राहुल गांधींनी दिली उद्धव ठाकरेंना हॅपी बर्थडेची 'टाळी'

उद्धव ठाकरे, राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्तानं त्यांना अनेक शुभेच्छा आल्या. पण एका शुभेच्छा ट्वीटनं मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 'उद्धव ठाकरेजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा,' असं म्हणत राहुल यांनी बर्थ डेची टाळी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत, पण सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती राहुल यांच्या शुभेच्छांची.

राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंसाठी केलेलं ट्वीट अंदाजे 2,000 वेळा रिट्वीट झालं आहे तर अंदाजे 11,000 जणांनी हे ट्वीट लाइक केल्याचं राहुल यांच्या टाइमलाइनवर दिसत आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारल्यानंतर भावा, जिंकलंस! राहुल गांधी यांची मोदींना जादू की झप्पी! अशी बातमी सामनामध्ये आली होती.

राहुल यांनी आज जबरदस्त भाषण करून भाजप सरकारची यथेच्छ धुलाई केली, अशा शब्दांत या बातमीत राहुल यांची स्तुती करण्यात आली होती.

राहुल यांनी केलेलं आजचं अभिष्टचिंतन ही त्याच अग्रलेखाची परतफेड असल्याचंही म्हटलं जात आहे.

"काँग्रेस आणि शिवसेनेचं नातं हे खूप जुनं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं साहजिकच आहे. राजकारणात थेट काही नसलं तरी इशाऱ्यांनाही सूचक अर्थ असतात," असं मत राजकीय विश्लेषक डॉ. जयदेव डोळे यांनी व्यक्त केलं.

अविश्वास ठरावाच्या दिवशी सामनात आलेल्या अग्रलेखाचा सूरही भाजपविरोधीच होता. "सध्या बहुमताचा अर्थ लोकभावनांची कदर नसून बहुमतवाल्यांची दडपशाही असा बनला आहे," असा टोला सामनानं लगावला होता.

"नुकतीच राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये महिला पत्रकारांची बैठक घेतली होती. त्यात ते म्हणाले होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी सोडून इतर कोणीही पंतप्रधान झालेला चालेल. या वक्तव्याचा अर्थच असा आहे की भाजप वगळता कुणीही मित्र म्हणून चालेल. शिवसेनेशी थेट युती करता येणं काँग्रेसला शक्य नाही, पण भाजपला रोखू शकणारा पक्ष म्हणून ते शिवसेनेकडे पाहतात," असं डोळे सांगतात.

"दुसऱ्या हाताला ज्या ज्या ठिकाणी भाजपनं प्रादेशिक पक्षाशी हातमिळवणी केली आहे त्या पक्षांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेला देखील राजकीय भीती आहेच. त्यामुळे गेल्या काही दिवसात शिवसेनेनं काँग्रेसची स्तुती केलेली आपल्याला दिसतं," जयदेव डोळे सांगतात.

'हातमिळवणी शक्य नाही'

अविश्वास ठरावाच्याच वेळी नव्हे तर त्याच्या आधी देखील शिवसेनेनं राहुल गांधी यांची स्तुती केली होती. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून राहुल गांधी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.

"विकास व भ्रष्टाचार याबाबत राहुल गांधी यांनी काही मूलभूत प्रश्न गुजरात प्रचारात उभे केले. त्यांची उत्तरं शेवटपर्यंत मिळाली नाहीत. राहुलनी त्यांचा घोडा रणाच्या मध्यभागी नेला व ते लढले. लोक लढणाऱ्याच्या मागे उभे राहतात. मी काँग्रेसचा समर्थक नाही, पण राहुलच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष उभा राहत असेल तर त्यांचे स्वागत असो," असं ते त्यावेळी म्हणाले होते.

पण या घडामोडींचा अर्थ आपण राजकीय ऐक्य असा घेऊ शकत नाही, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. गेल्या तीन दशकांतलं शिवसेनेचं पूर्ण राजकारण काँग्रेसच्या विरोधावर बेतलेलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष जवळ येण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांना पटत नाही.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीवेळी ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान म्हणाले होते, "शिवसेनेला सोबत घेतलं तर काँग्रेसला त्याचे परिणाम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणवतील. त्यामुळे अशी आघाडी संभवत नाही."

राज ठाकरे देखील मागे नाहीत

Raj, MNS

फोटो स्रोत, Raj Thackeray/Facebook

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काही व्यंगचित्रं पाहिली तर आपल्या लक्षात येईल की राज ठाकरे हे सातत्याने मोदी-शाह जोडीवर टीकास्त्र सोडत आहेत, पण राहुल गांधींची मात्र त्यांनी स्तुती केली आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या व्यंगचित्रात त्यांनी राहुल गांधी यांना मोदी-शाह यांच्यापेक्षा मोठं दाखवण्यात आलं आहे.

इतकंच नाही तर गुजरात निवडणुकीच्या दरम्यान देखील राज ठाकरे म्हणाले होते की, "नरेंद्र मोदी राहुल गांधींना घाबरले."

पर्यावरणाची हानी नको

पर्यावरणाला हानी पोहोचेल असं करू नका हे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. फलक आणि होर्डिंग लावून पर्यावरणाला हानी पोहोचवू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केल्याचं सामनानं म्हटलं आहे. सकाळपासून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केल्याचं सामनानं म्हटलं आहे.

हेही वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)