You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीदेवी : 'तिच्या प्रेमळ आठवणीच आता सोबतीला'
'सदमा', 'नगीना', 'चांदनी', 'मिस्टर इंडिया', 'लम्हे', 'लाडला', इंग्लिश-विंग्लिश असे एकापेक्षा एक सरस सिनेमा देणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री आकस्मिक निधन झालं. त्याच्या अशा अचानक जाण्याचा धक्का अनेकांना बसला. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी भावनांना वाट करून दिली.
बॉलीवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार अशी बिरुदावली मिरवणाऱ्या श्रीदेवी यांचं निधनाने बॉलीवूड एक हरहुन्नरी अभिनेत्रीला पारखी झाली आहे, .
त्या अशाच बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या नाही जायच्या. श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून अनेक जणांनी ट्विटरवरून श्रीदेवी यांना आदरांजली वाहिली आहे.
ऋषी कपूर
आज सकाळी उठलो आणि धक्कादायक बातमी ऐकली. श्रीदेवी नाही यावर विश्वास बसत नाही. तिच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.
कमल हासन
श्रीदेवींचं आयुष्य मी खूप जवळून पाहिलं आहे. एक साधी तरुणी ते एक यशस्वी स्त्री बनण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास थक्क करणारा होता. त्यांच्यासोबत अनेक चांगले क्षण व्यतीत केले, ते सगळे मला आता आठवत आहेत. 'सदमा'मधलं ते गीत मला सारखं आठवतय... तिची सतत आठवण येत राहील.
सुश्मिता सेन
मी स्तब्ध आहे. स्वतःला रडण्यापासून रोखू शकत नाही.
शेखर कपूर
श्रीदेवी नावाचे एक पर्व संपले आहे. एका सुंदर कथेचा अंत झाला आहे यावर विश्वास बसत नाही. तिच्या प्रेमळ आठवणीच आता सोबतीला असतील.
आमिर खान
श्रीदेवी यांच्या कमाचा मी खूप मोठा चाहता आहे.
अनुपम खेर
वाईट बातमीनं जाग आली; विश्वास बसत नाही
राम गोपाल वर्मा
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी जुना फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केले.
राम गोपाल वर्मा यांनी फेसबूकच्या नोटमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
माधुरी दीक्षित
अमिताभ बच्चन
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आहे, 'न जाने क्यूँ, एक अजीब सी घबराहट हो रही है!!
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)