आधार आता कुठे कुठे आहे गरजेचं?

सुप्रीम कोर्टानं आधारचा नंबर अनिवार्य असण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठातील तीन न्यायाधीशांनी बहुमताने बुधवारी सांगितलं की आधार कार्डाला घटनात्मक वैधता आहे.

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं आधार कार्डावर सर्वसंमतीने निर्णय घेतलेला नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आधारला संपूर्णपणे घटनाबाह्य ठरवलं आहे.

आधार कशासाठी अनिवार्य नाही?

  • मुलांच्या शाळांमधील प्रवेशासाठी.
  • मुलांना ज्या सरकारी योजनांमधून लाभ होतो त्या योजनांसाठी आधार अनिवार्य नाही.
  • मोबाईल नंबरला आधारशी जोडणं अनिवार्य नाही.
  • बँक खातं उघडण्यासाठी आणि बँकेच्या सेवेसाठी आधार अनिवार्य नाही.
  • टेलिकॉम कंपन्या आणि मोबाईल वॅलेट समवेत कोणत्याही खासगी कंपन्या आधारची मागणी करू शकत नाहीत.

आधार कुठे अनिवार्य?

  • आधारला पॅन कार्डाशी जोडणं अनिवार्य आहे.
  • इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अनिवार्य.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)