IPL 2019 - ऋषभ पंतच्या तुफानापुढे मुंबई इंडियन्सचा धुव्वा

    • Author, आदेश कुमार गुप्त
    • Role, क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

सामना : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

टॉस - मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.

निकाल - दिल्लीने मुंबईला 37 धावांना हरवलं.

दिल्ली - 231/6 (20 ओव्हर, ऋषभ पंत 78 धावा, मिशेल मॅकलेंगन 40/3)

मुंबई - 176 / 10 (19.2 ओव्हर, युवराज सिंह 53, राबाडा 23/2)

दिल्ली कॅपिटल्सचा युवा फलंदाज ऋषभ पंतच्या तुफानी खेळीमुळे मुंबई इंडियन्सचा 37 धावांनी पराभव झाला.

पंतने फक्त 27 चेंडूत 78 रन्स केल्या. एकूण 7 चौकार आणि सात षटकार लगावत त्यांने ही धावसंख्या उभारली. ऋषभच्या या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सला 214 धावांचं लक्ष्य उभं करता आलं. उत्तरादाखल खेळणाऱ्या मुंबईच्या टीमने 19.2 ओव्हरमध्ये सर्व विकेट गमावत 176 धावा केल्या.

मुंबईचा अनुभवी खेळाडू युवराज सिंहने 53 धावा केल्या पण तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. पृथ्वी शॉने फक्त 7 धावा केल्या. पण शिखर धवनने 43 तर कॉलीन इनग्रामने 47 धावा केल्या. त्यानंतर ऋषभने तुफानी खेळी केली.

214 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या टीमची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा14 तर डिकॉकने 27 धावा केल्या. पोलार्ड आणि कुणाल पांड्या यांनी अनुक्रमे 21 आणि 32 धावा केल्या. मुंबईची टीम 176 धावा करू शकली.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईज हैदराबाद

टॉस : कोलकाता नाईट राईडर्सने टॉस जिंकून बॉलिंग करण्याच निर्णय घेतला

निकाल - कोलकाता नाईट रायडर्सने 6 विकेट राखत सामना जिंकला

हैदराबाद - 181/3 (20 ओवर, डेविड वार्नर85, आंद्रे रसेल32/2)

कोलकता - 183/4(19.4 ओवर, एन राणा68, राशिद खान26/1)

रविवारी झालेल्या या सामन्यात कोलकता नाईट रायडर्सने सनराईज हैदराबादला 6 विकेट राखत हरवलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोपातून मुक्त झालेला ऑस्ट्रेलियाचा बॅटसमन डेव्हिड वॉर्नरने शानदार 85 धावा केल्या. त्यामुळे सनराईज हैदराबाद 182 धावा करू शकलं.

पण कोलकता नाईट रायडर्सने हे लक्ष्य 19.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कोलकताची 15.3 ओव्हरमध्ये धावसंख्या 118 होती. त्यावेळी या संघाला विजयासाठी 27 बॉलमध्ये 64 धावांची आवश्यकता होती.

नितीश राणाने 47 बॉलमध्ये 68 धावा केल्या. आंद्र रसेलने 19 बॉलमध्ये 49 धावा केल्या. तर शुभम गिलने 10 बॉलमध्ये 18 रन केल्या.

हैदराबादच्या वॉर्नरने 53 बॉलमध्ये 85 धावा केल्या. त्याला जॉनी बेयरस्टोने उत्तम साथ देत 39 धावा केल्या. तर विजय शंकरने 24 बॉलमध्ये 40 धावा केल्या.

कोलकाता नाईट रायडर्सने सात बॉलर वापरले. आंद्र रसेलने बॉलिंगमध्ये चमक दाखवत 32 धावांत 2 बळी घेतले. तर पियूष चावलाने 23 धावा देत 1 विकेट घेतली. सुनील नरेन याने चांगली बॉलिंग केली. तर कुलदीप यादव फारशी चमक दाखवू शकला नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)