अण्णा हजारे आणि देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग अण्णा हजारेंना भेटण्यासाठी राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले आहेत.

त्यंच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे.

अण्णा हजारेंना भेटण्यापेक्षा त्यांच्यामागे ताकद उभी करणं गरजेंच आहे. अण्णांचं आंदोलन त्यांच्यासह संपाव असं सरकारला वाटतं, शिवसेना ते होऊ देणार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करून जनहिताची कामं केल्याबद्दल सरकारने मला पद्मभूषण सन्मान दिला आहे. कायदा करूनही सरकार लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती करत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही. सरकारला जनतेच्या प्रश्नांबाबत काहीच देणंघेणं नसेल तर मलाही पद्मभूषण नको. सरकारने पावलं न उचलल्यास 8 किंवा 9 तारखेला पद्म पुरस्कार परत करेन, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे

"केंद्राने लोकपाल कायदा केला. परंतु चार वर्षं झाली तरी लोकपालची नेमणूक केली नाही. स्वामीनाथन आयोगाचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दीड पट भाव दिल्याचं सरकार सांगत असलं तरी प्रत्यक्षात दिला असता तर शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकले नसते. आम्ही शेतकरी आणि शेतमजुरांना मासिक पाच हजार रुपये निवृत्ती वेतनाची मागणी केली होती. सरकारने मात्र वार्षिक सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत" असं अण्णा हजारे यांचं म्हणण आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)