कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नानात महाराष्ट्रातले तृतीयपंथीय

प्रयागराज म्हणजेच अलाहाबाद इथे कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. या कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नानात ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या लक्ष्मी त्रिपाठी यांच्यासह अनेक किन्नर सहभागी झाले होते. 6 वर्षांनी प्रयागराज इथे आलेल्या कुंभात लाखो भाविक आले आहेत. याची दृश्य आणि रिपोर्ट तुम्हाला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येईल.

'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता. तसंच आमच्या युट्यूब चॅनलवर इथे कधीही बघू शकता - youtube.com/bbcnewsmarathi

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)