फायर अँड फ्यूरी - मी जीनिअस आणि स्मार्ट : ट्रंप

फोटो स्रोत, PAUL J. RICHARDS/AFP/GETTY IMAGES
आपल्या मानसिक आरोग्यावर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी फेटाळून लावलं आहे. एका विवादास्पद पुस्तकात त्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
हे पुस्तक म्हणजे एक काल्पनाविलास असून लेखक मायकल वुल्फ धोकेबाज आहेत, असं डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.
ट्रंप यांच्या जवळच्या गोटातल्या लोकांनीही त्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्न उपस्थित केल्याचं लेखक मायकल वुल्फ यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
ट्रंप प्रशासनाच्या प्रथम वर्षपूर्तीच्या निमित्तानं मायकल वुल्फ यांनी हे पुस्तक लिहीलं आहे.
कँप डेविड शहरामध्ये वरिष्ठ रिपब्लिकन नेत्यांची भेट घेतल्यानंतर ट्रंप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण एक प्रतिभाशाली विद्यार्थी तर होतोच तसंच खूप हुशारही होतो, असं ट्रंप यांनी म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यांना फेटाळून लावत ट्रंप यांनी शनिवारी एक ट्वीट केलं होतं. "मी फारच प्रज्ञावंत असून माझी सर्वांत मोठी क्षमता मानसिक स्थैर्य आहे. आणि मी खरंच स्मार्ट आहे," असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
'फायर अँड फ्यूरी: इनसाइड द ट्रंप व्हाइट हाऊस' या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यांना ट्रंप प्रशासनानं फेटाळून लावलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
ट्रंप यांचं व्यक्तिमत्त्व अस्थिर आणि उतावीळ असल्याचं या पुस्तकात दर्शवण्यात आलं आहे. तसंच ते धोरण समजून घेण्यात असमर्थ आणि त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करणारी व्यक्ती असल्याच यात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शुक्रवारपासून या पुस्तकाची विक्री सुरू झाली आहे. हे पुस्तक विक्रीसाठी बाजारात येऊ नये, याकरिता ट्रंप प्रशासनानं प्रयत्न केले होते. बाजारात येताच हे पुस्तक 'बेस्टसेलर बूक' झालं आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रंप हे सातत्यानं पुस्तकावर टीका करत असले तरी लेखल मायकल वुल्फ याच्या म्हणण्यानूसार, या टीकेमुळे पुस्तकाच्या विक्रीत वाढच झाली आहे.
या पुस्तकाविषयी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हे वाचा - डोनाल्ड ट्रंप यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे का?
पाहा व्हीडिओ : याच मुद्द्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रंप
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)