You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मोदी, शेतकऱ्यांकडे लक्ष द्या नाहीतर....'
नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी त्यांना कांदा विकून मिळालेल्या अत्यल्प उत्पन्नाची मनीऑर्डर पंतप्रधान कार्यालयाला केली होती. त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून ही मनीऑर्डर परत पाठवण्यात आली. त्यानंतर साठे यांनी पंतप्रधानांना एक खरमरीत पत्र पाठवत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्यास सांगितलं आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या निफाडचे कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी ७५० किलो कांदा विकला. पण, त्यातून त्यांना केवळ १०६४ रुपयेच सुटले. हे त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवले. पंतप्रधान 'मन की बात' कार्यक्रमात त्यांची ही व्यथा मांडतील अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्यांची मनीऑर्डर परत आली. यानंतर साठे यांनी मोदींना एक पत्र लिहीलं.
"शेतकरी आत्महत्या करत असून त्यांची मुलं या व्यवसायाकडे यायला तयार नाहीत. अखेर भविष्यात शेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली असेल आणि पंतप्रधानांना लाल किल्ल्यावरून शेतकऱ्यांनो रोटी द्या-रोटी द्या अशी मागणी करावी लागेल," असं त्यांनी पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.
साठे यांची व्यथा तुम्हाला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमधून जाणून घेता येईल.
बीबीसी विश्व बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता.
बीबीसी विश्व बुलेटीन पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)