राजीनामा देण्याआधी येडियुरप्पांचं भावनिक भाषण

कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभेत त्यांनी राजीमान्याची घोषणा केली. बहुमत सिद्ध करू न शकल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी (17 मे) शपथ घेतली होती. ते केवळ अडीच दिवस मुख्यमंत्री होते.

राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी भावनिक भाषण केलं. (खाली महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत.) भाषण केल्यानंतर ते राजीनामा देण्यासाठी राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत.

त्यांच्याकडे बहुमत नसतानाही त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांपूर्वी अवधी दिला होता.

त्यानंतर काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने भाजपला 28 तासांच्या आत बहुमत सिद्ध करायचे आदेश दिले. त्यानंतर गेल्या 24 तासांत कर्नाटकात जोरदार नाट्य रंगलं.

या सर्व घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता - कर्नाटक LIVE : क्षणाक्षणाचे अपडेट्स इथे पाहा

राजीनाम्याआधी भावनिक भाषण -

  • 3750 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांना न्याय मिळायला हवा.
  • सिद्धरामैया सरकार अपयशी ठरली. लोकांनी मतदानातनू राग दाखवला.
  • आम्ही 40 पासून 104 पर्यंत उडी मारली.
  • मी लोकांसोबत बसून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
  • मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ इच्छित होतो.
  • अखेरच्या श्वासापर्यंत मी लोकांची सेवा करेन.
  • पंतप्रधान मोदींनी कर्नाटकाला सापत्न वागणूक दिली नाही.
  • ही अग्निपरीक्षा आहे.
  • भाजपचा लोकशाहीवर विश्वास आहे.
  • ज्यांनी आम्हाला पाठिंब्याचं आश्वासन दिलं होतं, त्यांनी साथ दिली नाही.
  • लोकसभेसाठी राज्य फिरून सर्व 28 जागा जिंकून दाखवेन.
  • पुढच्या वेळी विधानसभेत 150 जागा जिंकू.

आता कुमारस्वामी मुख्यमंत्री?

भाजपचं सरकार पडल्यामुळे आता जेडीएस-काँग्रेसचा सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमच्याकडे 116 आमदारांचा पाठिंबा आहे, असं या दोन्ही पक्षांनी म्हटलं आहे. बहुमतासाठी 112 जागा आवश्यक आहेत.

हे वाचलं का?