हा मुंबईकर तब्बल 15 महिने समुद्रात अडकून पडला आहे

फोटो स्रोत, PA
कायदेशीर तिढ्यामुळे मुंबईकर नाविक निकेश रस्तोगी यांना मालवीय नावाच्या जहाजावर नॉरफोक समुद्राच्या परिसरात 15 महिनं अडकून पडावं लागलं आहे.
मालवीय ट्वेन्टी नावाचं हे भारतीय जहाज इंग्लंडमधल्या ग्रेट यारमाऊथ परिसरात जून 2016 पासून खोळंबलं आहे.
या जहाजाच्या 13 सदस्यीय क्रूचं कर्णधारपद निकेश रस्तोगी यांच्याकडे आहे. ऑक्टोबर 2015 पासून आतापर्यंत या बोटीवर 33 कर्मचारी काम करत होते. यापैकी कुणालाही त्यांचं वेतन मिळालेलं नाही असं 'The International Transport Worker's Federation'ने स्पष्ट केलं आहे.
मी जहाज सोडलं तर त्याचं अस्तित्वच राहणार नाही, असं 43 वर्षीय मुंबईकर रस्तोगी यांनी सांगितलं आहे. मी जहाज सोडलं तर कुणीही सहज या जहाजाचा ताबा मिळवू शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, PA
मालकांनी जहाज विकायला काढलं आहे. तसंच जानेवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला आहे.
जहाजावरचे मूळ कर्मचारी भारतात परतले आहेत, मात्र रस्तोगी यांच्यासह अन्य तीनजण अजूनही जहाजावरच आहेत. गेल्या वर्षापासून या चौघांचा पगार सुद्धा झाला नसल्याचं रस्तोगी यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, PA
The International Transport Workers' Federation (ITF) नं नोव्हेंबर 2016 मध्ये ग्रेट यारमाउथ इथून हे जहाज ताब्यात घेतलं आहे. तसंच ICICI बँकेला 6.88 लाख डॉलर्स देऊन जहाजावरील मालमत्तेची सुटका करून घेतली आहे.
आम्ही भरलेल्या पैशांमध्ये नाविकांच्या पगाराचा सुद्धा समावेश आहे असं ITFनं म्हटलंय. तसंच शेवटचं पेमेंट 2017 च्या फेब्रुवारीत केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
जहाज ताब्यात घेतलं तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे उभे राहू शकतात. यानंतर जहाजावरच्या चारजणांना मायदेशी अर्थात भारतात पाठवलं जाऊ शकते असं ITF इन्स्पेक्टर पॉल कीनन यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, PA
ग्रेट यारमाउथ बंदराचे पैसेही देणं बाकी आहे. 19व्या शतकापासूनच्या नियमांचा दाखला देत बंदर व्यवस्थापनानं सर्वसामान्य दरांपेक्षा तिप्पट पैसे मागितले आहेत.
हा अनेक दिवस सुरू असलेला कायदेशीर गुंता आहे. यावर भाष्य करू शकत नाही, असं बंदर प्रशासनाचे प्रवक्ते पील पोर्ट्स यांनी सांगितलं.
याच जहाज कंपनीचं आणखी जहाज 'द मालवीय सेव्हन' अबरडीन इथं ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र नोव्हेंबरमध्ये या जहाजाची सुटका करण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








