You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनम कपूरच्या नवऱ्याने रिसेप्शनला स्पोर्ट्स शूज का घातले?
अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद आहुजा मंगळवारी लग्नाच्या बेडीत अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा #SonamKiShaadi आणि #SonamAnandKiShaadi या हॅशटॅग्सवर स्वार होऊन सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे.
तुम्ही पण या शानदार लग्नाचे फोटो पाहिलेच असतील. आधी हळदीसाठी जमलेली बॉलिवुडची मंडळी, मग आलेल्या लग्नाची वरातीचे व्हीडिओस आणि आता रिसेप्शनचेही फोटो आले आहेत.
पण हे रिसेप्शनचे फोटो तुम्ही नीट पाहिले तर एक प्रश्न तुम्हाला नक्की पडू शकतो - नवरदेव आनंद आहुजाने काळ्या शेरवानीवर स्पोर्ट्स शूज का घातलेत?
साहजिकच नेहमीच सतर्क असलेल्या सोशल मीडियाच्या लोकांनी ही गोष्ट टिपली, आणि त्याबाबत चर्चा सुरू झाली.
"बुटं लपवण्याच्या कार्यक्रमात आनंदने खुशी आणि जान्हवीला 5 रुपयेसुद्धा दिले नाहीत. आणि त्यामुळे त्याला त्याचे बूट परत मिळालेच नाही. म्हणून आनंदने रिसेप्शनला स्पोर्ट्स शूज घातले होते," असं 'टाइम्स हाऊ' या पॅरडी अकाउंटने ट्वीट केलं आहे.
तर 'मदन चिकना' या हॅंडलवरून आलेलं एक ट्वीट होतं - "सोनम कपूरचं ड्रेसिंग आणि मेकअप एकीकडे, आणि आनंद आहुजाचे स्पोर्ट्स शूज एकीकडे."
आता तुम्ही म्हणाल, सोनम एवढी फॅशन आयकॉन असताना तिच्या नवऱ्याने असं भलतंच काँबिनेशन का घातलं? सर्वांनाच हा प्रश्न पडलेला.
तर यामागचं खरं कारण म्हणजे, आनंद यांचं स्पोर्ट्स शूजवरचं प्रेम. त्याच्या इन्स्टाग्रामवरून त्याच्या या प्रेमाची वारंवार प्रचिती येते.
आनंदचं दिल्लीमध्ये 'व्हेज-नॉनव्हेज' नावाचं मल्टी ब्रँड स्नीकर्स शूजचं बुटीक आहे. त्यासोबतच तो 'शाही एक्सपोर्ट्स'चा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. या प्रतिष्ठानाचा वर्षाला तीन हजार कोटींचा उलाढाल आहे.
अशात आनंदने हे शूज ब्रँड प्रमोशन करण्यासाठी घातले असतील, अशी शक्यात नाकारता येत नाही.
या रिसेप्शनच्या एक दिवस आधी सोनम आणि आनंदचा विवाहसोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांनी शीख पद्धतीने रीतसर लग्नगाठ बांधली.
सोनमने लग्नात लाल लेहंगा घातला होता, तर आनंदने पीच रंगाचा वेडिंग ड्रेस घातला होता.
सोनमच्या लग्नात तिची खास मैत्रिण स्वरा भास्करसुद्धा आली होती. त्या दोघींनी 'रांझणा' आणि 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.
सोनम आणि आनंदने एकत्र केक कापून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.
रिसेप्शनसाठी सोनमने ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस घातला होता, आणि आनंदने इंडो-वेस्टर्न पोशाख घातला होता. आणि त्याखाली ते स्पोर्ट्स शूज.
लग्नानंतर मंगळवारी संध्याकाळी मुंबईच्या 'द लीला हॉटेल'मध्ये ग्रँड रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शन पार्टीला अवघं बॉलिवुड अवतरलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)