवण्यासाठी UNRWAची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेतर्फे मध्य पूर्व आशियातल्या निर्वासितांना आरोग्य आणि शिक्षण सेवा पुरवण्यात येते.

UNRWA देशनिहाय मदतनिधी
फोटो कॅप्शन, UNRWA देशनिहाय मदतनिधी

या संस्थेला आतापर्यंत सर्वाधिक सहकार्य अमेरिकेनं केलं आहे. अमेरिकेनं 2016मध्ये 36.8 कोटी डॉलरचा निधी दिला होता. ही रक्कम या भागात UNRWA तर्फे खर्च करण्यात आलेल्या रकमेच्या 30 टक्के आहे.

ट्रंप यांनी या संस्थेला जानेवारीमध्ये 6 कोटी डॉलर देऊ केले होते. या व्यतिरिक्त आणखी 6.5 कोटी डॉलरचा निधी मदतकार्याचं अवलोकन करून देऊ, असं म्हणत अमेरिकेने तो थांबवला. आता हाच 6.5 कोटी डॉलर मदतनिधी रद्द होण्याची चिन्हं आहेत.

अमेरिकेची भूमिका

अमेरिकेनं आतापर्यंत या संस्थेला इतकं सहकार्य केलं, पण आमचं कधी कौतुक झालं नाही आणि आम्हाला तसा आदर मिळाला नाही, अशा आशयाचं ट्वीट ट्रंप यांनी जानेवारीत केलं होतं. त्यांच्या या ट्वीटवरूनच स्पष्ट झालं होतं की ते या संस्थेला मदत करणं थांबवणार आहेत.

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप

इस्रायलसोबत वाटाघाटी करण्यासाठी पॅलेस्टाइन तयार नसल्यामुळं त्यांना आपण सहकार्य करणं थांबवणार आहोत, असंही ट्रंप तेव्हा म्हणाले होते.

"अमेरिकेनं या संस्थेला 6 कोटी डॉलर देण्याचं वचन दिलं आहे. तो निधी पुरेसा आहे. त्यामुळे आरोग्य सेवा आणि शाळा बंद पडणार नाहीत," असं अमेरिकन प्रशासनातर्फे नॉएर्ट म्हणाल्या.

"UNRWAला दिलेला निधी कसा खर्च केला जातो, हे पाहणं गरजेचं आहे. आम्ही दिलेला पैसा सत्कारणी लागला पाहिजे, असं आम्हाला वाटतं," नॉएर्ट यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)