You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्थसंकल्प 2019: दररोज लागणाऱ्या वस्तूंचे भाव 10 वर्षांत असे वाढले
1. अर्थसंकल्प 2019: दररोज लागणाऱ्या वस्तूंवर तुम्ही किती खर्च करता?
नोव्हेंबर 2018 पासून महागाईत 4.80 टक्क्यांनी वाढ झाल्यानं वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. आज तुम्ही ज्या वस्तूंचा वापर करत आहात, 10 वर्षांनंतर त्यांची किंमत काय असेल, याचा तुम्ही कधी विचार केला का?
तुम्ही आधीच्या तुलनेत आता जास्त खर्च करत आहात की कमी, बीबीसीचं हे विशेष कॅल्क्युलेटर वापरून जाणून घेऊ शकता. इथे ट्राय करा.
2. कुंभ मेळ्यामध्ये हरवलेले लोक जातात तरी कुठे?
जुन्या हिंदी चित्रपटांमुळं 'कुंभ के मेले में बिछडे' हा शब्दप्रयोग विनोदाचाच विषय झाला होता. मात्र आपल्या जवळच्या लोकांपासून दूर जाणं हे प्रत्यक्षात अतिशय वेदनादायी ठरू शकतं.
त्यामुळेच कुंभ मेळ्यामध्ये हरवलेल्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेताना दिसतात.
प्रयागराज (पूर्वींचं नाव अलाहाबाद) येथे 49 दिवस चालणाऱ्या कुंभ मेळ्यामध्ये जवळपास 11 कोटी भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. एवढ्या प्रचंड जनसागरात एखादी व्यक्ती हरवली तर तिला मदत कशी मिळवून दिली जाते? वाचा बीबीसीच्या गीता पांडे यांचा कुंभ मेळ्यातल्या मदत केंद्रांवर हा खास रिपोर्ट.
3. महाराष्ट्रात लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'एक देश, एक निवडणूक' ही संकल्पना आधीच मांडलेली आहे. देशात कायमच निवडणुकांचं वातावरण असतं. त्यामुळे विकासकामांना खीळ बसते, असा त्यांचा युक्तिवाद आहे.
अशावेळी आणखी एक चर्चा जोरदार सुरू आहे, ती म्हणजे लोकसभा आणि विधानसभा एकाचवेळी होणार का?
महाराष्ट्राची विधानसभा नियोजित वेळेआधीच विसर्जित होणार का? राजकीय पक्षांनी एकत्रित निवडणुकीची तयारी केली आहे का? तर या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा हा प्रयत्न. वाचा संपूर्ण बातमी इथे
4. परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी करा हे 6 उपाय
'ही आयुष्याची परीक्षा नाही. या परीक्षेपलीकडेही जगात खूप काही आहे, असा विचार करून परीक्षा दिली तर तुम्हाला कमी ताण येईल,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत सोमवारी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं.
मुलांनी, पालकांनी हे भाषण ऐकलं, पंतप्रधानांना प्रश्न विचारले. पण खरंच यामुळे परीक्षेबद्दलची भीती कमी झाली का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
पण खरंच तणाव घेऊ नका. वाचा ही बातमी.
5. Polar vortex मुळे अमेरिकेत 8 बळी
USमध्ये कडाक्याच्या थंडीनं 8 जणांचा बळी घेतला आहे. अमेरिकन नागरिक अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत.
लोवा विद्यापाठातील एका विद्यार्थ्याच्या या थंडीमुळे मृत्यू झाला आहे.
वेगवेळ्या दवाखान्यांमध्ये हिमबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहे.
गुरुवारी थंडीची तीव्रता सर्वाधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. USमधील जवळपास 9 कोटी लोक -17C तापमान अनुभवत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)