अमित राज ठाकरे यांच्या लग्नाला पाहा कोणकोण आलंय - फोटो

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा आज मुंबईत विवाह संपन्न झाला. मुंबईच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पर पडला, ज्यासाठी राजकारण, क्रिकेट आणि बॉलिवुडचे प्रसिद्ध लोक उपस्थित होते.

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे, मुंबईचे आमदार आशिष शेलार, हे या कार्यक्रमासाठी आलेले दिसले.

याबरोबरच बाबासाहेब पुरंदरे, अमिताभ बच्चन, आशा भोसले, सचिन आणि अंजली तेंडुलकर तसंच उद्योगपती रतन टाटा, अभिनेते रितेश देशमुख, आमिर खान सुद्धा उपस्थित होते.

संध्याकाळी आयोजित स्वागत समारंभालाही अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे.

वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)