You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : यांनी दिलंय मोदी आणि राहुल गांधींना 'राजकारण सोडण्याचं चॅलेंज'
राज्यवर्धन सिंह राठोड यांनी भारताचा क्रिकेट कॅप्टन विराट कोहलीला फिटनेस चॅलेंज दिलं. विराटने हे चॅलेंज फक्त स्वीकारलंच नाही तर पूर्ण देखील केलं आहे.
(बाय द वे, विराट सध्या स्वतः अनफिट असल्याचं त्याच्या फिजिओने सांगितलंय, म्हणून तो इंग्लंडच्या सरे काउंटीकडून काही सामने खेळू शकणार नाहीये.)
असो, ते फिटनेस चॅलेंज पूर्ण केल्यानंतर विराटनं आणखी तीन जणांना हे चॅलेंज दिलं - त्याची पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
विशेष म्हणजे मोदींनीही हे चॅलेंज स्वीकारलं असून लवकरच मी ही माझा फिटनेस व्हीडिओ शेअर करेन, अशी ग्वाही ही त्यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी सुरू केलेल्या या ट्रेंडच्या लाटेवर काँग्रेसही स्वार झाली आहे, पण थोड्या राजकीय वळणावर.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना इंधनाचे दर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. अन्यथा काँग्रेस देशव्यापी आंदोलन करेल, असा इशाराही दिला आहे. त्यांचं हॅशटॅग आहे - #FuelChallenge.
या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, मोदींचं #FitnessChallenge आणि राहुल गांधींचं #FuelChallenge दोन्ही जोरात असताना तुम्ही या दोन्ही नेत्यांना काय चॅलेंज द्याल?
अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच या प्रातिनिधिक प्रतिक्रिया देत आहोत.
अजित बोबडे म्हणतात की, "पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचं चॅलेंज मी देत आहे."
निकेश भगत यांनी "मोदींना काळा पैसा भारतात आणण्याचं तर राहुलला पंतप्रधान होण्याचं आव्हान" दिलंय.
अभी जीत एक वेगळंच चॅलेंज देतात - "एकाने कमी खोटं बोलावं तर दुसऱ्याने अभ्यास करून बोलावं."
अंबरिश धुरंदर यांनी "मोदींना कॉमन सिव्हिल कोड आणि श्रीराम मंदिर चॅलेंज, आणि राहुल गांधींना जातीमुक्त भारत करण्याचं चॅलेंज" दिलंय.
विशाल दळवी म्हणतात, "मोदींनी 2019 मध्ये हरून दाखवावं आणि राहुल गांधींनी पंतप्रधान होऊन दाखवावं."
अश्विन पवार यांनी ट्वीट केलं आहे की, "राहुल गांधींना चॅलेंज आहे की त्यांनी RSSला बॅन करावं आणि मोदींना चॅलेंज की त्यांनी त्यांच्या जुमल्यांसाठी देशाला सॉरी म्हणावं."
अखेरीस, अक्षय खोसे यांनी "दोघांनीही राजकारण सोडून द्यावं," असा सल्ला दिला आहे.
आता काय म्हणावं?