रामचंद्र गुहा : 'गांधीजींचं चरित्र लिहिणाऱ्याला गांधी शिकवण्याची बंदी'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तीन वर्षांपूर्वी इतिहासकार रामचंद्र गुहा एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की भारतात असहिष्णुता वाढत आहे.
त्यावेळी एका 50 वर्षाच्या मुस्लीम व्यक्तीची घरी गोमांस ठेवल्याच्या अफवेतून जमावाने हत्या केली होती. भारतीय जनता पक्षानं बीफवर बंदी आणली होती. तसेच दोन विचारवंतांच्या हत्या झाल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर रामचंद्र गुहा बोलत होते.
"अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सहिष्णूता या दोन गोष्टी विचारात घेता आपल्या देशात कधीच सुवर्ण युग नव्हतं हे आपण मान्य करायला पाहिजे. देशात सरकार आणि राजकीय नेत्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न याआधीही झाले आहेत. पण आपण नक्कीच दिवसेंदिवस अधिकाधिक असहिष्णू होत आहोत. हिंसेच्या घटनामध्ये वाढ होत आहे हे लक्षात घ्यावं लागेल," असं गुहा त्यावेळी म्हणाले होते.
ज्या असहिष्णुतेविरोधात गुहा बोलत होते त्याच असहिष्णुतेचा सामना त्यांना आज करावा लागत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
पंधरा दिवसांपूर्वी गुहा यांनी जाहीर केलं होतं की ते अहमदाबाद विद्यापीठात व्हिजिंटिंग फॅकल्टी म्हणून शिकवणार आहेत. पण आता ते पद स्वीकारणार नाहीत.
"काही गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत. त्यामुळे मला हे पद स्वीकारता येणार नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.
हे पद न स्वीकारण्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाही. विद्यापीठाने देखील ते का येणार नाहीत याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे या घटनेवर उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
"महात्मा गांधींचं चरित्र लिहिणाऱ्या व्यक्तीला महात्मा गांधींच्या गुजरातमध्ये शैक्षणिक क्षेत्रात स्थान मिळत नाही. हे पाहून दुःख झालं पण आश्चर्य वाटलं नाही," असं ट्वीट ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
गुहा यांनी देखील चिमटा काढत म्हटलं आहे की, "गांधीजींच्या चरित्रकाराला, गांधीजींच्या शहरात, गांधीजींवरील अभ्यासक्रम शिकवण्यासाठी बंदी आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
गुहा यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांना हा अभ्यासक्रम शिकवता येणार नसल्याचं दिसतं.
"विद्यापीठात रामचंद्र गुहांनी अभ्यासक्रम शिकवण्यासाठी येण्यास आमचा विरोध आहे. हे आम्ही विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं," अशी माहिती अभाविपच्या नेत्यानं इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.
"आम्हाला आमच्या विद्यापीठात विचारवंत हवे आहेत, देशद्रोही नकोत, असं आम्ही सांगितलं. त्यांच्या पुस्तकातील ज्या भागावर आम्हाला हरकत आहे तो भाग आम्ही वाचून दाखवला," असं देखील त्या नेत्यानं सांगितलं.
"गुहांच्या लिखाणामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाली, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांना ते एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, स्वातंत्र्यावर घाला घातला असा कांगावा करून ते दहशतवाद्यांना सोडण्याची विनंती करत आहेत, भारतापासून काश्मीर वेगळं व्हावं असं त्यांना वाटतं," असे आरोप त्यांनी गुहा यांच्यावर केले आहेत.
तसेच गुहा हे साम्यवादी आहेत, असाही आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला आहे. ज्या लोकांनी त्यांची तक्रार केली त्यांनी गुहा यांचं साहित्य वाचलं नाही असं वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
रामचंद्र गुहा यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. क्रिकेट, पर्यावरण, दलित आणि आदिवासी संघर्ष, स्वातंत्र्योत्तर भारत, महात्मा गांधी या विषयावर त्यांनी विपुल लिखाण केलं आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर दोन खंडात चरित्र लिहिलं आहे. त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकवलं आहे. जितकं त्यांना भारतीय शास्त्रीय संगीत आवडतं तितकंच त्यांना बीटल्स आवडतात. जगातल्या प्रसिद्ध नियतकालिकानं त्यांचा उल्लेख जगातील प्रमुख विचारवंतांपैकी एक असा केला आहे.
हिंदुत्ववादी राजकारण आणि घराणेशाही या दोन्ही गोष्टींना ते विरोध करतात. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या रोषाला सामोरं जाण्याचे अनेक प्रसंग त्यांच्यावर आले आहेत.
याआधी हिंदुत्ववादी संघटनांनी ए. के. रामानुजन यांच्या रामायणावरील निबंधाचा विरोध केला होता. दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हा निबंध वगळण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती. वेंडी डॉनिगर यांच्या पुस्तकाला या संघटनांनी विरोध केला आणि पुस्तक परत घेण्यासाठी प्रकाशकावर दबाव टाकला.
उदारमतवादाचं संरक्षण करण्याची भूमिका आतापर्यंत कोणत्याच पक्षानं घेतली नाही, असं इतिहास सांगतो. पण अनेक जणांना असं वाटतं की मोदींच्या काळात असहिष्णूता वाढली आहे.
आपली मूल्यं बहुसंख्याक लोक इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विचारांव्यतिरिक्त इतर विचारांच्या लोकांना देशद्रोही ठरवलं जात आहे. द्वेष आणि अविश्वासाच्या वातावरणाला प्रोत्साहन दिलं जातं आहे. अशा वातावरणात जर गुहा यांच्यासारख्या संशोधकानं अभ्यासक्रम शिकवू नये यासाठी दबाव टाकला जात असेल तर ते भयावह वाटतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








