आदित्य ठाकरे ही निवडणूक लढवणार नाहीत - उद्धव ठाकरे

आदित्य ठाकरे ही निवडणूक लढवणार नसल्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्या विषयी विचारल्यावर ते म्हणाले "बाळासाहेबांनी माझ्यावर कोणतही बंधन घातलं नव्हतं तस मीही घातलेलं नाही. निवडणूक लढवायची की नाही हा त्याचा निर्णय आहे. तुम्ही त्याच्याशी बोला. पण ही निवडणूक तरी तो लढवणार नाही हे निश्चित."

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला देखील हाणला आहे. "मी माझ्या मुलांबरोबरच दुसर्‍यांच्या मुलांचेही लाड करतो. मी त्यांना फक्त धुणीभांडी करायला वापरत नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर बोलताना शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं.

ते म्हणाले होते, "एक व्यक्ती अमूकच जागेसाठी अडून राहतो. तो हट्ट पुरविण्याची जबाबदारी इतरांची नाही. त्यांच्या वडिलांनी त्यांचा हट्ट पुरविला. त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा दिली. सुजय विखे पाटील हे राज्यातील प्रॉमिसिंग लिडर होते का?"

शरद पवार यांच्यावर टीका करताना ठाकरे पुढे म्हणाले,"ते आधी बोलले होते निवडणूक लढवणार आता नाही म्हणतायेत. हे सर्वांना माहिती आहे ते जे बोलतात त्याच्या विरुद्ध करतात."

मोदी पंतप्रधान होणा नाहीत या पवारांच्या वक्तव्याची फिरक घेताना, राजकारणात शरद पवार मोठे नेते आहेत. पण ते जोतिषी कधी झाले माहिती नाही, असं उद्धव म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)